सामान्य नागरिक, खेळाडू यांच्यासाठी विविध स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धा आयोजनासाठी जलतरण तलावाची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे व त्याच्या बांधकामासाठी शासनाकडून अनुदान देणे यासाठी ही योजना असून जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा विभाग यांचे कार्यालयातर्फे ही योजना राबविली जाते. संचालक, क्रीडा व युवक सेवा, मध्यवर्ती इमारत, 1 ला मजला, पुणे – 411 001. दुरध्वनी क्रमांक 020-26140048 यंत्रणेचे नाव क्रीडा व युवक संचालनालय कोणासाठी क्रिडा संस्था व क्रिडा मंडळासाठी, /युवा मंडळासाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता नाही वयोमर्यादा (वर्षे) कमीत कमी 18 लिंग पुरूष / महिला कार्यक्षेत्र शहरी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) आवश्यकता नाही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) आवश्यकता नाही ठळक वैशिष्ठये या योजनेसाठी संस्थेला / मंडळाला किमान रूपये 5.00 लाख व जास्तीत जास्त रुपये 21.00 लाख एवढे अनुदान शासनाकडून मिळते. कमाल कर्जमर्यादा नाही बँकेचा सहभाग व व्याजदर नाही स्वतःचा सहभाग अंशतः यंत्रणेचा सहभाग व व्याजदर नाही अनुदान 25×21मीटरकरिता आदिवासी भागात रू.5 लाख, इतरत्र रू.10 लाख, तसेच 50×21 मीटर करिता आदिवासी भागात रु.10.63 लाख व इतरत्र रू. 21 लाख. तारण नाही इ. एम. आय. नाही परतफेडीची सुरूवात नाही परतफेडीचा कालावधी नाही शेरा या योजनेमध्ये सहभागी होणा-या क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे, युवा मंडळे यांच्याकडे जलतरण तलावासाठी स्वतःच्या मालकीची किंवा दीर्घ मुदतीच्या करारावर असणारी जमीन असावी. तलावाचे बांधकाम अनुदान मिळाल्यापासून 3 वर्षांच्या आत पूर्ण करावे. तलावाच्या देखभालीवरील खर्च संबंधित संस्थेने करावयाचा आहे.