विहीर पुनर्भरण नियोजन

विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये तीन मीटर व दोन मीटर लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत.

पहिला खड्डा तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद व एक मीटर खोल घ्यावा.

दुसरा खड्डा पहिल्या खड्ड्यापासून तीन मीटर अंतरावर घ्यावा.

दुसरा खड्डा दोन मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व दोन मीटर खोल घ्यावा.

पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा सहा इंची पीव्हीसी पाइपद्वारा दुसऱ्या खड्ड्यास जोडावा.

पहिला खड्डा दगडगोट्यांनी भरावा.

दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी 0.45 मीटर जाडीचा खडीचा थर भरावा. त्या थरावर 0.45 मीटर जाडीचा वाळूचा थर भरावा. त्यानंतर 0.45 मीटर जाडीचा बारीक वाळूचा थर भरून त्यावर 0.15 मीटर जाडीचा कोळशाचा थर भरून घ्यावा. हा खड्डा तळापासून चार इंची पीव्हीसी पाइपद्वारा विहिरीशी जोडावा.

ओढ्यातील पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इत्यादी तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद व एक मीटर खोल खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाइपद्वारा दोन मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व दोन मीटर खोल खड्ड्यात जाईल.

दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारा जाऊन विहीर पुनर्भरण होईल.

विहीर पुनर्भरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी

ओढ्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे.

विहिरीत पाणी तळापर्यंत पाइपद्वारा पोचवावे.

पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खड्डे असावेत.

पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा.

ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरू नये.

वाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेली गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी.

संपर्क : 02426-243268
भूजल संशोधन प्रकल्प, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

स्त्रोत: अग्रोवन