ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ५० टक्क्यापर्यंत पाण्याची बचत होऊन, १0 ते २५ टक्के उत्पादनात वाढ होते व २५ टक्क्यापर्यंत खताच्या वापरात बचत होते. ही पद्धत शेतात राबविण्याकरीता जवळपास सर्वच महत्वाच्या पिकांसाठी तंत्रज्ञान कृषि विद्यापीठाने विकसित केले आहे. ५० टक्के पाण्याची बचत म्हणजेच ५० टक्के पाण्याची निर्मिती होय. हे पाणी अतिरिक्त जमिनीवर किंवा पिण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. पण यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे व त्यासाठी खाली नमूद केलेले प्रमुख मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. सदर मुद्दे प्रथमदर्शनी महत्वाचे वाटत नसले तरी पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी त्यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन पद्धतीचे आरेखन व आराखडा तयार करणे. ठिबक सिंचन संचाची शेतात मांडणी करणे. ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पिकाची पाण्याची योग्य ती गरज काढून त्याप्रमाणे ठिबक संच चालविणे. ठिबक संचाची योग्य ती निगा, देखभाल व काळजी घेणे. यापैकी प्रस्तुत लेखात ठिबक सिंचन पद्धतीने वेगवेगळ्या पिकाची पाण्याची गरज कशी काढावी व त्याप्रमाणे ठिबक संच किती वेळ चालवावा. यासंदर्भातील माहिती विस्तृतपणे नमूद केली आहे. ज्याप्रमाणे प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीने पिकास पाणी देण्याचे तंत्रज्ञान परंपरागत एका पिढीपासून दुस-या पिढीकडे शेतक-यास उपलब्ध होत असे किंवा आहे, तसे ठिबक सिंचन पद्धतीच्या वापराबाबत नाही. ही पद्धत नवीन आहे व त्यासाठीचे तंत्रज्ञान शेतक-यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विद्यापीठाच्या जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, आंतरशाखा पाणी व्यवस्थापन विभाग तसेच अखेिल भारतीय कार्यान्वित जलसिंचन व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणात संशोधनावर आधारित शेतक-यांसाठी उपयुक्त शिफारशी करून त्या शासनास सादर केल्या आहेत. त्यापैकी ठिबक सिंचन पद्धतीने पिकास पाणी किती द्यावे या संदर्भात माहिती प्रस्तुत लेखात दिली आहे. ठिबक सिंचन पद्धतीचे योग्य आरेखन व आराखडा तयार झाल्यावर प्रत्यक्ष शेतात ठिबक सिंचन प्रणाली बसविल्यानंतरचे महत्वाचे कार्य म्हणजे ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पिकांस गरजेप्रमाणे पाणी व खत देणे हे आहे. पिकाची पाण्याची गरज ही पिकाचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, पाणी देणे आवश्यक आहे. कमी पाणी दिल्यास पिकावर पाण्याचा ताण बसून उत्पादनात घट होऊ शकते तर जास्त पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होईल. हवामानासोबत पाण्याची गरज पीक व वाढीच्या अवस्थेवर अवलंबून असल्याने विविध पिकांसाठी पिकांच्या अवस्थेप्रमाणे गुणांक निश्चित करणे आवश्यक आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविधपिकांवर संशोधन करून पिकास गरजेप्रमाणे पाणी काढण्याची पद्धत विकसित केली आहे. पिकाची पाण्याची गरज काढण्याची पद्धत फळझाडांसाठी (म्हणजे जेव्हा दोन झाडामधील व झाडाच्या दोन ओळीमधील अंतर जास्त असते, उदा. डाळिंब, लिंबू, आंबा इ.) व ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकांसाठी (जेव्हा दोन रोपांमधील व रोपांच्या दोन ओळीमधील अंतर कमी असते, उदा. भाजीपाला पिके, ऊस इ.) वेगळी आहे. फळझाडांसाठी पाणी देताना मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रामध्ये ओलावा ठेवावा लागतो. या ओलाव्यासाठी प्रकारानुसार एका झाडाला लागणा-या तोट्यांची संख्या निश्चित करावी व नंतर संच चालविण्याचा कालावधी काढावा. ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकांसाठी दोन रोपांमधील अंतर कमी असल्याने संपूर्ण ओळीचा लागण्यासाठी जमिनीच्या प्रकाराप्रमाणे दोन तोट्यांमधील अंतर किती असावे हे ठरवावे लागते. त्यानंतर पिकाच्या पाण्याच्या गरजेप्रमाणे एका तोटीतून द्यावे लागणारे पाणी काढावे व नंतर संच चालविण्याचा कालावधी कार्यक्षम मुळांचे संपूर्ण क्षेत्र ओले ठेवण्यासाठी तोट्यांची संख्या काढावी लागते तर ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकांसाठी ओळीचा संपूर्ण पट्टा ओला ठेवण्यासाठी दोन तोट्यामधील अंतर काढावे लागते. अर्थात तोट्यांची संख्या अथवा दोन तोट्यांमधील अंतर हे आरेखन म्हणजेच डिझाईन करतानाच निश्चित करावे. फळझाडासाठी पिकाची पाण्याची गरज या लेखात नमूद केल्याप्रमाणे पिकाची पाण्याची गरज ही हवामान व हंगाम, पीक व पिकाची वाढीची अवस्था यावर अवलंबून असते. तसेच ठिबक सिंचन प्रणालीद्वारे संपूर्ण क्षेत्रावर पाणी न देता फक्त मुळाचे कार्यक्षम क्षेत्र ज्या भागावर पसरले आहे तेवढ्याच भागावर पाणी दिले जाते. पिकाची पाण्याची गरज काढताना या सर्व बाबींचा विचार करुन फळझाडांसाठी खालील सूत्र निश्चित करण्यात आले. पिकास लागणारे पाणी (लिटर/दिवस/झाड) = अ × ब × क × ड / ई अ = संदर्भिय बाष्पपणोंत्सर्जन (मि.मी./दिवस) ब = पीक गुणांक क = ओलीत गुणांक ड = झाडानी व्यापलेले क्षेत्र (वर्ग मीटर, मी. × मी.) ई = संचाची कार्यक्षमता ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकाची पाण्याची गरज ओळीत घेण्यात येणा-या पिकांसाठी ओळींचा संपूर्ण पट्टा ओला ठेवण्यासाठी पिकाची पाण्याची गरज खालील सूत्राद्वारे काढावी. पिकास लागणारें पाणी (लेिटर/दिवस/झाड़) = अ × ब x क × ड़ / ई अ = संदर्भिय बाष्पपर्णात्सर्जन ( मि.मी./दिवस) ब्र = पीक गुणांक क = ओलीत गुणांक ड = दोन तोर्टीमधील अंतर (मी.)×दोन उपनळ्यांमधील अंतर (मी.) ई = संचाची कार्यक्षमता वर दिलेल्या सूत्रांमध्ये वापरण्यात येणा-या घटकांची माहिती खालीलप्रमाणे काढावी. संदर्भिय ब्राष्पपणोंत्सर्जन (अ) : पिकाची पाण्याची गरज ही हवामानावार म्हणजे हवामानाच्या विविध घटकांवर (उदा. तापमान, आर्द्रता, वा-याचा वेग, दिवसाचे सूर्यप्रकाशाचे तास इ.) अवलंबून असते. संदर्मिय बाष्पपणोंत्सर्जन हे एका विशिष्ट संदर्भिय पिकासाठी बाष्पीभवन व पणोंत्सर्जनाद्वारे लागणा-या पाण्याची गरज दर्शविते. विविध पिकाची पाण्याची गरज ही पीक व पिकाची वाढीच्या अवस्थेप्रमाणे संदर्भिय बाष्पपर्णात्सर्जनाशी संबंधित असते व ह्या संबंध विविध पिकाच्या 'पीक गुणांका' द्वारे निश्चित केला जातो. म्हणजेच जर विशिष्ट पिकाचा त्याच्या वाढीच्या प्रमाणे पीक गुणांक माहीत असेल तर विशिष्ट जागेच्या हवामानाप्रमाणे सूत्रांच्या सहाय्याने संदर्मिय बाष्पपर्णात्सर्जन काढून विशिष्ट पेिकाची त्या वाढ़ींच्या अवस्थेसाठी बाष्पपर्णात्सर्जन किंवा पाण्याची गरज काष्ठ्ठता येते. संदर्भिय बाष्पपर्णात्सर्जन काढण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यापैकी खालील दोन पद्धती जास्त प्रचलित आहे. संदर्भिय बाष्पपर्णात्सर्जन काढण्याच्या पद्धती पेनमन मॉन्टिथ पद्धत या पद्धतीद्वारे जर आपणास विशिष्ट प्रदेशाचे दररोजचे कमाल तापमान, केिमान तापमान, कमाल आर्द्धता, केिमान आढंता, सूर्यप्रकाशाचे तास व वा-याचा वेग माहिती असेल तर सूत्राच्या सहाय्याने संदर्मिय बाष्पपर्णात्सर्जन काष्ठ्ठता येते. वरील सर्व हवामान विषयक माहिती वेधशाळेद्वारे किंवा स्वयंचलेित हवामान केंद्राद्वारे उपलब्ध होऊ शकतें. या हवामान घट्काची माहिती दररोज उपलब्ध होण्यास अडचणी असल्यास ब-याच वेळा मागील २५ ते ३g वर्षांच्या हवामानाच्या घटकाची माहिती घेऊन प्रत्येक आठवड्याचे सरासरी बाष्पपणाँत्सर्जन काढून त्याचाही वापर करता येईल. महात्मा फुले कृषि विद्यापीठाद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणा-या जिल्ह्यांसाठी दर आठवड्याचे सरासरी बाष्पपर्णात्सर्जन काढ्ले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने 'महावेध' अंतर्गत संपूर्ण राज्यात स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याचे योजिले आहे. त्याद्वारे दररोज हवामानाच्या घटकाविषयी माहिती उपलब्ध होऊन महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या फुलें जल' या संगणकीय प्रणालीद्वारे संदर्मिय बाष्पपर्णात्सर्जन काढता येईल. तसेच महात्मा फुलें कृषि विद्यापीठाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सिंचन पाणी गरज सेवा सला या प्रकल्पाद्वारे 'फुलें जल हे मोबाईल अँप विकसित केले आहे. सदर अॅपद्वारे शेतकरी पेनमन मॉन्ट४ किंवा इतर पद्धतीने विशिष्ट ठिकाणचे बाष्पपर्णात्सर्जन काढू शकतो. बाष्पीभवन पात्र पद्धत वर नमूद्ध केलेल्या घटकाचे मोजमाप करून (प्रचलित हुवामान केंद्र किंवा स्वयंचलित हुवामान केंद्राद्वारें) विविध सुत्रांच्याद्वारे संदर्मिय बाष्पपर्णात्सर्जन काढता येते. या सर्व हवामानाच्या घट्कांची माहिती काढणे किंवा मोजणे हे क्लिष्ट होऊ शकते. या सर्व घटकांचा एकत्रेित परिणाम पाण्याच्या बाष्पीभवनावर होतो. त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाविषयी माहिती असेल तर पिकाची गरज काळुता येते. संदर्भिय बाष्पपर्णात्सर्जनाची किंवा पाण्याच्या बाष्पीभवनाची माहिती हवामान खात्याच्या वेधशाळेमधून किंवा बाष्पीभवन पात्राद्वारे घेता येते. ब-याच वेळा वेधशाळेमधून माहिती घेण्यास विलंब लागू शकतो. अशावेळी शेतक-यांनी आपल्या शेतात बाष्पीभवन पात्र बसवल्यास त्याद्वारे पाण्याच्या बाष्पीभवनाचे मोजमाप करू शकतात. बाष्पीभवन पात्राची किंमत अंदाजे रु. २0,000 ते रु. ४0,000 च्या दरम्यान आहे. शेतक-यांनी आधीच ठिबक सिंचन प्रणालीवर बराच खर्च केला असतो. अशावेळी पात्रासाठी अधिक खर्च कशाला? असा प्रश्न उद्भवू शकतो. पण बाष्पीभवन पात्र प्रत्येक शेतासाठी वेगळं बसवण्याची आवश्यकता नाही. शेतकरी सामुदायिक पद्धतीने संपूर्ण गावासाठी एकाच बाष्पीभवन पात्राचा उपयोग क्ररू; 3ाक्रताहत. बाष्पीभवन पात्र आकृती क्र. १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे १.२ मीटर व्यासाचे व ३० सें.मी. खोलीचे दोन्ही बाजूने पांढ्या रंगाने रंगविलेले असते. हे पात्र लोखंडी पत्र्यापासून बनविलेले असते. हे पात्र शेतात एका लोखंडी चौकटीवर ठेवावे. चौकटींपासून हवा खेळत राहील हे बघावे. आकृती क्र.१ - बाष्पीभवन पात्र बाष्पीभवन पात्राच्या मध्यभागी एक दर्शक असतो. या दर्शकाला एक मोजपड़ीं बसविलेंली असतें. बाष्पीभवन पात्र प्रथम दर्शकाचें टोकापर्यत भरावे (सकाळी ८ च्या दरम्यान) दुस-या दिवशी सकाळी ८ वाजता, मागच्या संपूर्ण दिवसाच्या हवामानाप्रमाणे बाष्पीभवन पात्रामधल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खाली गेली असेल. पाण्याची पातळी किती मिलिमीटर खाली गेली हैं मोजपड़ींच्या सहायाने मोंजावे. हें मोजमाप म्हणजे एका दिवसात झालेले पाण्याचे बाष्पीभवन होय. बाष्पीभवन पात्रामधील पाण्याचे बाष्पीभवन संपूर्ण पीक असणा-या जमिनीमधून होणा-या बाष्पीयभवन पात्रातील पृष्ठभाग हा संपूर्ण पाण्याचा असल्याने होते. त्याचे तापमान वाढल्यामुळे तसेच बाष्पीभवन पात्रातील पृष्ठभाग हा संपूर्ण पाण्याचा असल्याने होते. परंतु बाष्पीभवन पात्रामधून होणारे बाष्पीभवन व जमिनीमधून होणारे बाष्पीभवन यामध्ये संबंध आहे. बाष्पीभवन पात्रातून होणारे बाष्पीभवन हे जमिनीमधून होणा-या बाष्पीभवनाच्या ७० ते ८o टक्के असते. यालाच बाष्पीभवन पात्र गुणांक असे संबोधतात. गुणांक असल्याने हा 0.७ ते 0.८ इतका घ्यावा. महाराष्ट्रासाठी हा गुणांक o.८ इतका घ्यावा. बाष्पीभवन पात्रातील बाष्पीभवनास बाष्पीभवन पात्र गुणांकाने गुणल्यास संदर्मिय पर्णात्सर्जन मिळते. पीक गुणांक (ब) : पाण्याची गरजही पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते. सुरुवातीच्या काळात गरज कमी असते. जशी वाढ होते तशी गरज वाढत जाऊन, पूर्ण वाढ झाल्यावर फुले व फळधारणा तक्ता क्र. १: काही प्रमुख फळझाडांचा पिक व ओलीत गुणांक अ.क्र. फळझाडे अंतर (मी.*मी.) लागवडीनंतरचे वर्ष १ २ ३ ४ ५ पी ओ पी ओ पी ओ पी ओ पी ओ १ चिकू ,आंबा,हळद 10 * 10 0.4० 0.2० 0.4० 0.25 0.50 0.33 0.60 0.40 0.65 ते 0.70 0.40 २ नारळ,आवळा 7 * 7 0.4० 0.2० 0.4० 0.33 0.50 0.33 0.60 0.40 0.65 ते 0.70 0.40 ३ संत्रा,पेरू,कागदी लिंबू 6 * 6 0.4० 0.2० 0.4० 0.33 0.50 0.33 0.60 0.40 0.70 ते 0.75 0.40 ४ बोर,डाळिंब,अंजीर 5 * 5 0.4० 0.2० 0.50 0.35 0.60 ते ०.65 0.40 0.60 ते0.65 0.40 0.60 ते 0.65 0.40 झाल्यावर गरज श्रोडी कमी होते. पीक व पिकाच्या अवस्थेप्रमाणे बदलती गरज ही पीक गुणांकाच्या सहाय्याने लक्षात येते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने काही पिकांसाठी पिकांच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पीक गुणांक प्रयोगाद्वारे निश्चित केले आहेत. सदर पीक गुणांक या विद्यापीठाच्या दरवर्षी प्रकाशीत होणा-या 'कृषि दर्शनी' या दैनंदिनींमध्ये उपलब्ध आहे. विशिष्ट प्रदेशासाठी पीक गुणांक उपलब्ध नसल्यास 'अन्न व कृर्षि संस्था' (एफएओं) ने प्रकाशित केलेले पीक गुणांक गृहीत धरावेत. पीक गुणांक हा साधारणतः पीक वाढीच्या अवस्थेप्रमाणे 0.२ ते १.२५ च्या दरम्यान असू शकतो. काही महत्वाच्या पिकांचा अधिकतम पीक गुणांक खालीलप्रमाणे आहे. भाजीपाला : 0.८५, फळझाडे : 0.७५, केळी : १.0, ऊस : १.१0 पिकांच्या अवस्थेप्रमाणे प्रमुख पिकांचा पीक गुणांक तक्ता क्र. १ व २ मध्ये नमूद केला आहे. ओलीत गुणांक (क) : कुठल्याही सिंचन पद्धतीने पिकास पाणी देताना हे त्याच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात द्यावे लागते. प्रवाही व फवारा सिंचन प्रणालीद्वारे पाणी हे जमिनीच्या संपूर्ण पृष्ठभागावर द्यावे लागते. त्यामुळे या पद्धतीमुळे मुळांच्या कार्यक्षम कक्षेसह इतरही भाग ओला होतो. परंतु ठिबक सिंचन प्रणालीमध्ये पाणी तोटीद्वारे मुळाच्या कक्षेमध्ये देता येते. त्यामुळे तोट्यांची संख्या व प्रवाह यांचा व्यवस्थित मेळ घडवून आणून फक्त पिकाच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेतच पाणी देता येते व बाकीचा भाग कोरडा ठेवता येतो. त्यामुळे ठिबक सिंचन प्रणालीद्वारे सिंचनाच्या पाण्याची मात्रा काढताना शेताचे किंवा झाडाचे संपूर्ण क्षेत्रफळ गृहीत न धरता फक्त जो भाग ओला करावयाचा आहे, तेवढाच गृहीत धरावा. त्यासाठी एकूण क्षेत्रफळास ओलीत गुणांकाने गुणावे. ओलीत गुणांक 0.१ ते १.० एवढा पिकानुसार गृहीत धरावा. ओलीत गुणांक पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सुध्दा बदलत जातो. मुख्यत्वेकरून फळझाडांसाठी सुरुवातीच्या काळात कार्यक्षम मुळांचे क्षेत्र हे जास्त नसल्याने ओलीत गुणांक सुध्दा कमी असतो व तो झाडाच्या वयाप्रमाणे वाढत जातो. हा नंतर स्थिर होतो. काही महत्वाच्या पिकांचा अधिकतम ओलीत गुणांक पुढीलप्रमाणे. खूप कमी अंतरावरची पिके (उदा. लसूण, कांदा, भुईमूग इ.) : १.o कमी अंतरावरची पिके (उदा. भाजीपाला, ऊस) : 0.६ ते 0.८ मध्यम अंतरावरची पिके (उदा. केळी, द्राक्षे) : 0.४ ते 0.६ जास्त अंतरावरची पिके (उदा. फळपिके, डाळिंब, लिंबू) : 0.२ ते 0.४ ५) खूप अंतरावरची पिके (उदा. आंबा, नारळ, चिकू) : 0.२ ते ०.२५ झाडांच्या वयोमानाप्रमाणे प्रमुख पिकांचा ओलीत गुणांक तक्ता क्र. २ व ३ मध्ये नमूद केला आहे. तक्ता क्र. ३ : विविध पिकांसाठी निश्चित केलेले ओलीत गुणांक ठिबक सिंचन पद्धतीने पिकाची पाण्याची गरज काढण्यासाठी 'ओलीत गुणांक' हा महत्वाचा घटक आहे. मफुकृवि ने विविध पिकांसाठी ओलीत गुणांक सन १९८५ पासून निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु त्या वेळची गरज तसेच उपलब्ध असणारे तंत्रज्ञान व संसाधने या प्रमाणे संदर्भिय बाष्पपर्णात्सर्जन यासाठी गुणांक काढताना ओलीत गुणांक व पीक गुणांक एकत्रित करण्यात आले. त्यामुळे ते गुणांक वापरताना पिकाची पाण्याची गरज काढतानाचे सूत्र खालीलप्रमाणे असावे. पिकास लागणारे पाणी (लिटर/दिवस/झाड किंवा तोटी) - अ X क X ड /इ अ, क, ड व इ हे सूत्र क्र. १ व २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे असावे. फळझाडांसाठी झाडांनी व्यापलेले क्षेत्र (ड) : एका झाडाने व्यापलेले क्षेत्र हे दोन ओळींमधील अंतर (मीटर) x एका ओळीतील दोन झाडांमधील अंतर (मीटर) याप्रमाणे काढावे. ओळीत घेण्यात येणा-या पिकांसाठी एका तोटीचे क्षेत्र (ड) : एका तोटीचे क्षेत्र हे उपनळ्यांमधील अंतर (मीटर) × एका उपनळीवर असलेल्या दोन तोट्यांमधील अंतर (मीटर) याप्रमाणे काढावे. दोन तोट्यांमधील अंतर हे जमिनीच्या प्रकारानुसार वर नमूद केल्याप्रमाणे निश्चित करता येते. दोन उपनळ्यातील अंतर हे निश्चित करताना पिकाच्या लागवडीच्या भूमितीय बाबी संबंधीच्या (उदा. दोन रोपामधील अंतर, रोपांच्या दोन ओळीमधील अंतर इ.) माहितीचा उपयोग करावा लागतो. ठिबक सिंचन प्रणालीच्या उपयोगाच्या सुरुवातीच्या काळात साधारणत: पिकाच्या एका ओळीस एका उपनळीचा उपयोग करण्यात येत असे. अशा स्थितीत दोन उपनळ्यामधील अंतर हे पिकाच्या दोन ओळीमधील अंतराएवढे असते. पण अशा पद्धतीत उपनळ्यांची संख्या त्या खर्चात बचत करण्यासाठी ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकांसाठी पिकांच्या दोन ओळीसाठी एक उपनळी ही संकल्पना अस्तित्वात दोन ओळी जवळ आणून त्या दोन ओळीमध्ये एक उपनळी वापरायची असते. ही पद्धत ठिबक सिंचन प्रणालीमध्ये 'जोडओळ' पद्धत म्हणून अस्तित्वात आली. जोड ओळ पद्धतीमध्ये दोन पिकाच्या ओळीजवळ आणून त्या अंतरापासून, जोडनळी पद्धतीसाठी लागणा-या एका जोडीच्या दोन ओळींमधील अंतर व दोन जोडींमधील अंतर खालीलप्रमाणे काढावे . एका जोडीच्या दोन ओळीमधील अंतर (सें.मी.), क = १/२ * घ दोन जोड ओळीमधील अंतर (सें.मी.), ख = १.५ *घ दोन उपनळ्यामधील अंतर (सें.मी.),ग = २* घ 'घ' म्हणजे पिकाच्या दोन ओळीमधील अंतर (सें.मी.) उदा. काही पिकासाठी जोडओळ पद्धतीसाठीचे माप पुढील प्रमाणे आहे. टोमॅटो : मध्यम ते भारी जमिनीत टोमॅटो पिकाच्या दोन ओळीमधील अंतर ९0 सें.मी. असते व एका ओळीत दोन रोपामधील अंतर ४५ सें.मी. असते, म्हणजे ९o × ४५ सें.मी. जोडओळ पद्धतीमध्ये, एका जोड ओळीतील दोन ओळीमधील अंतर (क) हे १/२ घ म्हणजेच १/२ x ९० = ४५ सें.मी. होईल. तसेच दोन जोडओळीमधील अंतर (ख) हे १.५ घ म्हणजेच १.५ × ९o = १३५ सें.मी. होईल. म्हणजेच (४५-१३५) x ४५ सें.मी. तसेच दोन उपनळ्यातील अंतर (ग) हे २ × घ म्हणजेच २ × ९0 = १८0 सें.मी. होईल. हलक्या जमिनीत टोमॅटोचे ६0 x ४५ सें.मी. हे अंतर जोडओळीत (३o-९o) x ४५ सें.मी. व दोन उपनळीमधले अंतर १२0 सें.मी. होईल. केळी : केळीची लागवड साधारणत: १८o x १५0 सें.मी. किंवा १५o x १५0 सें.मी. अंतरावर केली जाते. जोड ओळीमध्ये हे अंतर (९o-२७o) × १५0 से.मी. किंवा (७५-२२५) × १५0 सें.मी. असे होईल. दोन उपनळ्यामधील अंतर अनुक्रमे ३६० सें.मी. किंवा ३00 सें.मी. होईल. ऊस : ऊस पिकासाठी जोडओळ पद्धत थोड्या वेगळ्या प्रकाराने अवलंबिली जाते. यामध्ये उसाची लागवड करताना ७५ सें.मी. (हलक्या जमिनीत) किंवा ९० सें.मी. (मध्यम ते भारी जमिनीत) रुंदीच्या स-या तयार केल्या जातात. लगतच्या दोन सा-यामध्ये ऊस लागवड करून तिसरी सरी मोकळी ठेवली जाते. नंतर पुन्हा लगतच्या दोन सन्यामध्ये लागवड केली जाते. दोन उपनळीमधील अंतर अनुक्रमे २२५ (हलक्या जमिनीत) व २७o सें.मी. (भारी जमिनीत) एवढे असते. म्हणजेच - (९0-१८0) सें.मी. - भारी जमिनीत (७५-१५o) सें.मी.- हलक्या जमिनीत उसासाठी दोन जोड ओळ पद्धत सुद्धा वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये स-यांची रुंदी ७५ सें.मी. (हलक्या जमिनीत) किंवा ९० सें.मी. (भारी जमिनीत) ठेवली जाते. सलग चार स-यांमध्ये ऊस लागण करून नंतर एक सरी मोकळी ठेवून पुन्हा चार सन्यांमध्ये ऊस लागण केली जाते. प्रत्येक जोडओळीच्या दोन ओळीच्या मध्यात एक उपनळी बसविली जाते. म्हणजेच २ × (९o-१८0) सें.मी. - भारी जमिनीत २ × (७५-१५o) सें.मी. - हलक्या जमिनीत संचाची कार्यक्षमता (इ) : लेखाच्या वरील भागात नमूद केल्याप्रमाणे कार्यक्षमता ही आराखडा तयार करतानाची एक बाब आहे. ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा अपेक्षित कार्यक्षमतेसाठी तयार करता येतो. ठिबक संच प्रणालीसाठी लागणारा खर्च व पाणी वापराची कार्यक्षमता याचा योग्य मेळ घालून संचाची अपेक्षित कार्यक्षमता साधारणत: ९० ते ९५ टक्के (o.९० ते ०.९५) एवढी गृहीत धरावी. ३) महात्मा फुले कृषि विद्यापीठाने ठिबक सिंचन पद्धत अवलंबण्यासाठी विकसित केलेली संगणकीय प्रारुपे ठिबक सिंचन पद्धत व प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीच्या वापरात बराच फरक आहे. प्रचलित प्रवाही सिंचनाद्वारे पाणी विहिरीतून खेचून किंवा कालव्याद्वारे प्रत्येक शेतात विविध आराखड्याद्वारे (स-या, सरी/वरंबे किंवा आळे) उताराच्या सहाय्याने दिले जाते. परंतु ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाणी देताना विविध घटकांची आवश्यकता असते. उदा.पंप, विविध प्रकारच्या गाळण्या, खते देण्याची संयत्रे, नळ्यांचे जाळे (मुख्य नळी, उपमुख्यनळी, उपनळी) तोट्या, झडपा इत्यादी. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पिकास गरजेप्रमाणे तंतोतंत पाणी देता येते व पिकाची पाण्याची गरज ही विविध पद्धतीचे आरेखन, आराखडा व पाणी देण्याचे वेळापत्रक योग्य असेल तर ठिबक सिंचन पद्धतीचे अपेक्षित फायदे मिळू शकतात. त्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 'सिंचन पाणी गरज सेवा सल्ला' या प्रकल्पाद्वारे काही संगणकीय प्रारूप विकसीत केले आहे. ही सर्व प्रारूपे वापरण्यास सोपी व सुटसुटीत आहेत. त्याचा वापर संगणक असणारे शेतकरी, विविध पाणी वापर व उपसासिंचन संस्था, कृषि विभाग हे पाणी व्यवस्थापनाचा भाग म्हणून करू शकतात. फुले जल: या संगणकीय प्रारूपाद्वारे विविध पद्धतीचा अवलंब करून संदर्भिय बाष्पपणोंत्सर्जन काढता येते. त्या पद्धती व त्यासाठी आवश्यक असलेली हवामान घटकांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे. पद्धत हवामान घटकाची माहिती पद्धत हवामान घटकाची माहिती पेनमन मॉन्टिथ दिवसाचे कमाल व किमान तापमान आणि आर्द्रता, वा-याचा वेग व सूर्यप्रकाशाचे तास बाष्पीभवन पात्र दिवसाचे बाष्पीभवन, बाष्पीभवन गुणांक प्रिस्टले टेलर दिवसाचे कमाल व किमान तापमान आणि आद्रता व सूर्यप्रकाशाचे तास एफ.ए.ओ.:रॅडीएशन दिवसाचे कमाल व किमान तापमान आणि सूर्यप्रकाशाचे तास सुधारिता पेनमन दिवसाचे कमाल व किमान तापमान आणि आर्द्रता, वान्याचा वेग व सूर्यप्रकाशाचे तास सुधारिता पेनमन दिवसाचे कमाल व किमान तापमान आणि आर्द्रता, वान्याचा वेग व सूर्यप्रकाशाचे तास हारग्रीव्ह समानी दिवसाचे कमाल व किमान तापमान संदर्भिय बाष्पपर्णात्सर्जनाचा वापर करून पीक गुणांक व इतर माहितीचा अवलंब करून विविध पिकांची विविध हवामानाच्या प्रदेशात विविध पद्धतीद्वारे पिकाची पाण्याची गरज काढता येते. फुले ड्रीप इरीगेशन शेड्युलर : जेव्हा शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करतात तेव्हा त्यांना तो संच पिकास पाणी देण्यासाठी किती वेळ चालवावा, हे माहीत असणे आवश्यक असते. जेणेकरून पिकास पाणी कमी मिळणार नाही तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही. संच किती वेळ चालवावा हे ठिबक संचाची माहिती (तोटी, तोटीचा प्रवाह, दोन तोटीमधील अंतर, एका झाडास पाणी देणा-या तोट्याची संख्या, उपनळीमधील अंतर इत्यादी ), पीक (पीक गुणांक, पिकाच्या दोन ओळीमधील अंतर, एका ओळीतील दोन झाडांचे अंतर इ.); जमीन (जमिनीचा प्रकार, पाणी आत जाण्याची अंसरण गती); हवामान (बाष्पपणोंत्सर्जन काढण्यासाठी लागणारे हवामानाचे घटक) तसेच ठिबक संचाची पाणी देण्याची कार्यक्षमता इत्यादीवर अवलंबून असते. ‘फुले ड्रिप इरीगेशन शेड्युलर' या संगणकीय प्रारुपामध्ये जर ही सर्व माहिती दिली तर ठिबक संच नेमका किती वेळ चालवावा हे काढता येते. पाण्याची गरज शेतक-यांना त्वरित कळविण्यासाठी संदेश प्रणाली (Irrigation Water Requirement Advisory Source) महात्मा फुले कृषि विद्यापीठाने मागील २५ वर्षात पाणी व्यवस्थापन या विषयावर तंत्रज्ञान विकसित केले आहे व त्यावर आधारित संगणकीय प्रारूपेही तयार केली आहेत. याद्वारे महाराष्ट्रात घेण्यात येणा-या प्रमुख पिकांना विविध प्रकारच्या जमिनीत किती व केव्हा पाणी द्यावे तसेच तुषार किंवा ठिबक संच पीक, हवामान व जमिनीचा प्रकार याप्रमाणे किती वेळ चालवावा हे काढता येते. जर ही माहिती शेतक-यांना त्वरित कळविण्यात आली तर शेतकरी त्याप्रमाणे पिकास पाणी देऊ शकतील. जाळ्याची जोड द्यावी लागेल, कारण पाण्याची गरज ही पीक व जमीन या सोबतच त्या त्या भागाच्या हवामानावर अवलंबून असते. त्या करीता महात्मा फुले कृषि विद्यापीठाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आय.डब्ल्यु.आर.ए.एस.) ही प्रणाली प्रस्तावित केली आहे (आकृती क्र. २) तसेच त्यासाठीचे कार्य प्रगतिपथावर आहे. ही प्रणाली साधारणपणे पुढीलप्रमाणे कार्यान्वित होईल. शेतक-यांनी हंगामाच्या सुरुवातीस त्यांच्या शेत, पाण्याचे स्रोत, प्रपत्रात कृषी विभागाच्या सहकार्याने किंवा स्वतः यासाठी खास संकेतस्थळावर भरणे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या जाळ्याच्या सहाय्याने पिकाची पाणी गरज निश्चित करणा-या सर्व हवामान घटकाची माहिती एका केंद्रीय संगणकावर होईल व घटकांचे पुढील काही दिवसाचे अंदाज वर्तविण्यात येईल. 'फुले जल' या संगणकीय प्रारूपाद्वारे पिकाची पाण्याची गरज काढण्यात येईल. 'फुले ड्रीप शेड्युलर' या संगणकीय प्रारूपाद्वारे ठिबक संच चालविण्याचा कालावधी काढण्यात येईल. प्रत्येक शेतक-यांना त्यांनी लागवड केलेल्या पिकाची पाण्याची गरज, संच चालविण्याचा कालावधी इत्यादी माहिती त्वरित एसएमएस द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. माहिती संकेतस्थळावर तसेच ई-मेलद्वारेही शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात येईल. ४) मोबाईल अॅप्स महात्मा फुले कृषि विद्यापीठाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 'फुले जल' व 'फुले इरिगेशन शेडयुलर' हे मोबाईल ऑप्स अनुक्रमे संदर्भिय बाष्पपणोंत्सर्जन व पिकाची पाण्याची गरज व संच चालविण्याचा कालावधी काढण्यासाठी विकसित केले आहे. ‘फुले जल' या मोबाईल अॅपद्वारे या स्थळाचे किंवा भागाचे संदर्भिय बाष्पपणोंत्सर्जन काढावयाचे आहे, त्या स्थळ किंवा भागाचे संदर्भिय बाष्पपणोंत्सर्जन काढण्यासाठी लागणा-या सर्व हवामानाच्या घटकांची माहिती एकत्रित होऊन त्या दिवसाचे तसेच पुढील ४ ते ५ दिवसांचे संदर्भिय बाष्पपणोंत्सर्जन काढण्यात येते. याचा उपयोग सिंचनाची पाण्याची गरज काढण्यासाठी होतो. 'फुले इरीगेशन शेड्युलर' या मोबाईल अॅपमध्ये शेतक-यांनी त्यांच्या शेताबाबत पिकाची, जमिनीची व सिंचनप्रणालीची माहिती भरुन नोंदणी करावयाची आहे. जेव्हा शेतक-यांना सिंचन द्यावयाचे आहे तेव्हा सदर माहितीचा अवलंब करून मोबाईल अॅपमध्ये असलेल्या इतर माहितीचा तसेच शेताच्या ठिकाणच्या उपलब्ध होणा-या हवामान घटकांच्या माहितीद्वारे त्या दिवशी पीक, पिकाची वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, सिंचन प्रणालीचा प्रकार व कार्यक्षमता यावर आधारित सिंचनाची पाण्याची गरज व संच चालविण्याचा कालावधी त्वरित शेतक-यांना उपलब्ध होईल. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेद्वारे विकसित केलेल्या संगणकीय प्रारूपे तसेच मोबाईल अॅप्सची विस्तृत माहिती स्वतंत्र लेखाद्वारे वाचकांना तसेच शेतक-यांच्या उपयोगासाठी देण्यात येईल. अशाप्रकारे महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत प्रत्यक्ष उपयोगाकरिता प्रसारित करुन पाण्याचा कार्यक्षम वापर करून कृषी उत्पादनात भर टाकता येईल. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन