कृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. तद्अनुषंगाने नियंत्रित शेतीकरिता लागणारी साधने व नियंत्रित शेतीमुळे भविष्यात निर्माण होणा-या संधी इत्यादींबाबतची माहिती येथे नमूद केली आहे. नियंत्रित वातावरणातील शेती व त्याचे महत्व नियंत्रित वातावरणातील शेती संबंधात चर्चा करताना हरितगृह (ग्रीनहाउस), काचेचे गृह (ग्लास हाऊस), पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, नेट हाऊस यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो तसेच नियंत्रित वातावरणात शेती करणे म्हणजे यापैकी कुठल्यातरी गृहात पीक घेणे किंवा शेती करणे असा अर्थ होतो. वर उल्लेखलेल्या गृहाद्वारे पिंकाला पोषक असे किंवा त्याच्या जवळपास वातावरणाची निर्मिती करून पिकाच्या उत्पादनात व गुणवत्तेत भरीव वाद्ध करता पेंतें. वर्षभर वेगवेगळ्या हंगामात पिकांना हवे तसे वातावरण मिळू शकत नाही. मात्र बाजारपेठेतील मागणीनुसार वर्षभर फळे, भाजीपाला व फुले यांचे उत्पादन घेणे शेतक-यांस फायदेशीर ठरतं. त्यासाठी अर्थातच वातावरणातील घटक पिकांच्या गरजेप्रमाणे नियंत्रित करणे महत्वाचे आहे. 'ग्रीनहाऊस इफेक्ट' या संकल्पनेचा उपयोग थंड हवेच्या देशात हरितगृहामधील तापमान वाढविण्यासाठी केला गेला पण आपल्याकडे तपमान कमी करणे तसेच वातावरणातील इतर घटकांचे नियंत्रण करण्यासाठी हरितगृह व शेडनेटगृहाचा वापर करणे शक्य झाले आहे. हरितगृहामध्ये वातावरणातील तापमान, आर्दता, प्रकाश वेगवेगळे तंत्र वापरून नियंत्रिंत (कमीं किंवा जास्त) केले जातें तर्सेच कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण ही राखता येते. शेड्नेंटगृहामध्ये मुख्यतः वातावरणातील तापमान कमी केले जाते तसेच आर्दता, वारा यांचे ही नियंत्रण करता येते. शेंडनेटगृहू व हरितगृह यांचा उपयोग निरनिराळ्या भाजीपाला व फुलपिकांसाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून उपयुक्त अशी वातावरणनिर्मिती करून चांगल्या प्रतीचे जास्त उत्पादन मिळवण्यासाठी करता येतो. पिंकांच्या उत्पादनवाढीचा कालावधी कमी-अधिक करण्यासाठी नियंत्रित वातावरणाच्या हरितगृहाचा उपयोग होतो. तर आपण फक्त 'हरितगृह प्रभावाचा' वापर करून तपमान वाढविण्यासाठीच हरितगृहाचा वापर न करता हवामानाच्या इतर घटकांवर सुध्दा कमी-अधिक प्रमाणात पिकांच्या आवश्यकर्ते प्रमाणे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतो. ब-याच वेळेला शेतक-यांना प्रश्न पडतो की हरितगृह किंवा पॉलीहाऊस करावें की शैड़नेटहाऊस? क्यासाठीं आपल्याला आधीं दोन्हींमधील फरक समजून घ्यावा लागेल. सर्वात प्रथम हे समजून घ्यावे की शेडनेट हाउस हे पावसाळ्यात पिकांना पावसापासून संरक्षण देऊ शकत नसल्याने यामध्ये आपण आठ महिनेच शेती करु शकतो. दुष्काळी परिस्थितीत किंवा अतिशय कमी पावसाच्या ठिकाणी आपण १२ महिने यामध्ये किंफायती शेती करु शकतो. शेड्नेटहाऊसला पॉलिहाऊसच्या तुलनेत १/३ पर्यंत कमी खर्च पेंतों. वरील बाबी लक्षात घेतल्यावर निर्णय घेताना आर्थिक निकष पाहूनच घ्यावा. उदा. कुठले पीक घेत आहोत व त्याला बाजारभाव किंती मिळणार आहे व मिळालेला नफा केलेल्या अधिक खर्चाच्या तुलनेत अधिक आहे का ? हाच विचार किंबहुना गोल छताच्या किंवा सपाट छताच्या शेडनेट हाऊससाठी व नियंत्रित पॉलीहाऊस'साठी देखील करावा. संरक्षित शेतीमध्ये सर्वात कमी खर्चात आपण शेतीच्या चारही बाजूने (Insect Net) व (UV Film Geomembrane Fabric) चे कनात/पडदे लावून देखील चांगला लाभ मिळवू शकतो. यामुळे आपल्याला बाहेरील रोग/किड यांचा प्रादुर्भाव रोखण्यात किंवा कमी करण्यास मदत मिळते तसेच जोरदार वा-यापासून देखील चांगले संरक्षण मिळते. याचबरोबर रात्रींचे कार्बन डायऑक्साइडचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी देखील याचा फायदा मिळू शकतों नेियंत्रित वातावरणातील शेतीचे फायदे पिंकाच्या आवश्यकतेप्रमाणे वातावरण निर्मिती केल्यामुळे हरितगृहू/ शेडनेटगृहाचे अनेक मुख्य व पूक फायदे खालीलप्रमाणे आहेत. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी वातावरण निर्मिती करता येऊ शकते पिकाचे उत्पादन/ उत्पादकता व गुणवत्ता यांच्यात लक्षणीय सुधारणा होते व चांगल्या गुणवत्तेमुळे बाजारभाव चांगला मिळतो. बाजारपेठेतील मागणीप्रमाणे योग्य तें नियोजन करून वर्षभर फळभाजी व फुले यांचा पुरवठा करता येऊ शकतो. नेिविष्ठांच्या वापरावरही नियंत्रण ठेवता येते, त्यामुळे कमीतकमी शेती नेिविष्ठांचा वापर करता येतो. पाणीवापरामध्ये लक्षणीय बचत होते. पीक संरक्षणामध्ये किंडी व रोगांच्या प्रादुर्भावास व लागणीस अटकाव होतो. उचदर्जाची फळे व भाजीपाला याबरोबरच वजन, रंग व स्वाद वाढल्यामुळे बाजारामध्ये वाढीव दर मिळतो. पिंकाचे अतेि व कमी तापमान, वारा, गारठा, बर्फ, पक्षी व कीटक यांच्यापासून संरक्षण होते. त्याचप्रमाणे पिकाचे पावसाळ्यात गारांपासून तसेच अतिवृष्टींपासून बचाव होण्यास मदत होतें. कमी पाणी व कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न मिळण्याची संधी प्राप्त होतें. रॉजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणावर सहाय्य होते. याचसोबत हरितगृहू/शेड्नेट्याहू यामध्ये शेती करण्याच्या काही मर्यादाही आहेत, हरितगृह/शैडनेटगृहाच्या उभारणीसाठी प्रारंभिक खर्च जास्त येतो. तसेच प्रत्यक्ष शेती करताना अधिक भांडवलामुळे शेतकरी या शेतीकडे वळत नसला तरी, कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याने जास्त झालेला खर्च वसूल होऊ शकतो. तसेच शासकीय अनुदानाचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. हरितगृह / शेडनेटगृह उभारणी तसेच त्यामध्ये शेती करण्याचे तंत्रज्ञान पारंपरिक शेतीप्रमाणे शेतक-यांना उपलब्ध नसल्याने प्रथमतः ही शेती करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु कृषि विद्यापीठे तसेच राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHM), तळेगाव दाभाडे येथील प्रशिक्षण सुविधांचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. हरितगृह / शेडनेटगृहामधील रोग व कोड नियंत्रण जरी सुलभ असले तरी याकडे थोडेही दुर्लक्ष केले तर त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण याकडे नियमित लक्ष ठेवल्यास यावर मात करता येते. हरितगृह / शेडनेटगृहाचा उपयोग खालीलप्रमाणे करता येतो. फुले, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे भाजीपाला व शोभिवंत रोपांची रोपवाटिका तयार करणे उतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण करणे भाजीपाला पिकांच्या जाती व बीज उत्पादन घेणे. पिकांचे संशोधन व विकास करणे गारा, बर्फ इ. पासून संरक्षण करणे. हरितगृह / शेडनेटगृहामध्ये खालील पिकांचे व्यापारी तत्वावर उत्पादन घेता येते. फुलपिके : हरितगृहामध्ये प्रामुख्याने दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले यासारख्या फुलांचा समावेश असतो. भाजीपाला : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळी इ. चे उत्पादन घेतले जाते. पालेभाज्या : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी इ. चे उत्पादन घेतले जाते. जास्त किंमतीचा भाजीपाला : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये ब्रोकोली, झुकेनि, लॅटयुस, लिक, पार्सेली इ. चे उत्पादन घेतले जाते. औषधी पिके : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये हळद, आले, चिवस, मीट, बसीगिल, इ.चे उत्पादन घेतले जाते. फळे : हरितगृह / शेडनेटगृहामध्ये स्ट्रॉबेरी, टरबूज, डाळींब, द्राक्ष, केळी इ. चे उत्पादन घेतले जाते. हरितगृह हरितगृहाचा उपयोग संरक्षित वातावरणात शेती करण्यासाठी होतो. हरितगृहाची व्याख्या करायची झाली तर अशी करू शकतो- 'पारदर्शक एफ.आरपी किंवा काच यापासून तयार करण्यात येणा-या आवरणाने आच्छादित केलेल्या रचनेला हरितगृह असे म्हणता येईल.' ही आवरणे बाहेर जाण्यापासून रोखतात. त्यामुळे हरितगृहात पिकांच्या वाढीसाठी उत्तम वातावरण तयार होते. हरितगृहाचे प्रकार वातावरण नियंत्रित हरितगृह: या प्रकारच्या हरितगृहामध्ये वातावरणाला नियंत्रित करण्यासाठी विविध उपकरणाचा वापर केला जातो, जसे वायुर्वीजन पंखे, हवा खेळती ठेवण्याचे पंखे, सेल्युलोज कुलींग पॅड, फॉगर्स, हीटर, कृत्रिम प्रकाश, कार्बन डायऑक्साईड बर्नर/सिलिंडर फॅन, पॅड व इतर उपकरणासाठी विजेची गरज असते. तसेच पडद्यावर पाणी पडण्यासाठी विद्युत पंप तसेच नळजोडणी असणे आवश्यक आहे. नैसर्गिक वायुवीजन हरितगृह : या प्रकारचे हरितगृह नैसर्गिक वायुर्वीजनावर आधारित असून यामध्ये पिकांच्या आवश्यकतेप्रमाणे तापमान, आद्रता व कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण राखता येते. यामध्ये कीटक व जिवाणूंचा प्रवेश टाळण्यासाठी प्लॅस्टिकची जाळी (इन्सेक्ट नेट) वापरण्यात येते. हरितगृहाच्या वायुविजनसाठी ठेवलेली उंचीवरील झडप ही उत्तर किंवा पूर्व दिशेस उघडणारी असावी, म्हणजेच हरितगृहाचे तापमान कमी राखण्यास मदत होते. वायुर्वीजन म्हणजे हरितगृहातील गरम हवा बाहेर काढणे व हरितगृहातील तापमान, आर्द्रता, कार्बनवायु व पिकाभोवतालची खेळती हवा नियंत्रित ठेवणे होय. हरितगृहाच्या वायुविजनसाठी एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्र थंड हवा आत येण्यासाठी व आतील हवा बाहेर काढण्यासाठी उघडे ठेवण्याची सोय सिस्टीम असणे आवश्यक आहे. पिकांच्या गरजेनुसार छताला ५० टक्के व बाजूला ३५ टक्के पांढ-या रंगाची यु.व्ही. स्टॅबीलॉईड शेडनेट असावी. हरितगृहासाठी जागेची निवड काळी निचरा न होणारी जमीन असेल तर दोन इंच जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाफे करावेत व हरितगृहाभोवती दीड फूट × दीड फूट आकाराचा चार काढावा जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल; भरपूर सूर्यप्रकाश या ठिकाणी हरितगृहास मिळू शकेल अशी जागा निवडावी; शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे; पाणथळ जागा हरितगृहासाठी वापरू नये; मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा निवडू नये; पाणी पुरवठ्याच्या सुविधा जवळपास असणे आवश्यक आहे. पाण्याचा सामू ६.0 ते ७.५ च्या दरम्यान व क्षारतेचे प्रमाण जास्तीतजास्त 0.१ ते 0.५ मि.ली.मोहोज/सें.मी. (mmhos/cm) इतके असणे अपेक्षित आहे; विद्युत पुरवठ्याची सुविधा आवश्यक आहे. हरितगृहाची दिशा ठरविताना दोन बाबी विचारात घ्याव्यात. वाढणा-या पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा. शक्यतो मल्टीस्पॅन हरितगृहाच्या गटरची दिशा दक्षिण-उत्तर ठेवावी तसेच वरील झडप (व्हेन्ट) पूर्व/उत्तर दिशेस येईल, असे पहावे. हरितगृह उभारणीसाठी लक्षात ठेवावयाच्या तांत्रिक बाबी खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार १.५ × १.५ फूट असावा व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे खड्ड्याची खोली २ ते ३ फूट असावी. त्यात मधोमध फाउंडेशन पाईप बसवून त्यास होल्डफास्ट बार टाकून काँक्रीट भरताना सिमेंट, वाळू व खडीचे प्रमाण १:४:८ याप्रमाणे घ्यावे. गटरला उतार हा पाया करताना १.५ ते २ टक्के ठेवावा. छताला ठेवण्यात येणारे व्हेन्ट 0.८ ते १.0 मीटर उंचीचे असावे व व्हेंन्टची दिशा पूर्व किंवा उत्तर असावी. दोन कंपार्टमेंटमधील छताला पॉलिथिन फिल्मवरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी जी. आय. पत्र्याचे (१ मि.मी. जाडी) किंवा २ ते ३ मि.मी. जाडीची अतिनील स्थिर पालीथीलीन कापडाच्या फिल्मचे गटर असावे. छतासाठी लागणारी फिल्म अल्ट्राव्हायोलेट स्टॅबिलाईड प्लॅस्टिकची असावी व त्याची जाडी २oo मायक्रॉन / ८oo गेज असावी. फिल्म वापरताना इतर निकष आय.एस.-१५८२७:२00९ मानांकनाप्रमाणे असावे. साधारणपणे १ किलो फिल्ममध्ये ५.३ चौ.मी. क्षेत्र आच्छादता येते. फिल्मची पारदर्शकता उच्च दर्जाची (८o ते ८५ टक्के) असावी. पॉलिथिन फिल्मची फिटींग अॅल्युमिनीयम चॅनल पट्टीमध्ये जी.आय. स्प्रिंगच्या सहाय्याने करावी. चारही बाजूने वायुर्वीजनासाठी २ मीटर उंचीची जागा ठेवावी व ती रात्रीच्या वेळी पडद्याच्या सहाय्याने बंद करण्याची सोय ठेवावी. हरितगृह उभारणीसाठी वापरण्यात येणा-या साहित्यापैकी या साहित्यांचे आयएसआय / बी.आय.एस. मानके निश्चित करण्यात आलेली आहेत ते साहित्य मानकाप्रमाणे असणे आवश्यक आहे. पॉलिथिन : अतिनील किरणे स्थिर (UV Stabilized) ३५0 एनएम, डिफ्युझङ्, २०० मायक्रॉन जाडी, मल्टीप्लेयर (कमीतकमी ३ थर) आय.एस. - १५८२७:२00९ बी.आय.एस. मानांकनानुसार असावी. शेडनेट : अतिनील किरणे स्थिर (UV Stabilized) ५० टक्के (१oo जी.एस.एम.) किंवा ७0 टक्के (१२0 जी.एस.एम.) आय.एस.-१६00८:२0१२ बी.आय.एस. मानांकनानुसार असावी. इन्सेक्टनेट : अतिनील किरणे स्थिर (UV Stabilized) ४0 मेश, पांढरा रंग, १o५-११0 जीएसएम, कर्टनच्या पाठीमागे. अॅल्युमिनियम प्रोफाईल : १९o-२२0 ग्रॅम/मी. लॉकिंग स्प्रिंग : २.३ मि.मी. जाडी, दोन्ही बाजूने पावडर कोटेड, हरितगृह/शेडनेटहाऊस यामध्ये स्टील वायर रोप वापरल्यास ते मानांकनाप्रमाणे असावा. 8. सर्वसाधारण प्रकारचे हरितगृह उभारणीसाठी विविध भाग / बाबीसाठीचे तांत्रिक निकष खालीलप्रमाणे आहेत. सर्व पाईप गॅलव्हानाईड आयर्न (जी.आय.) चे असावेत. पाईपचा व्यास २.५' असावा व त्याची जाडी बी.आय.एस. नामांकनानुसार २.९ मि.मी. असावी. पाईप एकमेकांना वेल्डिंगने न जोडता नष्टबोल्टने जोडावेत. हरितगृहाच्या पायाचा ढाळ १.५ ते २ टक्के असावा. त्याचबरोबर गटरचा ढाळ सुध्दा हरितगृहाच्या पायाइतकाच असावा. हरितगृहामध्ये उभारल्या जाणा-या पाईपांच्या दोन ओळीतील अंतर ८ मीटर व दोन पाईपमधील अंतर ४ मीटर असावे. हरितगृहाची उंची ६ ते ६.५ मीटर असावी. गटरची उंची कमीतकमी ४ मीटर असावी. बाजूचे पडदे कमीतकमी २ मीटर उंचीचे ठेवावेत. हरितगृहातील वरील बाजूची वायुविजनसाठी असलेल्या खिडकीची उंची कमीतकमी १ मीटर असावी. ९) वातावरण नियंत्रित हरितगृहाच्या उभारणीसाठी सर्वसाधारण तांत्रिक निकष खालीलप्रमाणे असावेत. हरितगृहाच्या पायाचा ढाळ १.५ ते २ टक्के असावा. त्याचबरोबर गटरचा ढाळ सुध्दा हरितगृहाच्या पायाइतकाच असावा. हरितगृहामध्ये उभारल्या जाणा-या पाईपांच्या दोन ओळीतील अंतर ८ मीटर व दोन पाईपमधील अंतर ४ मीटर असावे. हरितगृहाची उंची कमीतकमी ४ मीटर असावी. हरितगृहातील पेंडस् व फॅन उभारणीसाठी १.५ फूट खोल व १.