অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अमृत अभियान

प्रस्तावना

केंद्र शासनातर्फे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी, स्वच्छ, शास्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार करण्यासाठी अटल मिशन  फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन  ट्रान्सफॉरमेशन (अमृत) या महत्वाकांक्षी अभियानाची घोषणा मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते दिनांक २५-६-२०१५ रोजी करण्यात आलेली आहे .

अभियानाची उद्दिष्टे

  1. शहरातील रहिवाशांना पाणीपुरवठा, मलनिःसारण, नागरी परिवहन पुरवणे, शहरामध्ये प्रामुख्याने गरिबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती करून शहरातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे
  2. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहराच्या स्वच्छतेकरिता मलनिःसारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरामध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे व इतर सुविधांची निर्मिती करणे

अमृत अभियानाची देशभरात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शक सूचना दिनांक २५-६-२०१५ रोजी केंद्र शासनाच्या शहरी विकास  मंत्रालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.  त्याअनुषंगाने  केंद शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार अमृत (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन  ट्रान्सफॉरमेशन)  अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने दिनांक १० ऑगस्ट २०१५ परिपत्रक  आणि १३ ऑक्टोबर २०१५ रोजी शासन निर्णय जारी केले आहेत.

अभियानाची व्याप्ती

केंद्र शासनाने  या अभियानाअंतर्गत राज्यातील ४३ शहरांची निवड करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यातील 43 शहरांमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार आहे. ती शहरे खालीलप्रमाणे

अनुक्रमांक

शहराचे नाव

१.

बृहन्मुंबई महानगरपालिका

२.

पुणे महानगरपालिका

३.

नागपूर महानगरपालिका

४.

ठाणे महानगरपालिका

५.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

६.

नाशिक महानगरपालिका

७.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

८.

वसई विरार महानगरपालिका

९.

औरंगाबाद महानगरपालिका

१०.

नवी मुंबई महानगरपालिका

११.

सोलापूर महानगरपालिका

१२.

मीरा भाईंदर महानगरपालिका

१३.

भिंवंडी –निजामपूर महानगरपालिका

१४.

अमरावती महानगरपालिका

१५.

नांदेड – वाघाळा महानगरपालिका

१६.

कोल्हापूर महानगरपालिका

१७.

उल्हासनगर महानगरपालिका

१८.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका

१९.

मालेगाव महानगरपालिका

२०.

जळगाव महानगरपालिका

२१.

अकोला महानगरपालिका

२२.

लातूर महानगरपालिका

२३.

धुळे महानगरपालिका

२४.

अहमदनगर महानगरपालिका

२५.

चंद्रपूर महानगरपालिका

२६.

परभणी महानगरपालिका

२७.

इचलकरंजी नगरपरिषद

२८.

जालना नगरपरिषद

२९.

अंबरनाथ नगरपरिषद

३०.

भुसावळ नगरपरिषद

३१.

पनवेल नगरपरिषद

३२.

कुळगाव – बदलापूर नगरपरिषद

३३.

बीड नगरपरिषद

३४.

गोंदिया नगरपरिषद

३५.

सातारा नगरपरिषद

३६.

बार्शी नगरपरिषद

३७.

यवतमाळ नगरपरिषद

३८.

अचलपूर नगरपरिषद

३९.

उस्मानाबाद नगरपरिषद

४०.

नंदुरबार नगरपरिषद

४१.

वर्धा नगरपरिषद

४२.

उदगीर नगरपरिषद

४३.

हिंगणघाट नगरपरिषद

अभियानाचा कालावधी

सदर अभियान हे सन २०१५-१६ ते सन २०१९-२० या पाच वषाच्या कालावधीसाठी संपूर्ण देशामध्ये राबभवण्यात येणार आहे.

अमृत योजना संबधित मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय आणि परिपत्रके

  1. केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना  व नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेले दिनांक 10 ऑगस्ट २०१५ रोजी चे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  2. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक १३ ऑक्टोबर २०१५ रोजी जारी केलेला शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

संदर्भ : नगर विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate