गटविकास अधिकार समिती कर्मचारी यंत्रणेचे प्रमुख असतात. पंचायत समितीचे सचिव असतात. पंचायत समितीच्या सभेच्या इतिवृत्तासंबंधी सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात असतात. एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पंचायत समितीला वर्ग १ चे व त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पंचायत समितीला वर्ग २ चे गट विकास अधिकारी राज्यशासन नेमते. गटविकास अधिका-याला आपल्या कार्यात निरनिराळ्या खात्याचे तांत्रिक अधिकारी, विभाग अधिकारी व अधिक्षक सहाय्य करीत असतात.
विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) पंचायतीच्या सर्व कारभारावर देखरेख ठेवणे व सहाय्य करण्याचे काम करतात. गटशिक्षण अधिकारी शिक्षणाचे काम पहातात. ग्रामीण रुग्णालयात प्रथम श्रेणीचे आरोग्य अधिकारी (मेडिकल अॉफिसर) असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात द्वितीय श्रेणीचे आरोग्य अधिकारी (मेडिकल अॉफिसर) असतात. त्यांच्या हाताखाली आरोग्य कर्मचारी काम करतात. बांधकाम, दळणवळणासाठी उपअभियंता, शेतीसाठी कृषी अधिकारी, पशुधन अधिकारी, उपअभियंता (लहान पाटबंधारे), भूजल सर्वेक्षण तंत्रज्ञ, बालविकास प्रकल्पाधिकारी असे वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी असतात. हे सर्व अधिकारी जिल्हा परिषदेचे सेवक असतात. पंचायत समितीकडे ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, लेखनिक, नर्सेस (आरोग्य सेविका) बहुउद्देशीय वैद्यकीय पुरुष कर्मचारी, मैलकुली, वाहन चालक इत्यादी ५२ प्रकारचे कर्मचारी असतात.
सर्व अधिकारी वर्ग तीनचे असून त्यांच्या तीन श्रेणी आहेत. या सर्वांची निवड शासनाच्या विभागीय क्षेत्रात, जिल्हा परिषद यंत्रणेच्या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या योजना कार्यान्वित करणारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या यंत्रणेचे चेअरमन असतात. दारिद्रय निर्मूलन व रोजगार निर्माण योजनांसाठी या कर्मचारी यंत्रणा कार्य करीत असतात.
स्त्रोत - जिल्हा परिषद व पंचायत समिती (वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट )
अंतिम सुधारित : 8/31/2020
जळगाव जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज डिजीटल बरोबरच...
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...
यावली ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज संगणकावर असून सर्...
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात स...