অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण

राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण

स्त्री-पुरुष प्रमाण म्हणजे दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण. मुळातच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. ज्या समाजात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा दिला जातो. तेथे स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. मात्र आपल्याकडे स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. मुलीला ओझे मानले जाते. म्हणूनच मुलगी जन्माला यायच्या आधीच गर्भ अवस्थेतच तिला मारले जाते. तिस-या महिन्यात गरोदर स्त्रीची सोनोग्राफीद्वारे तपासणी केली जाते, तेव्हाच गर्भाचे लिंग कळू शकते. जर गर्भ मुलीचा असेल तर गर्भपात केला जातो. १९९० साली केलेल्या जनगणनेपेक्षा २००० साली झालेल्या जनगणनेत स्त्रियांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. २००१ च्या जणगणनेनुसार भारत देशात जर १००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया एवढे प्रमाण आहे आणि आता फक्त कमी विकसित राज्यातच नाही तर ज्या राज्यात जास्त विकास झाला आहे किंवा जेथे आर्थिक सुबत्ता आहे तेथे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण खूप कमी असल्याचे आढळले. म्हणजेच जेथे जास्त आणि कमी विकास दोन्हीकडे गर्भनिदान चाचणी जास्त प्रमाणात होते व स्त्री गर्भ असल्यास गर्भपाताचे प्रमाणही वाढते.

महाराष्ट्र – ग्रामीण – शहरी भाग स्त्री – पुरुष प्रमाण

साल

ग्रामीण

शहर

एकूण

१९९१

९७२

८७५

९३४

२००१

९५९

८७४

९२२

 

काही प्रमुख राज्यात स्त्री-पुरुष प्रमाण

राज्य

१९९१

२००१

केरळ

१९३६

१९५६

तामिळनाडू

९७४

९८६

महाराष्ट्र

९३४

९२२

मध्यप्रदेश

९१२

९२०

गुजरात

९३४

९२१

हरियाणा

८६५

८६१

पंजाब

९९२

८७४

उत्तर प्रदेश

८७६

८९८

बिहार

९०७

९२१

स्त्रोत : लोकसंख्या शिक्षण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 6/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate