ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.
वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.
वरील मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला नियमाप्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो.
जन्म मृत्युची नोंद मुदतीत न केल्यास विलंब शुल्क पडते. म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.
स्त्रोत : जन्म मृत्यू नोंदणी माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/23/2020
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात स...
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...
जळगाव जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज डिजीटल बरोबरच...
पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात...