मका सोलणी यंत्र -

कणसापासून दाणे वेगळे करण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.

हे यंत्र म्हणजे 6. 4 सें. मी. लांब व 7.2 सें. मी. व्यासाचा एक पाइपचा तुकडा असून, त्याला आतल्या बाजूने दातेरी पट्ट्या बसविलेल्या असतात.

एका हातात यंत्र पकडून दुसऱ्या हाताने कणीस घालून पुढे-मागे फिरविल्यास दाणे वेगळे होतात.

सूर्यफूल मळणी यंत्र -

या यंत्रामध्ये सायकलच्या चाकाप्रमाणे, परंतु आडवे फिरणारे चाक असते. त्यावर सूर्यफुले धरून चाक फिरवल्याने बी चाकाखालील नरसाळ्यात पडते. नंतर ते पंख्याच्या साह्याने स्वच्छ होते.

हे यंत्र इलेक्ट्रिक मोटारच्या साह्याने चालविले असता एका दिवसात पाच क्विंटल सूर्यफुलांची मळणी करता येते. हे यंत्र पॅडलच्या साह्यानेदेखील चालविता येते.

एका तासात 65 किलो दाणे वेगळे होतात.

एस. एन. सोळंकी - 8007752526
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

स्त्रोत: अग्रोवन