অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिलांची उंच भरारीकडे झेप!

महिलांची उंच भरारीकडे झेप!

विचार

पाण्यासाठी झटणा-या  आणि एक किलोमीटर अंतरावरून डोक्यावर दोन ते तीन घागर ठेवून पाणी वाहणा-या  महिला ज्या गावात राहतात असे गाव म्हणजे कवडस, या गावाची हि यशोगाथा……………………………

खरच विचार जरी केला तर अंगाला  चक्क शहारे आणणारी हि बाब आहे .परंतु जेवढ़ी  हि बाब थरारक आहे तेवढ़ी सत्य देखील आहे. आजच्या काळातही असा प्रकार कुठेतरी घडतो म्हणजे फारच आश्चर्यजनक घटना कुठेतरी घडत आहे-. कवडस हे गाव हिंगणा तालुका पासून किमान २६  किलोमीटर अंतरावर हे गाव वास्तवात आहे .अतिशय डोंगराळ व द-र्या खो-याचा भाग या गावाच्या वाट्याला आला आहे . परंतु नागपूर या उपराजधानी वरून वर्धा जीलहयाला जाण्याचा बाह्य मार्ग या गावातून िदेला आहे त्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहे . प्रसिद्ध असून देखील जाण्या येण्याचा मोठ त्रास या गावांमध्ये आहे.  परंतु दिवसातून ३ वेळा (ST)एस. टी. महामंडळाची बस या गावात येते ...त्यामुळे या गावातील महिलांना हिंगणा या गावात येण्या जाण्याचा खूप त्रास होतो. या गावाची लोकसंख्या १ हजार आहे या गावातील संपूर्ण लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहे या गावामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचे चार गट आहेत. त्यामध्ये तीन गट एस सी पी योजने अंतर्गत स्थापन झालेले आहेत  व एक गट तेजस्वीनी योजने अंतर्गत स्थापन आहे चार गट मिळून गाव विकास समिती आहे गाव विकास समितीचे नाव सुष्टी हे आहे. या गावातील महिला अतिशय होतकरू व मेहनती व कष्टी आहेत या गावातील गटांचा व्यवहार अतिशय सुरळीत व व्यवस्थित आहे. तीन गटांनी icici बँकचे कर्ज घेतले आहे व सुरु आहेत.  आपल्या गावातील महिलांचा तसेच स्वत:चा विकास व्हावा याकडे महिलांचे सतत लक्ष केंद्रित असते.

अंतर्गत निधी

गावातील महिलांना पाण्याचा खूप त्रास आहे. गावातील महिला शेतीच्या कामा सोबत गावाच्या एका टोकावरून तर दुस-या टोकापर्यंत पाण्याची ने आण  करतात आणि या वेळी  जास्त श्रम त्या घेत असतात. आणि म्हणून गावातील गाव प्रतिनिधी श्रीमती शोभा गायकवाड यांनी पहिल्यांदा सी एम आर सी कार्यकारणी बैठकीला आल्या तेव्हा अचानकपणे आपल्या जिल्यातील सहा.संनियंत्रण अधिकारी श्रीमती- बोरे  मॅडम यांनी काबाडकष्ट कमी करण्या अंतर्गत मॉडेल उभारणी  या विषयावर माहिती सांगितली, तेव्हा मोठ्या उत्सुकतेने शोभा गायकवाड यांनी आपल्या गावामध्ये पाण्याचा त्रास आहे याची माहिती दिली.  हे ऐकुन   कार्यकारणी महिला चकित झाल्या व यावर तोडगा काढुन  आपल्या सी एम आर सी ने काहीतरी करावे असा  निर्णय घेतला.  तेव्हा श्रीमती बोरे मॅडम  व कार्यकारणी समीती सदस्‍यांनी  कवडस गावात भेट दिली. तेव्हा त्यांना असे  आढळून आले की,  गावाच्या एका टोकावरून दुस-या टोकापर्यंत पाणी डोक्यावर महिलाना वाहून न्यावे लागते तसेच गावाच्या ज्या भागामध्ये पाण्याची तफावत आहे त्या भागात देखील मुबलक पाणी महिला वापरू शकतात असे लक्षात येताच वेळीच श्रीमती बोरे मॅडम यांनी आपल्‍या  गावाला काबाड कष्‍ट  कमी करणे अंतर्गत निधी गाव विकास समितीला  प्राप्‍त होवू शकतो हे  पटवून दिले. सदर  निधी वापर करून तुम्ही पाणी नसलेल्या भागामध्ये विहीर आहे तिची दुरुस्ती करून त्या भागामध्ये मुबलक प्रमाणात  पाणी मिळू शकते  लगेचच वि एल सी बैठक घेऊन सहयोगीनिनी अशी माहिती गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी यांना दिली व ठराव घेण्यात आला व वि एल सी चे कागत पत्रे गोळा करुन सी एम आर सी ला देण्यात आले व सी एम आर सी कडून जिल्हा कार्यालयाला देण्यात आले संपूर्ण प्रक्रिया करून माविम कार्यालयातून रू ५००००/- निधी कवडस गावाला मंजूर झाला व ग्रामपंचायत कडून व गाव वर्गणी  रू १५०००/- निधी गोळा झाला आसे एकूण रू. ६५०००/- विहिरीचे काम जोमाने सुरु झाले.

MAVIM2

स्त्री-शक्ति

विहिरीमध्ये गाळ असल्यामुळे विहिरीचे झरे बंद पडले होते विहिरीचा वापर नसल्यामुळे ती संपूर्ण झाडांनी व्‍यापलेली होती, विहिरीची तोंडी खचलेली होती, पाणी वाहून जाण्‍याकरीता नाली नव्हती, विहिरीवर जाण्याचा मार्ग नव्हता, धोबी कट्टा नव्हता अशी दयनिय स्थिती त्या विहिरीची होती. महिलांनी पहिल्यांदा विहिरी भोवतालचा सर्व परिसर तीन दिवसात स्वच्छ केला. नंतर त्यांनी विहिरीची तोंडी खचलेली पूर्ण तोडली, व बांधकाम करण्यास सर्व साहित्य आणले, व कामास सुरवात के ली.

चार दिवसात संपूर्ण विहिरीचे बांधकाम केले त्यानंतर त्यानी विहिरीच्या भोवताल गिरण्या बसवल्या. विहिरी सभोवतालचा  परिसर सिमेंटीकरण  केला, नाली बांधली , धोबी कट्टे बांधले आता विहिर बांधकाम संपूर्ण झाले . परंतु पाणी कसे येणार ..त्यासाठी त्यांनी ८ फुट खोल पर्यंत बसलेला गाळ मजूर लावून उपसला व विहिरीला आपोआप झरे आले .व पाण्‍याचा गंभीर प्रश्‍न सुटला त्‍यामुळे.महिलांना खूप आनंद झाला आपल्या कामाला यश आले असे त्यांना वाटू लागले .नंतर सहा.संनियंत्रण अधिकारी श्रीमती- बोरे  मॅडम यांनी त्या गावातील विहिरीला भेट दिली व कामाची पाहणी केली तेव्हा रू ५००००/- खर्च झाले व काही निधी शिल्लक राहीला  असे लक्षात आल्यावर त्यांनी गावातील संपूर्ण विहिरीला गिरण्या नाहीत व महिला विहिरीच्या तोंडावर उभ्या राहून, खाली वाकून पाणी वर खेचतात तेव्हा त्यांनी या निधीतून  संपूर्ण गावातील विहिरीवर गिरण्या बसवाव्यात असे सांगितले. उरलेल्या निधीतून गिरण्या खरेदी  करून आणल्या व प्रत्येक विहिरीवर बसविल्या. आता महिलांना पाणी काढणे सोपे झाले, आता महिलांना दुरून पाणी आणावे  लागत नाही महिलांचा पुष्कळ वेळ आणि त्रास कमी झाला. या संपूर्ण कामासाठी वेळोवेळी झटणा-या व कामावर देखरेख ठेवणा-या गाव प्रतिनिधी शोभा गायकवाड तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणा-या सहयोगिनी कीर्ती चांदुरकर यांचा सन्मान केला तसेच महिला आर्थिक महामंडळाचे खूप खूप आभार मानले व स्त्री-स्‍ञीशक्‍ती सी एम आर सी तील सर्व कार्यकारणी व स्टाफ चे आभार मानले...........

माहिती संकलक: प्रदीप कथोले, महिला आर्थिक विकास मांडली, नागपूर जिल्हा

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate