(आधार सेवा केंद्र) मध्ये थेट प्रवेशासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करा. आधार सेवा केंद्र (ASK) येथे सेवा घेण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करणे सोपे असून पूर्णपणे मोफत आहे. आता तुम्ही तुमच्या सेवांच्या गरजेनुसार कोणत्याही अडचणीशिवाय अपॉइंटमेंट बुक करू शकता. 1. https://bookappointment.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर क्लिक करा.2. आवश्यक तपशील भरा.3. प्राप्त झालेल्या OTP द्वारे प्रमाणीकरण करा.4. “Centre Appointment” वर क्लिक करा आणि आवश्यक तपशील निवडा. तुम्ही पिनकोड वापरून किंवा “जवळपासच्या” पर्यायाद्वारे केंद्र निवडू शकता.5. तारीख आणि वेळेचा स्लॉट निवडा.6. तुम्हाला हवी असलेली सेवा निवडा.7. केंद्रावर शुल्क भरण्यासाठी संमती द्या.8. तुमची अपॉइंटमेंट बुक होईल.अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर, तुम्ही स्लिपची प्रिंटआउट घेऊन निश्चित केलेल्या वेळेत ASK येथे सोबत आणू शकता. या पोर्टलवर तुम्हाला बुक केलेली अपॉइंटमेंट 24 तास आधी पुनर्नियोजित (reschedule) किंवा रद्द करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.