दुग्धोत्पादन वाढीसाठी योग्य व्यवस्थापनासोबत समतोल आहार हा खूप महत्वाचा आहे. त्यादृष्टीनेच शेतक-यांनी दुभत्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे. गायीच्या पचनसंस्थेवरच गुणवत्तापूर्ण व अधिक दुग्धोत्पादन अवलंबून आहे, हे लक्षात घेऊन तिचे चारा, पाणी व इतर आहार याबाबतचे नियोजन करणे ही आता काळाची गरज बनली आहे. गाई व म्हशींची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन, गर्भाची वाढ, कासेतील ग्रंथीच्या योग्य वाढीसाठी तसेच व्याल्यानंतर दूध निर्मितीसाठी प्रथिने, ऊर्जा, खनिजे, जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकाची योग्य प्रमाणात गरज असते. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी गाई-म्हशींना सकस आणि आवश्यक अन्नघटकांनीयुक्त आहार देणे गरजेचे आहे. दुग्धोत्पादनामध्ये जादा खर्च हा पशुआहारावर होतो. पशुखाद्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून पशुखाद्य तयार करता येते. दुधामध्ये जे अन्नघटक असतात ते दुधाळ जनावरांच्या शरीरातूनच पुरविले जातात, म्हणूनच दुधाळ दूध निर्मितीसाठी गाई, म्हशींच्या आंचळामार्फत साधारणतः ४00 ते ४५० लीटर रक्ताचे अभिसरण होते. म्हणजेच गाई, म्हशीच्या रक्तातूनच दुधातील अन्नघटक तयार केले जातात. जर आपण खाद्यामार्फत अन्नघटक पुरविले नाहीत तर जनावरे स्वतःच्या शरीरात साठवून ठेवलेली ऊर्जा शेवटी याचा एकंदरीत परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. हे सर्व टाळण्याकरिता जनावरांसाठी समतोल आहार व्यवस्थापन महत्वाचे आहे. जनावरांसाठी समतोल आहार समतोल आहारामध्ये ओला चारा, कोरडा चारा आणि खुराक यांचा योग्य प्रमाणात वापर महत्वाचा आहे. जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चा-याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चा-यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-६ इत्यादींचा समावेश होतो. एकदल चा-यामध्ये प्रथिने कमी प्रमाणात आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात. चवळी, लूसर्ण, बरसिम, स्टायली, दशरथ गवत ही द्विदल वर्गातील चारा पिके कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. सुक्या चा-यामध्ये मका कडबा, गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, भाताचा पेंढा तसेच मिश्र सुका चारा जनावरांच्या आहारात द्यावा. जरी हा चारा कमी पौष्टिक असला तरी या चान्याचा उपयोग मुख्यत्वे करून पोटभर वैरण म्हणून केला जातो. समतोल आहारामध्ये अंबोण महत्वाचे आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा यांचे प्रमाण अधिक असते. अंबोण मिश्रणाचा १oo किलो तत्त्वावर नमुना बनवावा. यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे विविध खाद्यघटक वापरले जातात. जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता अंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्ये वापरली जातात. प्रथिनांचा स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल या पासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. याचबरोबरीने भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, तूरचुणी, उडीदचुणी, मूगचुणीचा समावेश करता येतो. पशुखाद्यात दोन टक्के खनिज मिश्रण, एक टका चुना पावडर आणि एक टका मिठाचा समावेश करावा. गाय आणि म्हशीला मिठाची गरज असते. गायीला किमान ४० ते ५० ग्रॅम व म्हशीला ६० ते ७० ग्रॅम मीठ द्यावे. मिठामुळे जनावरांच्या शरीरातील होणारे व्यवस्थापन योग्यरीतीने होते. जनावरांना नित्यक्रमानुसार वेळेत पाणी मिळाले नाही तर किमान ३० टक्के दूध घटते. रवंथ क्रियाही पाण्यावरच अवलंबून असते. पशुखाद्याबरोबर सोयाबीन व मकाही द्यावा. दहा लीटर दूध देणा-या गायीला किमान प्रत्येकी शंभर ग्रॅमप्रमाणे ते द्यावे. त्यामुळे किमान ३ ते ३.५ लीटर दूध वाढेल. पशुखाद्यातील घटक आणि वापर पशुखाद्यात विविध खाद्यघटक वापरल्यामुळे एका पदार्थातील अन्नघटकाची उणीव दुस-या पदार्थातील अन्नघटकातून भरून निघते. पशुखाद्यात साधारणतः २५ ते ३५ टक्के पेंड, २५ ते ३५ टक्के तृणधान्य, २५ ते ४५ टक्के तृणधान्यापासून आणि २० ते ३० टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टका मीठ याचा समावेश होतो. दुभत्या जनावरास पशुखाद्य देण्याचे प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असते. दुधाळ गाईस १ ते १.५ किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी आणि एक किलो अंबोण प्रति २.५ किलो दुग्धोत्पादनासाठी द्यावे. म्हणजेच ५oo किलो वजनाची गाय १५ लीटर दुग्धोत्पादन देत असेल तर १.५ किलो अंबोण शरीरपोषणासाठी आणि ५ किलो अंबोण १५ लीटर दुग्धोत्पादनासाठी असे एकूण ६.५ किलो अंबोण दररोज द्यावे. अंबोणाव्यतिरिक्त अशा गाईस ५ ते ६ किलो सुका चारा आणि ८ ते १o किलो ओला चारा द्यावा. दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणा-या अन्नघटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असते. म्हशींच्या शरीर पोषणासाठी १.५ ते २ किलो अंबोण आणि प्रति २ लीटर दुग्धोत्पादनासाठी १ किलो अंबोण या प्रमाणात देणे गरजेचे आहे. जनावरास अंबोण देण्यापूर्वी ८ ते १२ तास पाण्यात भिजवून ठेवावे. यामुळे त्याचा रुचकरपणा वाढतो व त्याची पाचकतादेखील वाढते. आहारातील अंबोणाचे प्रमाण कमी केल्यास दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो. याचे कारण म्हणजे जनावरांना आहारातून दिलेले अन्नघटक प्रथम शरीर पोषणासाठी वापरले जातात आणि २.५ लीटर दुग्धोत्पादनासाठी एक किलो अंबोण लागते. अंबोणावरील खर्च कमी करण्यासाठी चांगल्या पौष्टिक चारा पिकांची यांसारखा द्विदल वर्गातील हिरव्या चाच्यापासून एक किलो अंबोणाएवढे अन्नघटक पुरविले जातात. १0 ते १५ किलो गजराज किंवा १५ ते १६ किलो ज्वारी, मका, बाजरी यासारखा हिरवा चारा एक किलो खुराक एवढे अन्नघटक पुरवितो. ओलिताची सोय असल्यास चार संकरित गाईसाठी एक एकर किंवा १o गाईंना एक हेक्टर या प्रमाणे फेरपालटीने हिरव्या चाच्याची लागवड करावी. हिरव्या चाच्यामुळे अंबोणात बचत करता येते. तसेच १o किलो एकदल आणि द्विदल हिरव्या चा-याचे मिश्रण, चार ते सहा लीटर दूध देणा-या गाईंना दिल्यास तिच्या सर्व अन्नघटकांची पूर्तता होते. अशा गाईंना अंबोण देण्याची गरज नसते. आहारात दोन ते तीन किलो सुका चारादेखील द्यावा. आहाराचे नियोजन साधारण १0 लीटर दूध देणा-या गाईस १५ ते २० किलो द्विदल हिरवा चारा, दोन ते तीन किलो मका भरडा तसेच दोन ते चार किलो सुका चारा दिल्यास तिच्या अन्नघटकांच्या गरजा पूर्ण होतात. सामान्यतः गाय, म्हैस व्यायल्यानंतर दूध उत्पादन हळूहळू वाढत जाते आणि ४५ ते ५० दिवसांनंतर दूधनिर्मितीचा उद्यांक गाठला जातो. त्यानंतर गाई, म्हशी सरासरी चार महिन्यांपर्यंत सातत्याने दूध देतात. त्यानंतर दूध देणे हळूहळू कमी होते. प्रसूतीनंतरच्या पहिल्या ४५ ते ५० दिवसात दुधाळ जनावरास दुग्धोत्पादनास आवश्यक असणा-या खुराकाच्या १ ते १.५ किलो अधिक खुराक द्यावा, जेणेकरून गाईची दूध देण्याची कमाल मर्यादा कळू शकेल. गाईची जास्तीतजास्त दूध देण्याची मर्यादा किंवा तिची दूध उत्पादन करण्याची क्षमता ही आनुवंशिकतेने येते. त्यामुळे जास्त दूध देण्याची क्षमता गाईच्या अंगी नसेल तर तिला कितीही चांगले खाऊ घातले तरी जास्त दूध देऊ शकणार नाही. आहारातील अंबोणाचा भाग गाई, म्हशींना दूध काढते वेळी द्यावा. हिरवा चारा दूध काढल्याबरोबर आणि कडबा, गव्हाचे काड, सरमाड सारखा सुका चारा कोणत्याही वेळेस देण्यास हरकत नाही. उन्हाळ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चान्याची कमतरता असते. या काळात आपल्याला जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी पूरकखाद्य मिश्रण तयार करणे आवश्यक आहे. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन