कुक्कुट मांस उत्पादनांमध्ये ब्रॉयलरला सर्वाधिक पसंती मिळते. ब्रॉयलर उत्पादनासाठी अनेक खाजगी कंपन्यांनी शेतक-यांबरोबर करार केले आहेत. त्यामुळे विपणनाचा-मार्केटिंगचा फारसा प्रश्न नाही. सुमारे आठ आठवड्यांपेक्षा लहान, 1.5 ते 2 किलो वजनाचे आणि मऊ लुसलुशीत मांसाचे कोंबडीचे पिलू म्हणजे ब्रॉयलर.

उत्कृष्ट व्यवस्थापन पर्याय

कुक्कुट पालन केंद्राचे तापमानः पहिल्या आठवड्यामध्ये 950 फॅरनहाईट इतके तापमान आरामदायी (सहज चालण्याजोगे) असते आणि पुढील प्रत्येक आठवड्याला 50 फॅरनहाईटने कमी करत सहाव्या आठवड्यामध्ये ते 700 फॅरनहाईटपर्यंत कमी करावे.

वातायनः हवा चांगली खेळती ठेवावी, पक्ष्यांना गुदमरल्यासारखे होऊ नये यासाठी अमोनिया - पक्ष्यांची विष्ठा नियमितपणे साफ करावी.

प्रकाशः 200 चौरस फूट चटई क्षेत्रासाठी 60 वॅटचा एक बल्ब

चोच साफ करणेः 1 दिवसाचे असताना चोच साफ करावी.

ब्रॉयलरची आरोग्य व्यवस्था

निरोगी पिलांपासून सुरुवात करा

अंडी ऊबवणूक केंद्रांमध्ये मरेक रोगप्रतिबंधक लस द्या

4-5 दिवसांचे असताना आरडीव्हीएफ-1 द्या

कॉक्सिडियोसिस रोखण्यासाठी खाद्यातून औषधे द्या

खाद्य अफ्लोटॉक्सिनमुक्त ठेवा

प्रत्येक चक्रानंतर जमिनीवर किमान तीन इंच जाडीपर्यंत स्वच्छ गवत पसरून ठेवा

विपणन

सहा-आठ आठवड्याचे झाल्यावर विपणन करा

पक्षी पकडताना त्यांना जखमा होऊ नयेत यासाठी खाद्य आणि पाणी देण्यासाठीचे चर बाजूला करा

हवामानातील अतिरेकापासून वहनातील पक्ष्यांचे संरक्षण करा

सुगुणा, कोईम्बतूर, व्हीएचएल, पुणे, पयोनियर, ब्रोमार्क, आदी काही खाजगी कंपन्या कंत्राटी ब्रॉयलर उत्पादनामध्ये सहभागी आहेत.

खालील बाबींविषयी अधिक माहितीसाठी

चांगल्या जातींच्या उपलब्धतेविषयी

कुक्कुटपालन केंद्रासाठीच्या गरजा आणि उभारणीविषयी

कुक्कुटपालनासाठीचे खाद्य

सशक्त पक्ष्यांच्या उत्पादनासाठी

कृपया जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी किंवा कृषी वा पशुवैद्यकविज्ञान विभागाशी संपर्क साधा.

स्त्रोत : पोर्टल कन्टेट टिम