भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते. महाराष्ट्रात मोठया प्रमाणात हापूस व केशर या वाणांची लागवड करण्यात आलेली आहे. जागतिकीकरणामुळे आंबा निर्यातीकरीता आंबा उत्पादकास मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. सध्याच्या काळात निर्यातक्षम हापूस आणि केशर आंब्याला परदेशात मागणी वाढत आहे. आंब्याचा पल्प हा मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. ही निर्यात वाढविण्यासाठी दर्जेदार उत्पादनाबरोबरच त्यासाठी लागणा-या गुणवत्ता प्रमाणकाकडेही तेवढेच लक्ष शेतक-यांना द्यावे लागणार आहे. भारताच्या जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यत्वामुळे आणि कृषि क्षेत्राच्या जागतिक व्यापारामधील समावेशामुळे फळांच्या निर्यातीसाठी चांगल्या संधी निर्माण झालेल्या आहेत. विशेषत: आंब्याची मोठ्या प्रमाणात झालेली लागवड आणि उत्पादन पाहता या फळांच्या निर्यातीस चांगला वाव राहणार आहे. आंबा फळपिकाखालील क्षेत्र व उत्पादन खालीलप्रमाणे फळपिकाचे नाव क्षेत्र (००० हेक्टर) उत्पादन ००० मे. टन) महाराष्ट्राची टक्केवारी भारत महाराष्ट्र भारत महाराष्ट्र क्षेत्र उत्पादन आंबा २५१५.९ १६७.७ १८४३१ १०३२ 6.6० 5.5० एकूण ७२१६. ७४१. ९०६५७ १३५०७ १०.२ १४.८९ आंबा व आंबा पल्पची निर्यात व मूल्य याचा तपशील खालीलप्रमाणे अ.क्र. पिक निर्यात (मे. टन) मूल्य (कोटीत) २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ १ आंबा ४१२८० ४२९९८ ३६३२९ २८५ ३०३ ३१७ २ आंबा पल्प १७४८६० १५४८२० १२८८६६ ७७३ ८४१ ७९६ एकूण आंबा २१६१४० १९७८१८ १६५१९५ १०५८ ११४४ १११३ ताज्या आंब्याची निर्यात प्रामुख्याने ७२ देशांना केली जाते. आंब्याप्रमाणेच देशातून आंब्याचा पल्पही मोठ्या प्रमाणात विविध १४१ देशांना निर्यात केला जातो. सन २०१५-१६ या वर्षात भारतातून निर्यात झालेल्या आंबा व आंबा पल्पची देशनिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. अ.क्र. देश आंबा आंबा पल्प एकूण साठा(मे.टन) मूल्य (कोटी) साठा(मे.टन) मूल्य (कोटी) साठा(मे.टन) मूल्य (कोटी) १ यु.ए.ई. १९७४ १९२ ८४९७ ४७ १०४७१ २३९ २ यु.के. १४९६ ३२ ४८७० ३७ ६३६६ ६९ ३ सौदी अरेबिया १३९९ १७ ४२०५५ २२२ ४३४५४ २३९ ४ नेपाळ ८२७४ १४ १७०१ ८ ९९७५ २२ ५ कतार १०१६ १० २३५ ३ १२५१ १३ ६ नेदेरलॅड ३ ०.०२ १२००४ ८७ १२००७ ८७ ७ यु.एस.ए. २६६ ८ ४५०४ ४० ४७७० ४८ ८ इतर देश १७९०१ ४३.९८ ५५००० ३५२ ८८२९४ ७१७ एकूण ३२३२९ ३१७ १२८८६६ ७९६ १७६५८८ १४३४.०२ राज्यातून मोठ्या प्रमाणात ताजी फळे, भाजीपाला, फुले, रोपे/कलमे इत्यादीची निर्यात विविध देशांना केली जाते. त्यामध्ये आंब्याची निर्यात ७२ देशांना व आंबापल्पची निर्यात १४१ देशांना केली जाते. आंबा निर्यातीतील संधी लक्षात घेता शेतक-यांचा कल निर्यातक्षम आंबा उत्पादन व त्याची निर्यात करण्याकडे वाढत आहे. परंतु सध्या जागतिक बाजारपेठेत कृषिमाल निर्यातीकरीता अनुसरावयाची कार्यपध्दती, गुणवत्ता, प्रमाणके, नियम, अटी, शर्ती, इत्यादी बाबतची अद्यावत माहिती उपलब्ध करून देण्याबाबत शेतक-यांची मागणी आहे. राज्यातून मोठ्या प्रमाणात युरोपियन व इतर देशांना आंबा फळांची निर्यात करण्यात येते. युरोपियन व इतर देशांना आंबा निर्यातीकरीता प्रामुख्याने कोडनाशक उर्वरित अंश व कोड व रोगमुक्त उत्पादनांची हमी देणे आवश्यक असते. यासाठी अपेडा व कृषि विभागाच्या समन्वयाने राज्यात निर्यातक्षम आबा फळावरील कोड व रोग व्यवस्थापनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदरचे काम संपूर्णतः वेबसाईटद्वारे करण्यात येत असून त्याबाबतची मॅगोनेट ही ऑनलाईन संगणक प्रणाली अपेडा संस्थेने विकसित केली आहे. निर्यातक्षम आबा बागांची नोंदणी करणे, त्यांची तपासणी करणे तसेच शेतक-यांना मार्गदर्शन करणे इ. कामे कृषि विभागामार्फत करण्यात येत आहेत. ताजी फळे व भाजीपाला यांची युरोपियन युनियनमधील देशांना निर्यात करण्यासाठी केंद्र शासनाने एक आदर्श कार्यपध्दती (एस.