অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

  1. प्रश्न १. योजनेचे स्वरूप कसे आहे?
  2. प्रश्न २.  या योजनेत कसा फायदा मिळेल आणि याचे विमा प्रीमियम कसे राहील?
  3. प्रश्न ३. प्रीमियम कसे देता येईल?
  4. प्रश्न ४. हि योजना कोण देऊ शकतो त्याची अंमलबजावणी कोण करेल?
  5. प्रश्न ५. या योजनेत कुणाला सहभागी होता येईल?
  6. प्रश्न ६. योजनेत सहभागी होण्याचा कालावधी कोणता आणि त्यातील बदल कसे आहेत?
  7. प्रश्न ७. प्रथम वर्षी सहभागी होऊ न शकणारा पात्र ग्राहक पुढील वर्षी या योजनेत सहभागी होऊ शकतो काय?
  8. प्रश्न ८. योजना सोडून जाणारा व्यक्ती परत योजनेत सहभागी होऊ शकतो काय?
  9. प्रश्न ९. या योजनेत मास्टर पॉलिसीधारक कोण असेल?
  10. प्रश्न १०.  या योजनेतील सहभागी ग्राहकावरील जीवन सरंक्षण केंव्हा संपुष्टात येते?
    1. सदस्याचे जीवन संरक्षण खालील बाबतीत संपते
  11. प्रश्न ११.  या योजनेत विमा कंपनी आणि बँक यांची भूमिका काय राहील?
  12. प्रश्न १२.  प्रीमियमचा तपशील सांगा?
  13. प्रश्न १३.  हे विमा संरक्षण ग्राहकाने घेतलेल्या अन्य विमा संरक्षणाच्या व्यतिरिक्त असेल काय?
  14. प्रश्न १४.  सर्व जॉईन्ट खातेधारक उल्लेख केल्या गेलेल्या खात्याद्वारे ह्या योजनेत सहभागी होऊ शकतात का?
  15. प्रश्न १५.  परदेशस्थ भारतीय (एन.आर.आय.) कव्हरेज मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत पात्र असतील का?
  16. प्रश्न १६.  भारतीय पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी कुठले बँक खाते योग्य असेल?
  17. प्रश्न १७.  नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, पूर इ. मुळे होणारे मृत्यू, अपंगपणा या कारणांना हि योजना लागू असेल का?   तसेच खून / आत्महत्या यासारख्या घटनांदेखील हि योजना लागू असेल का?
  18. प्रश्न १८.  पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या पॉलिसीज (धोरणे) परदेशी विमा पॉलिसीजच्या सहाय्याने सुरु झाल्या आहेत का आणि काम करत आहेत का?
  19. प्रश्न १९.  इतर जीवन विमा सेवांच्या विरुद्ध, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे विमाधारकांच्या वारसास / हक्कधारकास मिळतात. इतर जीवन विमा पॉलिसीज मध्ये उपलब्ध असणारे मॅच्युरिटी फायदे किंवा सरेंडर व्हॅल्यू इथे का नसते?
  20. प्रश्न २०.  पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, जिचा आग्रहाने प्रसार केला जात आहे आणि विकली जात आहे ती परदेशी विमा कंपनीजना, ज्या भारतीय कंपनीज बरोबर काम करीत आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देईल का?
  21. प्रश्न २१.  LIC सारखी सरकारी संस्था असताना, जी हि सरकारी योजना चालवू शकली असती, असे असताना परदेशी विमा कंपनीज पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेशी का संबधित आहेत?
  22. प्रश्न २२.  क्लेम्सची पुर्तता न झाल्यास भारतातील परदेशी विमा कंपनीजवर काही कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे का?
  23. प्रश्न २३.  हप्त्याचे दर वाढू शकतात. किंवा कंपनीज भविष्यात योजना बंद करू शकतात का?

 

प्रश्न १. योजनेचे स्वरूप कसे आहे?