५ फूट रुंद आकाराचे खडे काढावेत या खड्ड्यामध्ये ८ इंच नंतर १:४:८ या प्रमाणात सिमेंट, वाळू, खडी यांचे मिश्रण ४ इंचापर्यंत भरून घ्यावेत. त्यानंतर राहिलेल्या ६ इंच खोल खड्ड्याचा भाग विटाने बांधून घ्यावा व त्यावर २ फूट उंच विटांची भिंत बांधून त्यावर पॅडस् व फॅन बसवावेत. विटाने बांधलेल्या भिंतींना प्लॅस्टर करुन सिमेंटपेंटचे २ थर द्यावेत. या प्रकारच्या हरितगृहात सेल्युलोज प्रकारचे पॅड वापरणे आवश्यक आहे. इतर प्रकारचे पॅड वापरू नयेत. आच्छादन साहित्याचे गुणविशेष आच्छादनासाठी वापरावयाच्या साधनांमध्ये खालील गुणधर्म असणे आवश्यक असते. प्रकाश पारदर्शकता व प्रसारण : आच्छादनाने हरितगृहात सर्वाधिक उजेड प्रसारित करतानाच पिकासाठी हानिकारक ठरणा-या घटकांना (अतिनील, अवरक्त किरणे) रोखले पाहिजे. सूर्यप्रकाशात विविध तरंग लांबीचे किरण असताना व त्यात मानवाला तसेच झाडांसाठी उपयुक्त असणारे किरण ४oo ते ७o० नॅनोमीटर या तरंगलांबीचे असतात. म्हणून हरितगृहासाठी वापरली जाणारी पॉलिथिन बनविताना ती केवळ प्रकाश संश्लेषणासाठी लागणारे किरणच प्रसारित करेल अशी असावी लागते. दीर्घकाळ टिकाऊक्षमता : फिल्मच्या पॉलिथिनवर सूर्यकिरणातील अतिनील किरणांचा परिणाम होतो. या घटकापासून संरक्षण करण्यासाठी फिल्ममध्ये काही विशिष्ट रसायने मिसळली जातात. या रसायनांमध्ये अतिनील किरण शोषून घेणारे किंवा अतिनील किरणांचे स्थिरीकरण करणारे घटक असतात. या रसायनामुळे पॉलिथिनच्या विघटनाचा वेग कमी करता येतो. टिकाऊपणास कारणीभूत असलेला दुसरा घटक म्हणजे त्याची जाडी होय. अधिक जाड फिल्म लवकर खराब होत नाही. धुके प्रतिबंधकता : फिल्ममध्ये काही धुके प्रतिबंधक घटकांचा वापर केलेला असतो. हे घटक फिल्मवर साबणासारखे काम करतात. यामुळे दवामुळे फिल्मवर साचलेले पाणी तिथेच टपकण्याऐवजी फिल्मवर पातळ थर निर्माण करतात. त्यामुळे पाणी ठिबकत नाही. धूळ प्रतिबंधक : हरितगृहाच्या फिल्म्सवर धूळ जमा होऊन प्रकाशाचे प्रसारण कमी होते. हे होऊ नये, यासाठी विशिष्ट घटक वापरून फिल्म गुळगुळीत केली जाते. त्यामुळे फिल्मवर धूळ चिकटणे काही प्रमाणात कमी होते. पाकळ्यांच्या काळपटपणास प्रतिकारकता : सूर्यप्रकाशातील इन्फ्रा रेड किरणांमुळे काही लाल गुलाबांच्या जातीच्या पाकळ्या काळपट होतात. ही विकृती कमी करण्यासाठी इन्फ्रारेडरोधक फिल्म्स वापरली जाते. शैवाल प्रतिकारकता : पावसाळ्यात फिल्मवर शेवाळ तयार होऊन प्रकाशाचे प्रसारण कमी होते, त्यावर शैवाल प्रतिकारक घटक वापरुन हा त्रास कमी करता येतो. हरितगृह उभारणीसाठी निश्चित केलेले खर्चाचे मापदंड हरितगृहाच्या उभारणीसाठी आकारमानानुसार व विविध प्रकारानुसार प्रती चौ. मी. क्षेत्रासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज तक्ता क्र. १ मध्ये दिला आहे. यामध्ये साहित्य खर्च ,बांधकाम खर्च,मंजुरी खर्च , वाहतूक खर्च तसेच एेचछिक खर्च या सर्व घटकांसाठी येणारा खर्च विचारात घेतला आहे. तक्ता क्र. १ : विविध प्रकारच्या व आकाराच्या हरितगृहासाठी येणारा अंदाजे खर्च प्रकार एकूण क्षेत्र (चौ.मी.) मॉडेलनुसार हरितगृहाचा आकार (मीटर) प्रती चौ. मी. खर्च मापदंड (रु) सर्वसाधारण क्षेत्र अधिसूचित डोंगराळ क्षेत्र हरितगृह (नैसर्गिक वायुवीजन) 560 20*8 935 1075 560 28*20 935 1075 1008 28*36 935 1075 1008 36*28 935 1075 2016 36*56 890 1024 2080 52*40 890 1024 3120 52*60 844 971 3120 60*52 844 971 4080 66*68 844 971 4000 100*40 844 971 हरितगृह (वातावरण नियंत्रित 1008 36*28 1465 1685 1008 28*36 1465 1685 2016 36*56 1308 1504 2080 52*40 1366 1571 3120 52*60 1293 1487 3120 68*60 1400 1610 4080 68*60 1400 1610 4000 100*40 1325 1524 शेडनेटगृह शेडनेटगृह हे सांगाडा म्हणजे फ्रेम असलेले घर असून ते जी. आय पाईप, लोखंडी अँगल्स, लाकूड किंवा बांबू यांपासून बनविलेले असते. ते निरनिराळ्या सावलीच्या गुणांकाच्या प्लॅस्टीकच्या जाळीने (शेडनेटस) झाकलेले असते. या जाळ्या विशिष्ट यु.व्ही. संस्कारीत अशा १oo टक्के पॉलीईथिलिन धाग्यांपासून तयार केलेल्या असतात. या शेडनेटच्या सहाय्याने दिवसा पिकांसाठी प्रकाशाची तीव्रता व प्रभावी उष्णता कमी करता येत असल्याने ब-याच अंशी वातावरणावर नियंत्रण करता येते. यामुळे हरितगृहाप्रमाणे शेडनेटगृहाचा उपयोग निरनिराळ्या भाजीपाला व फुलपिकांसाठी उपयुक्त अशी वातावरण निर्मिती करून 'चांगल्या प्रती’ चे जास्त उत्पादन मिळविण्यासाठी करता येतो. शेडनेटगृहात वातावरणातील तापमान, आर्द्रता, कर्बवायु, वारा इत्यादी घटकांवर ब-याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येत असल्याने शेडनेटगृहातील पीक लागवड ही उघड्या शेतातील पीक लागवडीपेक्षा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. ज्यावेळेस उन्हाची तीव्रता जास्त असते अशावेळेस पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त तापमानात तग धरणे कठीण होते. शिवाय उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धताही कमी असते. कमी पाण्यात व अति तापमानात पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतात व उत्पादनात लक्षणीय घट आल्याने उत्पन्न कमी मिळते. अशास्थितीत पिकांना शेडनेटच्या सहाय्याने सावली केली तर वातावरणातील तापमान तर कमी होतेच शिवाय पिकांची पाण्याची गरज सुध्दा कमी होते व त्यामुळे पीक लागवड यशस्वी होते. पिकांसाठी शेडनेटगृहाचे क्षेत्र ५ गुंठ्यापासून १ एकरापर्यंत असू शकते. शेडनेटगृहाचे प्रकार शेडनेटगृहाचे छताच्या आकारानुसार साधारणपणे खालीलप्रमाणे प्रकार आहेत . अ) सपाट छताचे शेडनेटगृह (फ्लॅट रुफ) : कमी उंचीचे (३.२५ मी.), जास्त उंचीचे (४ मी.) ब) गोलाकार छताचे शेडनेटगृह (डोमशेप रुफ) : कमी उंचीचे (४ मी.), जास्त उंचीचे (५ मी.) शेडनेटगृहासाठी जागेची निवड शेडनेटगृह उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर जागेची निवड चुकली तर शेडनेटगृहातील पीक लागवड अपयशी ठरू शकते. त्यासाठी जागेची निवड करताना खालील बाबींचा अवलंब करणे आवश्यक असते. जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी. निचरा होणारी जमीन नसेल तर शेडनेटगृहाभोवती चर अथवा दांड काढावा की यातून पाण्याचा निचरा होईल व