फर्टीगेशन म्हणजे काय वेगवेगळ्या पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अशी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरुपात, ठिबक सिंचनाद्वारे देणे म्हणजे फर्टीगेशन होय. याला फेमिगेशनही म्हणतात. फर्टीगेशनमुळे पिकाचं उत्पादन वाढतं. जमिनीची उत्पादनक्षमता वाढते. जमिनीच आरोग्य अबाधित राखलं जातं. जमिनी क्षारयुक्त, चोपण चिवड होत नाहीत. असे ढोबळमानाने फायदे होतात. बाजारात १९:१९:१९, १२:६१:०, ०:५२:३४, १३:०:४५, ०:०:५०, या स्वरुपात हि द्रवरूप खाते मिळतात. हि खत काही आवश्यक असणारी गुणधर्माची असतात. ती म्हणजे हि विद्राव्य खत घनस्वरुपात उपलब्ध होतात. पाण्यात सहजपणे संपूर्णतः विरघळतात. आम्लधर्मीय असतात. ठिबक संचातून देण्यासाठी योग्य असतात. शिवाय अशा खतात दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध असतात. आणि महत्वाचं म्हणजे हि खत फवारणीसाठी योग्य असतात. अर्थात, हि फर्टीगेशन वापरताना आपला ठिबक सिंचन संच हा योग्यच असला पाहिजे. शेतात वापरण्यासाठी सुलभ असावा. फर्टीगेशन टँकर अगर यंत्रणा चांगली असावी. गाळणयंत्रणा बंद पडू देऊ नये. हि सर्व खते खात्रीशीर आणि पाण्यात विरघळणारी असावीत. खताची पाण्यामध्ये मीठ अगर रसायानाबरोबर रासायनिक क्रिया होता कामा नये. त्यामुळे तोतया बंद पडण्याचा धोका असतो. खताच्या मात्रेत बदल करीत राहावा. विशेष म्हणजे गाळण यंत्रणेवर जास्तीत जास्त लक्ष द्यावे. म्हणजे फर्टीगेशन चांगल्या पद्धतीनं पिकांना उपयोगी पडते. फर्टीगेशनमुळे अनेक फायदे होतात दररोज अगर पाहिजे त्यावेळी खत देता येतं. पिकाच्या मुळच्या जवळच खत आणि पाणी दिलं जातं. त्यामुळे खत आणि पाणी यांची वापरक्षमता वाढते. द्रवरूप खत पिकाच्या मुळाद्वारे लवकर शोषली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो. त्यामुळे खातमात्रेत २५ ते ५० टकके बचत होते. तर पाण्यामध्ये ३० ते ५० टक्के बचत होते. पीक लवकर तयार होते. उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. द्रवरूप खतातून पिकाला लागणारी सर्वच्या सर्व अन्नद्रव्य एकाच वेळी दिली जातात. हलक्या प्रतीच्या जमिनीत देखील पिकं घेता येतात. गुणवत्तेची उत्पादने मिळतात. आम्लयुक्त विद्राव्य खतामुळे ठिबक संचामध्ये आपोआप रासायनिक स्वच्छता होते. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात. खतांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढविता येते. विद्राव्य खतांमध्ये सोडियम आणि क्लोरिनचे प्रमाण अतिशय कमी असते. सूक्ष्म द्रवरूप खतांची फवारणी पिकांवर त्वरित करता येते. एकंदरीत फर्टीगेशन हि पद्धत सर्वदृष्ट्या फायद्याची असून, गुणवत्तेची उत्पादने मिळतात. त्यामुळे ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांनी फर्टीगेशन याद्वारेच पिकांना खत द्यावीत. स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव