অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकसंख्या वाढीचे परिणाम

लोकसंख्या वाढीचे परिणाम

१. अन्नधान्याचा तुटवडा – कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते. दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी लागणा-या पाण्याची टंचाई तसेच पाणी अनेक कारणांसाठी वापरावे लागते. त्यामध्ये जर दुष्काळ पडला तर पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही व अन्न धान्य मोठया प्रमाणावर म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणत पिकविता येत नाही त्यामुळे महागाई वाढते व कुटुंबाला पुरेसा आहार मिळणे कठीण होते व यामधूनच कुपोषणाचे प्रमाण वाढते व अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते.

२. अपुरा निवारा – पूर्वी जर कुटुंबात ठरावीक माणसे राहत असतील तर त्यांना ते घर राहण्यास पुरते. परंतु त्याच कुटुंबात अनेक सदस्य वाढले तर ते घर अपुरे पडते व दुसरे बांधावे लागते. जरी जास्त घरे बांधली तरी जमीन वाढत नाही. त्याचा परिणाम अन्नधान्य पिकविण्यावर होते.

३. दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव – लोकसंख्या वाढल्यामुळे प्रवासाच्या ज्या सुविधा आहेत त्या अपु-या पडतात. तसेच अपघातांचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेणे अवघड होते. वरील अडचणीबरोबर शासनाला आरोग्य सुविधा पुरविणे अवघड होते.

४. जंगलतोड – जळणासाठी लाकूड, घरबांधणी / फर्निचर यासाठी माणसाने जंगलतोड केली. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. तसेच उद्योगासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी सुद्धा जंगलतोड झाली. याचा परिणाम पाऊस वेळेत न पडण्यावर झाला.

५. स्थलांतर – नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ होणा-या स्थलांतरामुळे शहरांची झपाटयाने वाढ होते व शहराच्या सर्व यंत्रणांवर ताण पडू लागतो. कारखान्याच्या धुराने, घाण पाणी नदीमध्ये सोडल्याने पाणी दूषित होते. वाहनामुळे हवा प्रदूषण होते.

६. साधनसंपत्ती व उर्जेची कमतरता भासते.

७. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण – शिक्षण जरी मिळाले तरी नोकरी मिळत नाही व गरिबी असल्यामुळे जीवन व्यवस्थित जगता येत नाही, त्यामुळे गुन्हेगारी व अत्याचाराचे प्रमाण वाढते.

वरील सर्व कारणांमुळे आपल्याला स्वस्थ व सुरक्षित जीवन जगता येत नाही. ह्या सगळ्यांची तीव्रता कमी करायची असेल तर त्यावरचे उपाय आपण लगेचच आणि आपल्या कुटुंबापासून सुरु केले पाहिजेत.

स्त्रोत :लोकसंख्या शिक्षण,माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका,वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate