सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कायम कार्यरत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न विद्यार्थी दशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी सैनिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ही योजना शासनाने सुरु केली आहे.
ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती
योजनेच्या अटी
- विद्यार्थी 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.
- विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील असावा.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.00 लाखापेक्षा जास्त नसावे.
अनुसूचित जमाती
- विद्यार्थी 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.
- विद्यार्थी अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न भारत सरकार शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्तीसाठी निर्धारित केलेल्या उत्पन्न मर्यादेत असावे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग
- विद्यार्थी 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.
- विद्यार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या मर्यादेत असावे.
लाभाचे स्वरुप
- नाशिक, पुणे, सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांची शिक्षण फी, परीक्षा फी, भोजन, निवास, कपडे, घोडेस्वारी इत्यादीवर होणाऱ्या संपूर्ण खर्चाची प्रतीपूर्ती करण्यात येते.
- इतर मान्यताप्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 15000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत
या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
संपर्क
संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तसेच संबंधित सैनिकी शाळेचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर सैनिकी शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यासाठी आणि सैनिकी शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी अशा शाळांना जोडून जादा तुकडी सुरू करण्यात आल्या आहेत.
स्वरूप
- सैनिकी शाळेमध्ये पाचवीच्या वर्गामध्ये एक अतिरिक्त तुकडी.
- विद्यार्थ्यांचा वसतीगृहातील निर्वाह खर्च भागविण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
- सैनिकी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश, साबण, दंतमंजन आदी अत्यावश्यक वस्तू मोफत पुरविण्यात येतात.
- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकडी असली तरी प्रत्यक्षात शिक्षण देताना इतर विद्यार्थ्यांसोबत एकत्र तुकडी असते.
अटी
• विद्यार्थी अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असावा.
• आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विशिष्ट गुणांचे (उदा. धनुर्विद्या, लांब पल्ल्याचे धावणे इत्यादी) मूल्यमापन करून त्यानुसार निवड करणे.
स्त्रोत
संकलन - धोंडिराम अर्जुन,
स्त्रोत - महान्यूज