या योजनेत वर्षभारासाठी मुदत जीवन विमा योजना (टर्म लाईफ इन्शुरन्स )संरक्षण राहील ज्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल, यात मृत्यूसाठी संरक्षण देण्यात येईल

प्रश्न २.  या योजनेत कसा फायदा मिळेल आणि याचे विमा प्रीमियम कसे राहील?

वर्गणी दाराच्या कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी २ लाख रुपये मिळतील.  या योजनेचा विमा प्रीमियम हा दर वर्षाला र. ३३०/- प्रत्येक वर्गणीदराने द्यावयाचा आहे

प्रश्न ३. प्रीमियम कसे देता येईल?

प्रत्येक वर्षात जोपर्यंत योजना चालू आहे तोपर्यंत खातेधारकाच्या बचत खात्यातून परस्पर रुपये काढण्याच्या निर्देशानुसार एकदाच जसे योजनेत सहभागी होताना पर्याय निवडला असेल तसा घेण्यात येईल. योजना कार्यान्वित राही पर्यंत वर्गणीदाराला प्रत्येक वर्षी खात्यातून रुपये काढण्यासाठी एकदाच संमती द्यावी लागेल.  या योजेचा आढावा सरकार दरवर्षी घेत राहील त्यानुसार पुढील नियम बदलू शकतात.

प्रश्न ४. हि योजना कोण देऊ शकतो त्याची अंमलबजावणी कोण करेल?

हि योजना सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा निगम LIC किंवा इतर विमा कंपन्याद्वारा राबविली जाईल.  ज्या या योजनेच्या नियमानुसार हेतू पूर्ण करण्यासाठी बँकांशी सहमत होईल.  सहभागी बँका या त्यांच्या ग्राहकांसाठी अशी योजना राबविण्यासाठी कोणत्याही विमा कंपनीला यात सहभागी करू शकतात.

प्रश्न ५. या योजनेत कुणाला सहभागी होता येईल?

वर्ष १८ ते ५० या वयोगटातील सहभागी बँकातील सर्व बचत खातेधारक या योजनेसाठी पात्र राहतील. एकाच वेळी अनेक बँकात खाते असणार्या ग्राहकाला फक्त एकाच बचत खात्यामार्फत या योजनेत सहभागी होता येईल.

प्रश्न ६. योजनेत सहभागी होण्याचा कालावधी कोणता आणि त्यातील बदल कसे आहेत?

या योजनेत विमा संरक्षण हे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळासाठी १ वर्षासाठी राहील त्यासाठी स्विकृती नमुन्यात परस्पर रुपये जमा करण्याचे संमती पत्र हे आवश्यक असून, दर वर्षी ३१ मी पर्यंत प्रीमियम भरता येईल त्याची वाढीव मुदत ३१ ऑगस्ट २०१५ हि पहिल्या वर्षासाठी राहील.  या नंतर सहभागी होणार्या वर्गणी दारांना पूर्ण वार्षिक प्रीमियम द्यावे लागेल

ज्यांना पुढील वर्षी योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी प्रीमियम परस्पर खात्यातून वजा करण्याचे निर्देश दर वर्षी ३१ मे पूर्वी द्यावे. या नंतर सहभागी होणार्या वर्गणी दारांना पूर्ण वार्षिक प्रीमियम द्यावे लागेल आणि स्वतः दिलेले स्वतःचे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल. पात्र नवीन सदस्य,  आणि ज्यांनी अगोदर सहभाग घेतला नाही ते पुढील वर्षी भविष्यात कधीही योजना चालू राहिली तर सदस्य बनू शकतात.

प्रश्न ७. प्रथम वर्षी सहभागी होऊ न शकणारा पात्र ग्राहक पुढील वर्षी या योजनेत सहभागी होऊ शकतो काय?

हो. परस्पर पैसे काढण्याच्या सेवेनुसार नवीन पात्र सदस्य या योजनेत सहभागी होऊ शकतात त्यांनी प्रीमियम परस्पर खात्यातून वजा करण्याचे निर्देश देवून सहभागी होता येईल. स्वतः दिलेले स्वतःचे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल.

प्रश्न ८. योजना सोडून जाणारा व्यक्ती परत योजनेत सहभागी होऊ शकतो काय?

कोणत्याही क्षणी सोडून जाणारा व्यक्ती परत योजनेत सहभागी होऊ शकतो, वार्षिक प्रीमियम देऊन तो योजनेत प्रवेश करू शकतो.  त्यासाठी त्याला स्वतःदिलेले स्वतःचे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल.

प्रश्न ९. या योजनेत मास्टर पॉलिसीधारक कोण असेल?

सहभागी बँक हि सहभागी ग्राहकाच्या वतीने मास्टर पॉलिसीधारक असेल. या बँकेने आणि विमा सरंक्षण देणारी जीवन विमा कंपनी LIC यांनी साधी सोपी आणि ग्राहक हितदक्ष आस्थापना आणि क्लेम देणारी यंत्रणा उभारावी.

प्रश्न १०.  या योजनेतील सहभागी ग्राहकावरील जीवन सरंक्षण केंव्हा संपुष्टात येते?

सदस्याचे जीवन संरक्षण खालील बाबतीत संपते

  1. जन्म तारखेनुसार वय वर्ष ५५ झाल्यावर (जी जवळची जन्मतारीख असेल). दर वर्षी वार्षिक सहभाग हा महत्वाचा आहे, असे असले तरीही वय वर्ष ५० नंतर सहभाग घेता येणार नाही.)
  2. बचत खात्यात अपेक्षित शिल्लक नाही म्हणून आणि जीवन विमा प्रीमियम भरण्याच्या असमर्थेत.
  3. जर सदस्य हा एकापेक्षा जास्त बचत खात्यामार्फत या योजनेत सरंक्षित असेल तर, अश्यावेळी LIC / जीवन विमा कंपनीला असे अनेक प्रीमियम प्राप्त झाले तर फक्त २ लाख रुपयाचे जीवन विमा संरक्षण मिळेल आणि अन्य प्रीमियम परत केले जाणार नाहीत.

प्रश्न ११.  या योजनेत विमा कंपनी आणि बँक यांची भूमिका काय राहील?

  1. हि योजना सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी LIC द्वारा आणि जीवन विमा कंपन्याद्वारा राबविल्या जातील. या योजनेच्या नियमानुसार सामाईक हेतू पूर्ण करण्यासाठी बँकाशी सहमत होतील. सहभागी बँका या त्यांच्या ग्राहकांसाठी अशी योजना राबविण्यासाठी कोणत्याही जीवन विमा कंपनीला यात सहभागी करू शकतात.
  2. योग्य वार्षिक प्रीमियम  हे बचत खाते धारकाच्या खात्यातून ठराविक वेळेत आणि एकाच हप्त्यात परस्पर पैसे काढण्याच्या प्रक्रियेनुसार काढणे हि जबाबदारी सहभागी बँकेची असेल.
  3. सहभागी सदस्यांकडून ठराविक नमुन्यातील सहभागी होण्याच्या फॉर्म आणि संमती पत्र तसेच परस्पर पैसे काढण्याचा फॉर्म हे दस्तावेज सदर बँक जमा करून घेईल.  LIC जीवन विमा कंपनीला हे दस्तावेज परत कधीही मागविण्याचा अधिकार नाही.

प्रश्न १२.  प्रीमियमचा तपशील सांगा?

