भारतातल्या गरीब मजुरांमधील सहज स्थलांतराचे प्रमाण वाढत चालले आहे. हे बहुधा असंघटित क्षेत्रात मोलमजुरी करणारे लोक असतात. त्यांना रोगराई होण्याची शक्यता अधिक असते मात्र आरोग्यसेवा मिळवण्याचे त्यांचे मार्ग मर्यादित असतात. भारतामध्ये, 2001 च्या जनगणनेच्या दरम्यान असे दिसून आले की 14.4 दशलक्ष लोक कामासाठी अथवा जास्त पैसे मिळवण्यासाठी मुख्यतः शहरांकडे स्थलांतर करतात. शेती, वीटभट्टया, खाणी, बांधकाम आणि मासे-प्रक्रिया (NCRL, 2001) अशा उद्योगांमध्ये असे लोक मुख्यत्वे आढळतात, त्यांची संख्या 25 लाख आहे. स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने नागरी असंघटित उत्पादन क्षेत्रात, सेवा व वाहतूक क्षेत्रात मजूर, डोक्यावर ओझे वाहणारे, वाहनात माल भरणारे, रिक्षावाले, फेरीवाले इत्यादिंच्या स्वरूपात काम करतात. कामांच्या तात्पुरत्या स्वरूपामुळे राहत्या जागेत होणारा जलद बदल त्यांना संरक्षणात्मक संगोपनातून वगळून टाकतो आणि शहरांतील अनौपचारिक कार्य व्यवस्थेतील कार्यस्थिति त्यांना पुरेशा वैद्यकीय संगोपनापासून वंचित ठेवते.
स्थलांतरित संवेदनशील लोकांपैकी, अंतर्गत विस्थापितांचा म्हणजे आयडीपीचा (IDPs) उल्लेख करणे आवश्यक आहे. भारतामध्ये, अंतर्गत विस्थापितांची संख्या सुमारे 6 लक्ष आहे (IDMC 2006). जातीय किंवा परंपरागत मतभेद, धार्मिक मतभेद, राजनैतिक कारणे, विकास प्रकल्प, नैसर्गिक आपत्ती इ. ह्या मुख्य कारणांमुळे विस्थापन घडून येते. असे अंतर्गत विस्थापित सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यात संवेदनशील ठरतात.
स्रोत: भारतातील संवेदनशील गट द्वारे चंद्रिमा चटर्जी आणि गुंजन शेओरान, CEHAT, मुंबई
अंतिम सुधारित : 6/23/2020
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्...
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबत...
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आ...
ग्रामसभेचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिन...