অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)

समाजकल्याण संबधित काही माहितीपट (फिल्म्स)

 • अभेद स्त्री-शक्ती
 • स्त्री! एका चौकटीत बंदिस्त... चौकट परंपरांची, चौकट समाजाची, चौकट जबाबदाऱ्यांची, चौकट दुबळेपणाची... पण ही चौकट मोडत महाराष्ट्रातील काही महिला हिमतिने लढल्या.

 • आगपेटीमुक्त शिवार
 • या माहितीपटात आपले शेत कसे आगपेटी मुक्त राहील व शेतातील उरलेल्या पिकांचा अवशेष न जाळता त्यांची विल्हेवाट कशी लावायची याविषयीची हि चित्रफीत .

 • आदिवासींचा सर्वांगीण विकास
 • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंचा इतिहास सांगितला आहे .

 • कमवा आणि शिका योजना - मराठवाडा विद्यापीठ
 • कमवा आणि शिका योजना हि ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हि योजना आहे. या योजनेविषयी सर्व माहिती या माहितीपटात दिलेली आहे .

 • गावकऱ्यांच्या प्रयत्नातून दुष्काळाचे निवारण
 • एकेकाळी समृध्द आणि संपन्न असं विदर्भातील शिर्ला गाव. राष्ट्रीय रेशीम परीयोजने अंतर्गत रेशीम किडे निर्मिती प्रशिक्षण केंद्र असलेलं गाव.

 • चालूया स्वावलंबनाच्या वाटेवर
 • गरिबी ,दुष्काळ,कर्ज,स्थलांतर –आपल्या देशाच्या सगळ्या गावांची हीच कहाणी आहे. जेव्हा महिला ह्या परिस्थितीला बदलायचं ठरवतात तेव्हा काय घडू शकत ते हि फिल्म दाखवते.ह्याची सुरुवात होते जेव्हा गावातल्या महिला एक छोटा निर्णय घेतात .- घराबाहेर निघायचा आणि स्वयंसाहाय्य गट बनवायचा.

 • जांभोरे
 • जांभोरे हे आदिवासी लोकवस्तीचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वसलेले एक छोटेसे खेडेगाव .

 • जिद्द सरपंचांची
 • औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात स्पर्धेबरोबरच श्रमादानाला उत्साहात सुरुवात झाली. पण 'नव्याचे नऊ दिवस' या उक्ती प्रमाणे लवकरच हा उत्साह निवळला

 • जेष्ठांचे संरक्षण आणि आत्मसम्मान - समाजाची जबाबदारी'
 • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना कोणत्या , महाराष्ट्र शासनाचे जेष्ठ नागरिकांसाठी धोरण कोणती ,जेष्ठ नागरिकांनी सुरक्षिततेसाठी काय करावे व कोणते अँप वापरावे या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

 • डमाळवाडी
 • डमाळवाडी आणि वाझर हि महाराष्ट्रातील दुष्काळी परिसरातील गावे

 • दहशतवाद आणि संरक्षणसिध्दता
 • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात दहशतवाद , सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय ,उरी हल्ला याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

 • पाण्यासाठी वाट्टेल ते
 • या माहितीपटात संगीता जाधव यांची यशोगाथा दिलेली आहे .

 • पुढाकार महिलाशक्तीचा
 • या माहितीपटात महिलानी पुढाकार घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले त्याविषयीची हि चित्रफित

 • भर उन्हात
 • हा माहितीपट वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांनि निर्मित केला असून या माहितीपटात उन्हाचे तापमान उन्हापासून काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिलेली आहे .

 • भांडण-तंटे संपले, माणसं एक झाली
 • समस्या कुठल्या गावात नसतात? काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात.

 • मोहाणे
 • मोहाणे हे आदिवासी लोकवस्तीचे गाव ..

 • लेक माझी अभियान
 • जिल्ह्यातील मुलींचा घटता जन्मदर चिंतनीय ठरल्याने बुलढाणा सिटीझन फोरमने लेक माझी अभियान राबविण्यास सुरुवात केली.

 • विवाहपूर्व समुपदेशन
 • दूरदर्शन सह्याद्री निर्मित विवाहपूर्व समुपदेशन हि चित्रफित.

 • वैजू बाभूळगाव
 • सर्वांगीण पाणलोट क्षेत्र विकासामुळे गावाचा चेहरामोहराच पालटतो .नैसर्गिक साधन संपत्तीची पुनर्निर्मिती करण्याबरोबरच पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना एकत्र करून त्यांच्यात चेतना निर्माण होते .

 • वॉटर बजेट
 • या माहितीपटात पाण्याच्या बजेट विषयी माहिती तसेच पाणी किती प्रमाणात व कसे वापरावे याविषयी माहिती दिलेली आहे .

 • शिक्षकांच्या प्रयत्नातून गाव घडलं
 • उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्करवाडी गाव. गावात पाण्याचा त्रास होताच. त्यात गावातले लोक म्हणावे तेवढे सक्रिय नव्हते.

 • शोष खड्डा कसा बनवतात
 • या माहितीपटात शोषखड्ड्याविषयी माहिती दिलेली आहे.

 • समृद्धीच्या वाटेवर
 • समृद्धीच्या वाटेवर” या माहितीपटात हिवरे आणि चिमठावळ या दोन गावात वॉटर संस्थेने पाणलोटक्षेत्र विकासाची कामे राबविल्यानंतर गावकर्यांच्या राहणीमानात झालेल्या बदलाची माहिती दिली आहे.

 • सायबर क्राईम आणि महिलांची सुरक्षा'
 • सायबर गुन्हे, आपली सुरक्षितता आणि विशेष करून महिलांची सुरक्षितता या विषयी दूरदर्शन सह्याद्री निर्मित हा माहितीपट आहे.

 • सुट्टीतील श्रमदानाची शाळा
 • या माहितीपटात शाळेतील मुलांनी श्रमदानातून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे

 • स्वराज्याच्या वाटेवर
 • बॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (बॉटर) निर्मित माहितीपट

 • स्वागत आहे
 • या माहितीपटात स्त्री पुरुष समानता विषयी वॉटर संस्थेकडून प्रोजेक्ट राबवला जातोय त्याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

 • स्वातंत्र्योत्तर काळातील महीलांचे उद्योगक्षेत्रातील स्थान
 • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात महिला उद्योजकासाठी सरकारच्या योजना कोणत्या ,महिलांना उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी मार्गदर्शन या विषयीचा हा माहितीपट आहे.

 • ‘कोमल’ – बाल लैंगिक अत्याचारावर आधारित चित्रफित
 • चाइल्ड लाईन यांनी बाल लैंगिक अत्याचारावर आधारित हि एक अॅनिममेटेड चित्रफित बनविली आहे.

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate