सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता अभियानाची सुरूवात केली आहे. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींची पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे किशोरी शक्ती योजनादेखील व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो.
अपघात, औद्योगिक : कामावर असताना झालेल्या अपघातामुळे वा आजारपणामुळे कामगार काही काळ अगर कायमचा काम करण्यास निकामी ठरतो, असा अपघात वा आजार. कामगार कामावर असताना त्याच्या शरीराचा एखादा भाग यंत्रात सापडून तो जखमी होणे, एवढाच औद्योगिक अपघाताचा प्रारंभी मर्यादित अर्थ होता. आता अपघात न होताही आजारी पडणाऱ्या आणि कामाच्या जागेवरील प्रतिकूल परिस्थितीमुळे विकल होणाऱ्या कामगारांना नुकसान-भरपाई मिळण्याची तरतूद, बहुतेक देशांच्या कामगार-नुकसानभरपाई कायद्यांत करण्यात आली आहे.
कुटूंबात मिळणाऱ्या सोयी सुविधा, आधुनिक उपचार पध्दती, वैद्यकीय सुविधा, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे आयुष्यमान वाढत आहे.
गरीब कुटुंबांतील मिळवत्या व्यक्तीचा मृत्यू, वृध्दत्व, लग्नखर्च ह्यांकरीता सामाजिक सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाची ओळख करून देण्यात आली आहे.
''प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दळणवळणाची साधने अधिक दर्जेदार व्हावी यासाठी परिवहन विभागाने गेल्या तीन वर्षात अनेक योजना व उपक्रम राबवले.
कामगारविषयक प्रशासन, भारतातील : कामगारविषयक धोरण आखण्याकरिता, कायदे करण्याबाबत सल्ला देण्याकरिता व त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र सरकार व घटकराज्य ह्यांनी निर्माण केलेली यंत्रणा.
मानवी हक्क : मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो. त्या गृहीतकृत्यांवर ह्या हक्कांची मांडणी करण्यात येते. ही संकल्पना ग्रीक व रोमन विचारवंतांच्या तसेच ख्रिस्ती तत्त्वज्ञानात आणि टॉमस अक्वायनससारख्या विधिज्ञांच्या लिखाणातून मांडली गेल्याचे दिसते.
गरिबी-प्रतिरोधक धोरणान्वये गरिबी दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम आपल्याकडे अनेक वर्षे राबविण्यात येत आहेत
सामाजिक सुरक्षा : ( सोशल सिक्युरिटी ). व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांच्या कल्याणार्थ आर्थिक सुरक्षितता देणारी व्यवहार्य तत्त्वप्रणाली. सामाजिक सुरक्षिततेची उपाययोजना मानवी समाजाच्या सुरूवातीपासून मानवाने या ना त्या स्वरूपात केलेली होती. माणसाच्या आयुष्यात काही अकल्पित दुर्घटना घडत असतात; त्यांतून आर्थिक असुरक्षितता वाढते, त्या संकटांना तोंड देणे कठीण जाते.