तणांचे वर्गीकरण अ. जमिनीनुसार 1. वार्षिक तणे – आघाडा, कुर्डू, रब्बीतणे – वसंतवेल, रानपैजी उन्हाळीतणे 2. द्वैवार्षिक तणे – राणगाजर, राणकांदा 3. बहुवार्षिक तणे – हरळी, लव्हाळा, कुंदा, रुई, घाणेरी ब. ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार 1. पिकामधील तणे – टारफुला, रानओट, पाखड, बंबाखू, खंडकुळी, माठ, काटेमाठ, ओसाडी, तादुंळजा 2. पडीक जमिनीतील तणे – रानबाभूळ, रानबोर, रुई 3. कुरणातील तणे – गाजर गवत, पिवळी तिळवण 4. कालवा, पाण्याचे पाट, डबके - लव्हाळा, माका, पाणकुंभी. 5. रस्त्याच्या कडेला रेल्वेमार्ग – गाजरगवत, रूई टाकळा क. जमीन प्रकारानुसार 1. हलक्या जमिनीतील तणे – आघाडा, चिमनचारा, कुर्डू, सराटा, गोखरु, बरबडाव जोंधळी 2. भारी जमिनीतील तणे – लव्हाळा, हरळी, कुंदा 3. पाणथर तणे – पाणकणीस, लव्हाळा ड. पानाच्या रुंदीनुसार व बियाच्या दलानुसार 1. एकदल तणे – अरुंद पानाची तणे, फांद्या नसलेली तणे, उदा. गवत चिमनतारा, हरळी 2. द्विदल तणे – रुंद पानाची तसेच फांद्या असलेली तणे उदा. दुधनी, कांगाणी कई. स्त्रोत : http://www.krishi.maharashtra.gov.in/1092/Types-of-weeds