ओ.पी.) विकसित केली असून त्याची देशभर अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर कार्यपध्दतीमध्ये आंबा पिकाची सुध्दा नोंदणी, तपासणी तसेच शेतस्तरावर अभिलेख ठेवणे इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर कार्यपध्दतीतील सुचना तसेच इतर अनुषंगिक बाबींचा विचार करून सन २०१६-१७ या वर्षामध्ये युरोपियन व इतर देशांना निर्यात होणा-या आंबा फळांमध्ये किडनाशके उर्वरित अंश नियंत्रणाबाबत व किडमुक्त कृषि उत्पादनाची हमी देण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील आंबा पिकाखालील क्षेत्र व निर्यातीला असलेला वाव विचारात घेऊन सन २०१६-१७ या वर्षांमध्ये युरोपियन व इतर देशांना आंबा निर्यात करू इच्छिणा-या शेतक-यांच्या बागांची नोंदणी मगोनेट या ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे करण्याकरीता राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. युरोपियन व इतर देशांना आंबा निर्यातीकरीता फळमाशी व कोय पोखरणारी अळी (स्टोन वीवील) मुक्तची हमी देण्याकरीता अपेडाच्या सहकार्याने मॅगोनेट ही ऑनलाईन कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत. मॅगोनेट कशासाठी प्रत्येक देशाचे स्वत:चे सर्वसाधारण स्वच्छतेविषयक तसेच पिकविषयक स्वच्छतेचे निकष आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या प्रत्येक सभासद निर्यातदार देशांना सर्वसाधारण स्वच्छतेविषयक व पिक स्वच्छतेविषयक नियम पाळणे बंधनकारक आहे. युरोपियन युनियनने भारतातून आयात होणा-या कृषिमालावर जिवंत किडींचा आढळ झाल्याने आंबा व काही भाजीपाल्यांच्या भारतातून होणा-या आयातीवर बंदी घातली. मॅगोनेट प्रणालीमध्ये आंब्याच्या संपुर्ण पुर्वइतिहास (ट्रेसेबिलीटी) उपलब्ध असल्याची आयात देशांना खात्री देणे आवश्यक आहे. (उत्पादन ते अंतिम ग्राहकापर्यंत) मॅगोनेटमध्ये उत्पादनपुर्व साखळीचे टप्पे जोडण्याची पुर्तता करणे, म्हणजेचv/ बाग नोंदणी v/शेतकरी प्रशिक्षण v/बागांची तपासणी vंपीक संरक्षण अभिलेख ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आयातदार देशांच्या गरजांची/मागणीची पुर्तता होण्यास मदत होते मॅगोनेटची उद्दिष्टे (Objectives) बागेच्यास्तरावर/शेतस्तरावर निर्यातक्षम आंब्यावरील कोडनाशकांची उर्वरित अंश नियंत्रणविषयक यंत्रणा उभारणे. आंबा बागोतील जमिनीमधील तसेच पाण्यातील कोडनाशकांचे उर्वरित अंश नियंत्रण करणे. किड व रोग व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण यंत्रणा उभारणे. कृारंटाईन कोड व रोग आढळल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा उभारणे. कोडनाशक उर्वरित अंश प्रकरणी धोक्याची सुचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे. भारतातून युरोपियन युनियन व इतर देशांना निर्यात होणारा आंबा हा किड व रोगमुक्त असल्याची हमी देणे. मॅँगोनेट या ऑनलाई कार्यप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणीकरीता पुढील भागीदार संस्थाचा (Stakeholders) सहभाग आहे . अपेडा (कृषी व प्रक्रिया पदार्थ निर्यात विकास संस्था ) राष्ट्रीय पिक संरक्षण संस्था (एनपीपीओ) फलोत्पादन विभाग कृषी विद्यापीठे निर्यातदार आंबा बागायतदार अधिकृत पॅकहाउस प्रक्रियादार भागीदार संस्थांच्या कर्तव्य व जबाबदारया खालीलप्रमाणे अ) अपेडा (APEDA) आंबा निर्यात करू इच्छिणा-या शेतक-यांच्या बागांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे. नोंदणी केलेल्या शेतक-यांकडील निर्यात झालेल्या बागांची माहिती ठेवणे. बागांच्या नोंदणीसाठी राज्य शासनाशी समन्वय ठेवणे. नोंदणीकृत आंबाबागांची यादी फलोत्पादन विभागास कृषि व प्रक्रिया पदार्थ निर्यात विकास संस्था यांना राष्ट्रीयस्तरावर नेोंद घेण्यासाठी सादर करील. फलोत्पादन विभागास नोदणी केलेल्या शेतक-यांची कोड व रोगमुक्त आंबा उत्पादनासाठी प्रशिक्षण आयोजित करेल. फलोत्पादन विभाग दर पंधरवड्यास नोंदणीकृत आंबा बागांमधील कोड व रोगांची स्थिती योग्य असल्याची खात्री करेल. तसेच लागवडीपासून काढणीपर्यंत नोंदणीकृत शेतावर अवलंब केलेल्या पीक संरक्षण उपाययोजनांचे अभिलेख ठेवल्याची खात्री करेल (प्रपत्र-क) निर्यातदार फक्त नोदणी केलेल्या बागांमधून आंबा फळे स्विकारील. या फळांची शेतावरून पॅकहाऊसपर्यंत कोणत्याही अनोंदणीकृत शेतावरील फळांची भेसळ न होऊ देता सुरक्षित वाहतुक करेल. शेताचा नोंदणी क्रमांक व फळांचा लॉट क्रमांक ही माहिती निर्यातदार पॅकहाऊसला पुर्वेल. नोंदणीकृत बागेमधून उत्पादन स्विकारल्यानंतर पॅकहाऊसधारक क्रमांक याबाबतचे अभिलेख ठेवेल. ९) ज्या निर्यातक्षम मालाला विशेष प्रक्रियेची आवश्यकता आहे आणि अशी प्रक्रिया संबंधित पॅकहाऊसवर उपलब्ध नसल्यास अशा मालांच्या सुरक्षित व सचोटीयुक्त वाहतुकीची जबाबदारी संबंधित निर्यातदारांची राहील. राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था माल नोंदणीकृत बागेतून प्राप्त झाल्याची सत्यता पडताळणी करेल. त्यानंतर त्या मालावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी आणि फायटोरॉनिटरी प्रमाणपत्र अदा करण्याची अनुमती देईल. आंबा निर्यातीत राज्य शासनाचा पुढाकार (state Initatives) पुणे येथे राज्यस्तरीय स्वतंत्र कृषि निर्यात कक्ष स्थापन केला आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि उपसंचालक व तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश मॅगानेट प्रणाली राबविण्यासाठी करण्यात आला आहे. अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधित जिल्ह्यातील मंडल कृषि अधिकारी यांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून बागांची नोंदणी, तपासणी, शेतक-यांना कोड व रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन आणि शेतक-यांनी ठेवावयाचे अभिलेख याबाबत मार्गदर्शन करणे ही कामे त्यांच्यामार्फत केली जातात. राज्यस्तरावरून नोंदणीकृत आंबा बागायतदार आणि क्षेत्रीय अधिकारी यांना एसएमएस सेवेव्दारे माहिती दिली जाते. सन २o१६ मध्ये आंबा बागांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिम घेण्यात आली. या ऑनलाईन मॅगोनेट प्रणालीमध्ये ५७६७ आंबा बागांची नोंदणी झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये मँगोनेट प्रणालींतर्गत जिल्हानिहाय नोंदणीकृत बागांची संख्या पुढीलप्रमाणे अ.क्र. जिल्हा मँगोनेट १ ठाणे २१ २ पालघर १७२ ३ रायगड ९६८ ४ रत्नागिरी २५८२ ५ सिंधुदुर्ग १७३७ ६ नाशिक ७ ७ पुणे ५८ ८ अहमदनगर ३४ ९ सोलापूर ६५ १० सातारा ८ ११ सांगली १६ १२ कोल्हापूर २० १३ औरंगाबाद १६ १४ बीड २ १५ जालना ४ १६ लातूर १२ १७ नांदेड ११ १८ उस्मानाबाद १९ १९ बुलढाणा १५ एकूण ५७६७ सन २o१६-१७ या वर्षाकरीता आंबा निर्यातीसाठी मॅगोनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी/नुतनीकरण करण्याची कार्यवाही नोव्हेंबर २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतक-यांना त्यांच्या अांबाबागांची निर्यातीसाठी नोंदणी करावयाची आहे. तसेच ज्या शेतक-यांनी मागील बर्षी आंबा बागांची नोंदणी केली आहे, त्यांनी विहित प्रपत्रात अर्ज शेतक-यांनी विहीत नमुन्यातील अर्जासाठी (प्रपत्र-अ) तसेच अधिकच्या चालू वर्षापासून राज्य शासन या पोर्टलवरून मॅगोनेट अंतर्गत निर्यातक्षम उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www .apeda .com /www. aaplesarkar.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. स्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन