दलित, आदिवासी, महिला व तरुणांच्या आशा, आकांक्षा, व्यथा, वेदनांना वाव देणारे, गावाचे शहाणपण, सदिच्छा व कर्तृत्व व्यक्त करणारे लोकांचे व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा.
आवाजहीन लोक, दुर्बल घटक, आणि महिलावर्ग यांचा प्रामुख्याने तळागाळातील समुदायामध्ये समावेश केला जातो. त्यांना जर पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच विकास कामामध्ये गती देईल आणि या करिता सर्वात उत्तम माध्यम म्हणजे ग्रामसभा होय. म्हणूनच आपल्या गावच्या ग्रामसभा सक्रीय केल्या पाहिजेत. मजबुत झाल्या पाहिजेत, कमकुवत घटकांना त्यांच्या प्रश्नासंबंधी बोलण्याची संधी दिली पाहिजे. ग्रामसभा सर्व गावाचे व्यासपीठ असून संवादातून एकात्मता कायम ठेवण्याचे साधन आहे. ग्रामसभेमध्ये सर्व मतदार सारखे असतात व प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा व आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. कमकुवत घटकाला गावच्या विकासाच्या मुळ प्रवाहामध्ये सामिल करून घेतल्यास खऱ्या अर्थाने गावाचा विकास साध्य करता येईल आणि या विकासाला एक विशिष्ट दिशा प्राप्त होईल.
एकंदरीत ग्रामसभा गावातील सामुदायिक कर्तव्यांचे व आशा- आकांक्षांचे प्रतिक आहे. कायद्याने जरी प्रत्यक्ष कामे मंजूर करण्याचा ग्रामसभेला अधिकार नसला तरी, तिचा नैतिक अधिकार खूप मोठा असून तिच्या विरुद्ध ग्रामपंचायतीला जाता येणार नाही.
संदर्भ : लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ : ग्रामसभा
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे
अंतिम सुधारित : 6/14/2020
ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसभेच्या सभा बोलावण्यास...
पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात...
आदिवासी जीवनाची परंपरा आणि रूढी, त्यांची सांस्कृति...
महाराष्ट्रामध्ये अनुसूचित क्षेत्रातील [आदिवासी क्ष...