অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘भू-सेवाधारी सेवा संकल्प अभियान’

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘भू-सेवाधारी सेवा संकल्प अभियान’

जिल्हा, तालुका व ग्राम समित्यांचे गठण जिल्ह्यात 20 हजार तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण अधिकारी घेतील शेतकरी कुटुंबियांचे पालकत्व जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण बघता तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. अशाप्रकारे 20 हजार तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. अशा तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांना त्यांना हवी असलेली मदत देण्यासाठी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भू-सेवाधारी सेवा संकल्प अभियान जिल्ह्यात सुरू केले आहे. सर्वेक्षणात आढळून आलेल्या सर्व तणावग्रस्त व अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबियांना अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी नियमानुसार समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

हे अभियान जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी जाहीर केले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी अभियानाची घोषणा केली. या अभियानाचा मुख्य उद्देश तणावग्रस्त शेतकऱ्यांना तणावातून बाहेर काढून त्यांच्या समस्यांचे निराकारण करणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून आत्महत्येचे प्रमाण कमी करणे आहे. भू-सेवाधारी सेवा संकल्प अभियानामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

आपले नैतिक कर्तव्य समजून जिल्ह्यातील तणावात असलेल्या शेतकऱ्याला तणावमुक्त करण्याचे कार्य करावे. प्रत्येक अधिकाऱ्याने अशा तणावग्रस्त शेतकरी कुटूंबाचे पालकत्व स्वीकारावे. शेतकरी कुटूंबाची गरज लक्षात घेवून कुटूंबाला शासकीय योजनेच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाच्या या महत्वाकांक्षी अभियानात सहभाग घेवून जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. असे राहील समित्यांचे कार्य ग्रामस्तरीय समित्यांमध्ये सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील तीन प्रगतशील शेतकरी व प्रतिष्ठित नागरीक, महिला बचत गट, पोलीस पाटील, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ता, कृषी सहायक, शिक्षक, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल यांचा समावेश असेल. समिती तणावग्रस्त शेतकरी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाची यादी तहसील कार्यालयाकडून प्राप्त करेल.

सदर यादीचा समितीने अभ्यास करून याव्यतिरिक्त आणखी तणावग्रस्त व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा यादीमध्ये समावेश करेल. यादीतील कुटूंबांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदर कुटूंब दत्तक घेवून त्यांचे पालकत्व स्वीकारेल. समितीची प्रत्येक महिन्याला एक सभा होईल. गावातील तणावग्रस्त शेतकरी कुटूंबाचा अभ्यास करून त्यांना गरजेप्रमाणे मदत करण्यात येईल. अशा कुटूंबांना प्राधान्य कार्डचे वितरण करण्यात येईल. असे प्राधान्य कार्ड असलेल्या सदस्याचे काम विविध शासकीय कार्यालयात प्राधान्याने करण्यात येईल. सदर विभागात प्राधान्य कार्डवरील प्राप्त तक्रारींबाबत नोंदवही ठेवण्यात येईल. तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या तक्रारींसाठी प्रत्येक कार्यालयात तक्रार पेटी ठेवण्यात येईल. प्राप्त तक्रारींबाबत प्रत्येक सोमवारी विभाग प्रमुख आढावा घेवून तक्रार 15 दिवसाचे आत निकाली काढेल.

त्याचप्रमाणे तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोलीस स्टेशन अधिकारी, सहायक निबंधक, पशुधन विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, गटशिक्षणाधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, व्यापारी संस्थेचे प्रतिनिधी, अग्रणी बँक प्रतिनिधी, निवासी नायब तहसीलदार व प्रतिष्ठित नागरीक यांचा समावेश असेल. ही समिती ग्रामस्तरीय समितीचा आढावा घेईल. तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या तातडीच्या गरजा लक्षात घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. पर्यवेक्षणासाठी गावभेटी करेल. तालुकास्तरावर सेवाभावी संस्थाच्या मदतीने तणावग्रस्त कुटूंबातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. समिती तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना गावांचे समन्वय अधिकारी म्हणून गावांचे वाटप करेल.

समन्वय अधिकारी यांनी ग्रामस्तरीय समितीच्या संपर्कात राहून तणावग्रस्त शेतकरी कुटूंबीयांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या विभागप्रमुख यांचा समावेश असेल. निवासी उपजिल्हाधिकारी समितीचे सचिव असतील. ही समिती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब, शेतमजूर यांना शासनाच्या विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेईल. समिती शासकीय योजनांच्या व्यतिरिक्त सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. तालुकास्तरीय समितीचा आढावा घेईल. तसेच शेतकरी कल्याणासाठी विविध उपक्रम राबवेल.

 

संकलन - जिल्हा माहिती कार्यालय,

बुलडाणा.

स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate