इतर मागासवर्गीयांसाठी ४५% मार्जिन मनी
प्रकल्प तपशिल
- प्रकल्प मर्यादा रु.५ लाखापर्यंत, ज्यात रु. ३ लाखांच्या वर मालमत्ता निर्माण होईल.
- राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ४०%, राज्य महामंडळाचा सहभाग ५% ,लाभार्थींचा सहभाग ५% व बँकेचा सहभाग ५०%
- परतफेडीचा कालावधी ५ वर्षे
- महामंडळाच्या कर्जावर ६% दराने व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या दराने व्याज
अर्जदार लाभार्थीची अर्हता
- लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.
- त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
- तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- बीज भांडवल योजने व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा कमी असावे.
- राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,०००/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.
- कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
- कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल
- उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती. २.जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज फोटो.
- व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.
- शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
- २ जामिनदारांची प्रमाणपत्रे.
- स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र.
- तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स. ८.व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.
सूचना :- अर्जदाराने मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
स्रोत - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित
अंतिम सुधारित : 8/3/2023
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.