  1. LIC अन्य जीवन विमा कंपनीला प्रत्येक ग्राहक या प्रमाणे २८९/- रुपये वार्षिक असे प्रीमियम राहील
  2. प्रत्येक ग्राहक याप्रमाणे दरवर्षी ३०/- रुपये याप्रमाणे  BC / Micro / Croporate / Agent यांना खर्च देणे
  3. प्रत्येक ग्राहक याप्रमाणे दरवर्षी ११/-- रुपये याप्रमाणे  बँकेला अस्थापना खर्च मिळेल यांना

प्रश्न १३.  हे विमा संरक्षण ग्राहकाने घेतलेल्या अन्य विमा संरक्षणाच्या व्यतिरिक्त असेल काय?

होय

प्रश्न १४.  सर्व जॉईन्ट खातेधारक उल्लेख केल्या गेलेल्या खात्याद्वारे ह्या योजनेत सहभागी होऊ शकतात का?

जर ते पात्रतेचे निकष पूर्ण करीत असतील आणि प्रती व्यक्ती दर वर्षी रु. ३३०/- या दराने प्रीमियम भरत असतील तर सर्व जॉइंट खाते धारक उल्लेक केल्या गेलेत्या खात्याद्वारे ह्या योजनेत सहभागी होऊ शकतात.

प्रश्न १५.  परदेशस्थ भारतीय (एन.आर.आय.) कव्हरेज मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत पात्र असतील का?

कुठल्याही भारतीय बँकेच्या शाखेत योग्य बँक खाते असलेला कुणीही परदेशस्थ भारतीय पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्र असेल मात्र योजनेशी संबधित अटी आणि शर्तीच्या आधीन राहून.  क्लेमचा प्रश्न उद्भवल्यास लाभधारक / ह्क्क्दारास क्लेम फक्त भारतीय चलनाच्या स्वरूपातच मिळेल.

प्रश्न १६.  भारतीय पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी कुठले बँक खाते योग्य असेल?

संस्थांशी संबंधित खाते वगळता सर्व प्रकारच्या खात्यांचे धारक या योजनेसाठी पात्र असतील.

प्रश्न १७.  नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, पूर इ. मुळे होणारे मृत्यू, अपंगपणा या कारणांना हि योजना लागू असेल का?   तसेच खून / आत्महत्या यासारख्या घटनांदेखील हि योजना लागू असेल का?

या वरील सर्व घटना भारतीय पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत कव्हर केल्या जातील.

प्रश्न १८.  पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या पॉलिसीज (धोरणे) परदेशी विमा पॉलिसीजच्या सहाय्याने सुरु झाल्या आहेत का आणि काम करत आहेत का?

भारतात अशा कुठल्याही परदेशी विमा कंपनीज भारतात थेट काम करत नाहीत. विमा कायदा आणि IRDA नियमानुसार भारतीय कंपनीज बरोबर काही परदेशी नवीन काम करत आहेत, जेथे त्यांचा समभाग ४९% पर्यंतच मर्यादित राहतो.

प्रश्न १९.  इतर जीवन विमा सेवांच्या विरुद्ध, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे विमाधारकांच्या वारसास / हक्कधारकास मिळतात. इतर जीवन विमा पॉलिसीज मध्ये उपलब्ध असणारे मॅच्युरिटी फायदे किंवा सरेंडर व्हॅल्यू इथे का नसते?

या योजनेचा कव्हर फक्त मृत्युनंतर मिळतो आणि म्हणूनच फक्त विमाधारकाच्या वारसास / हक्कधारकास मिळतो. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना हि प्युअर टर्म पॉलिसी आहे.  ज्यात कुठलाही गुंतवणुकीचा भाग समाविष्ट नसून ती मृत्युबाबतच्या घटना कव्हर करते.  इतर पॉलिसीजच्या मानाने किंमतहि कमी आहे. समाजातील दुर्बल घटकांना जीवन विम्याचे फायदे देण्यासाठी हि योजना तयार केली आहे.  म्हणूनच गुंतवणुकीचा भाग टाळून प्रीमियम (हप्ता) हि कमी ठेवला आहे.

प्रश्न २०.  पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, जिचा आग्रहाने प्रसार केला जात आहे आणि विकली जात आहे ती परदेशी विमा कंपनीजना, ज्या भारतीय कंपनीज बरोबर काम करीत आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देईल का?

MsM फक्त फक्त विमा कायद्याने उल्लेख केलेल्या भारतीय विमा कंपनीज काम करू शकतात. परदेशी विमा कंपनीजबरोबर काम करणाऱ्या अशा कंपनीतील विमाधारकाचे फंड्स नियमानुसार भारतात गुंतवले जातात आणि प्रदेशात नाही.  या योजनेत घेतला जाणारा हप्ता हा विमाशास्त्रीय शुल्क, जोखमीचे घटक, सध्याचा मृत्यूदर   यांचा विचार करून घेतले जातात.  त्यामुळे योजनेतून कोणत्याही मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता नाही.

प्रश्न २१.  LIC सारखी सरकारी संस्था असताना, जी हि सरकारी योजना चालवू शकली असती, असे असताना परदेशी विमा कंपनीज पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेशी का संबधित आहेत?

भारतात २४ विमा कंपनी कार्यरत आहेत,  ज्यांना विमा व्यवसाय करण्यासाठी IRDAI कडून परवाना मिळाला आहे. स्पर्धा वाढविण्यासाठी, ग्राहकांना उत्तम सेवा आणि योग्य किमंत देण्यासाठी या सर्व कंपन्यांना सहभागी होण्याची परवानगी आहे. त्या सर्व भारतीय कंपन्याचे परदेशी भागीदार असल्यास त्यांचा कंपनीत फक्त ४९% पर्यंतच समभाग असतो.  म्हणूनच LIC हीच या योजनेतील एकमेव  प्राथमिक विमा कंपनी आहे.

प्रश्न २२.  क्लेम्सची पुर्तता न झाल्यास भारतातील परदेशी विमा कंपनीजवर काही कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे का?

भारतात अशा कुठल्याही परदेशी विमा कंपनीज थेटपणे काम करत नाहीत. विमा कायदा आणि IRDA नियमानुसार भारतीय कंपनीजबरोबर काही परदेशी नवीन काम करत आहेत जेथे त्यांचा समभाग  ४९% पर्यंतच मर्यादित आहे.  व्याख्येनुसार त्या भारतीय विमा कंपनीजच आहेत. त्या सर्व विमा कंपनीज भारतीय कायद्याच्या आधीन आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे.

प्रश्न २३.  हप्त्याचे दर वाढू शकतात. किंवा कंपनीज भविष्यात योजना बंद करू शकतात का?

विमा हा इतर सेवांसारखाच असतो. हप्त्याचे दर भविष्यात वाढू शकतात, २४ भारतीय विमा कंपनीत असलेल्या स्पर्धेमुळे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व्यवहार्य असेल आणि ती बंद व्हायची शक्यता कमी आहे जर काही विशिष्ट परिस्थितीत असे घटलेच तर बँकेकडे इतर ठिकाणी भागीदारी करण्याचे पर्याय उपलब्ध असतात.

आपण याची माहिती टोल फ्री क्रमांकाद्वारे हि मिळवू शकता प्रत्येक राज्यानुसार टोल फ्री क्रमांक दिले आहेत. तसेच एक राष्ट्रीय टोल फ्री नंबर देखील आहे:

महाराष्ट्रासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे :महाराष्ट्र बँक - १८००-१०२-२६३६
राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक : १८००-१८०-११११ /१८००-११०-००१

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना चालू करण्यासाठी नमुना फॉर्म (समती पत्र / घोषणा फॉर्म) डाऊनलोड करण्यासाठी / पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विमा योजनेसंबंधी नेहमी विचारले जाणारे प्रश्न - पीडीएफ फाईल पहाण्यासाठी येथे क्लिक करा

 

स्त्रोत : जन धन से जन सुरक्षा, आर्थिक सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार,

अंतिम सुधारित : 8/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate