अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१ | योजनेचे नाव : | जिल्हा पातळीवर बंदिस्त नाट्यगृह बांधण्यास अर्थसहाय्य योजना. |
२ | योजने बद्दलचा शासन निर्णय : | शा.नि.क्र.नागृबा-2015/प्र.क्र.85/सा.का.1 दि.29 फेब्रुवारी 2016. |
३ | योजनेचा प्रकार : | अर्थसहाय्याची योजना. |
४ | योजनेचा उद्देश : | ज्या जिल्हयात बंदिस्त नाट्यगृह अस्तित्वात नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये नवीन बंदिस्त नाट्यगृह बांधणे. |
५ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : | निश्चित असा प्रवर्ग नाही. |
६ | योजनेच्या प्रमुख अटी : | नाट्यगृहाचे संपूर्ण बांधकाम जास्तीत जास्त दोन वर्षाच्या कालावधीत पुर्ण करणे अनिवार्य असेल. संस्थेने व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीसाठी राखीव निधी निर्माण करणे आवश्यक राहील. |
७ | आवश्यक कागदपत्रे : | सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाकडून प्रमाणित केलेले नाट्यगृह बांधकामाचे अंदाजपत्रक व नकाशे. नाट्यगृह बांधण्याचा व पुढे त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचा ठराव. जमीनीची मालकी सिध्द करणारी कागदपत्रे इ. |
८ | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : | आर्थिक |
९ | अर्ज करण्याची पद्धत : |
|
१० | अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : | प्रकरणपरत्वे निश्चित नाही. |
११ | संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : | सबंधित जिल्हाधिकारी कार्यालय. |
स्रोत : महायोजना, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 1/28/2020
आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ राज्य स्तरावर पुरस्कारप्...
राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व संवर्धनाकरीता व्...
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कला प्रवाहात राहून त्या...
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देणे य...