[कलम ५४ अ प्रमाणे ]
१. आदिवासी जीवनाची परंपरा आणि रूढी, त्यांची सांस्कृतिक वैशिष्टे, सामूहिक साधनसामग्री आणि विवादांचे निराकरण करण्याची परंपरागत पद्धती यांचे जतन करणे.
२. सामाजिक व आर्थिक विकासासाठी पंचायतीने अमलांत आणावयाच्या योजना हाती घेण्यापूर्वी ग्रामसभेची मान्यता घ्यावी.
३. अनुक्रमांक २ मध्ये नमुद केलेल्या योजना, कार्यक्रम, प्रकल्प यासाठी पंचायतीकडून खर्च करण्यात आलेल्या निधींच्या विनियोगाबाबताचे प्रमाणपत्र पंचायतीला येण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.
४. राज्यशासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या विकास योजनांच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम ठरविणे तसेच विविध दारिद्य्र निर्मुलनाच्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून व्यक्ती निश्चित करून त्यांची निवड करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.
५. मादक द्रव्यांची विक्री व सेवन यावर संबंधित ग्रामपंचायती मार्फत बंदी आणणे व त्यावर निर्बंध घालण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.
६. महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रातील गौण वनौत्पादनाच्या मालकीचे हस्तांतर व महाराष्ट्र गौण वनौत्पादन अधिनियम १९९७ नुसार गौण वनौत्पादनाचे विनियमन, समुपयोजन व व्यवस्थापन व्यापार याबाबत पंचायतीला निर्देश देण्याचे अधिकार ग्रामसभेला आहे.
७. अनुसूचित क्षेत्रातील जमिनीचे अतिक्रमणास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने व अनुसूचित जमातीची बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेली जमीन परत देण्याच्या दृष्टीने संबंधीत ग्रामपंचायतीमार्फत जिल्हाधिकारी यांना शिफारस करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.
८. मुंबई सावकार अधिनियम १९४६ अन्वये सावकारीसाठी कोणतेही लायसन्स देण्याकरिता आणि सावकारी धंद्याचा वार्षिक आढावा घेण्याकरिता संबंधीत ग्रामपंचायती मार्फत ग्रामसभा ही विचार विनियम कारे;. तसेच ग्रामसभेने बहुमताने घेतलेला कोणताही निर्णय समूचीत स्तरावर संबंधित प्राधिकाऱ्यावर व ग्रामपंचायतीवर बंधनकारक असेल.
९. जनजाती उपाययोजना सह, स्थानिक योजनावर व अशा योजनांच्या साधनसंपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला शिफारस करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे.
१०. लघु जलसंचयाची योजना आखणे व संबंधीत पंचायतीने घेतलेल्या निर्णयाला मान्यता देणे. स्पष्टीकरण :- लघु जलसिंचन याचा अर्थ गांवतळी, पाझर तलाव, १०० हेक्टर पर्यंतची उपसा सिंचन बांधकामे यासह कोणताही पाण्याचा साठा व सिंचन साठा असा आहे.
११. गाव क्षेत्रामध्ये गाव बाजार स्थापन करण्यास मान्यता देण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. गाव बाजार स्थापन करण्यासाठी व ज्याच्या व्यवस्थापनाची ग्रामसभेने बहुमताने घेतलेला कोणताही निर्णय हा पंचायतीवर बंधनकारक राहील.
१२.ग्रामपंचायत अधिकार क्षेत्रातील असलेली अनुसूचित क्षेत्रातील कोणतेही जमीन विकास प्रकल्पासाठी संपादीत करण्यापूर्वी ग्रामसभेशी पंचायत विचार विनिमय करेल.
१३.गौण खानिजांकरीता खाणी भाडे तत्त्वावर देण्याकरिता पंचायतीला ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागेल यासंबंधी ग्रामसभेने घेतलेला कोणताही निर्णय संबंधीत अधिकाऱ्यावर बंधनकारक राहील.
१४. गावात सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमाची अंमलबजावणी सोपविलेल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कार्यावर देखरेख ठेवणे. तसेच कार्यक्रमांचा अंमलबजावणी बाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना योग्य शिफारस करणे.
१५. झाडे पाडण्याबाबत ग्रामपंचायती मार्फत संबंधीत अधिकाऱ्यांना शिफारशी करणे.
१६. पंचायतीसाठी असलेल्या अर्थसंकल्पाला मान्यता देणे.
१७. ग्रामपंचायतीच्या अधिकारास असलेली जमीन जलाशय संपत्ती व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती याबाबतीत कोणत्याही अधिकाऱ्याने त्या ग्रामपंचायती मार्फत विचार विनिमय करणे व ग्रामसभेची मान्यता मिळविणे आवश्यक आहे.
संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे
अंतिम सुधारित : 6/12/2020
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...
पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात...
आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केल...
महाराष्ट्रामध्ये अनुसूचित क्षेत्रातील [आदिवासी क्ष...