शेडनेटगृहामध्ये जमिनीतील पाण्याची पातळी पिकाच्या मुळांच्या खाली राहील. पाणथळ जागा शेडनेटगृहासाठी निवडू नये तसेच शेडनेटगृहाची जागा खोलगाट ठिकाणी नसावी. शेतात उंचसखल जमीन असल्यास किंवा जास्त उतार असल्यास जागेचे सपाटीकरण करणे गरजेचे असते. पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ दरम्यान व क्षारतेचे प्रमाण कमी असलेल्या जागा योग्य असतात. पाणी पुरवठ्याची सुविधा जवळपास असावी. तसेच विद्युतपुरवठ्याची सुविधा असावी. इमारती, मोठे वृक्ष, इ. ची सावली शेडनेटगृहावर पडणार नाही, अशी जागा निवडावी. निवडलेल्या जागेत भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. शेडनेटगृहाची दिशा शेडनेटगृह उभारताना गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाची दिशा दक्षिणोत्तर (दक्षिण- उत्तर) अशी ठेवावी. मात्र सपाट शेडनेटगृहासाठी कुठलीही दिशा ठेवली तरी चालते. शेडनेटगृहाची उभारणी शेडनेटगृह उभारताना खालील बाबी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक वरील घटकांचे / बाबींचे तांत्रिक निकष पुढे सविस्तर दिलेले आहेत. शेडनेटगृहाचा पाया (फाउंडेशन) शेडनेटगृहाच्या क्षेत्रानुसार जमिनीवर मोजमाप करुन टेलीस्कोपिक फाउंडेशनसाठी आरेखन करावे. ज्या ठिकाणी फाउंडेशन येणार असतील त्याठिकाणी २ फूट खोलीचा व १ x १ फूट मापाचा सरळ उभा खडुा घेऊन त्यामध्ये १o0 सें.मी. लांबीचा, १.२५ इंच व्यासाचा (कमी उंचीच्या शेडनेट हाउससाठी) / १.५0 इंच व्यासाचा (जास्त उंचीच्या शेडनेट हाउससाठी) व कमीत कमी २ मि.मी. जाडी असलेला जी.आय.पाईप उभा बसवून त्यास होल्डफास्टबार टाकून सिमेंट काँक्रीटच्या (सिमेंट : खडी : वाळू १:२:४ या प्रमाणात) सहाय्याने खडुा भरून घ्यावा. मात्र सपाट छताच्या शेडनेटगृहाच्या बाजूंच्या हॉकीसाठी o.४५ x 0.४५ × १.० मी आकाराचे खडे घ्यावेत. काँक्रीटमध्ये वापरावयाचे सिमेंट ५३ ग्रेडचे असावे. सिमेंट काँक्रीटचे फाउंडेशन जमिनीच्यावर १५ सें.मी. तरी असायला पाहिजे. फाउंडेशन चांगले पक्के व्हावे म्हणून त्यास तीन आठवडे रोज पाणी देणे गरजेचे असते. शेडनेटगृहाचा सांगाडा (फ्रेम) शेडनेटगृहाचे आयुष्यमान जास्तीतजास्त होण्यासाठी जी. आय. पाईपचा सांगाडा असणे आवश्यक आहे. या पाईपच्या भिंतीकेचा व्यास २' व जाडी बीएसआय नामांकनाप्रमाणे कमीत कमी २.९ मि.मी. असावी. वान्याच्या १२० कि.मी. प्रतितास या वेगास शेडनेटगृह टिकण्यासाठी शेडनेटगृहासाठी वापरण्यात येणा-या निरनिराळ्या व्यासाच्या पाईप्सची प्रमाणके खालीलप्रमाणे आहेत. तक्ता क्र. २ : गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाच्या सांगाड्यासाठी अ.क्र. पाईपचे नाव पाईपचा व्यास (इंच) कमी उंचीचे शेडनेट हाउस जास्त उंचीचे शेडनेट हाउस १ मुख्य कॉलम १.५ २. २ वरील बेंड ट्रूस १.२५ १.५ ३ पर्लीन १.२५ १.२५ ४ ट्रूस मेंबर्स १. १.२५ ५ ट्रूसचा बॉटम १. १.२५ तक्ता क्र. ३ : सपाट छत असलेल्या अ.क्र. पाईपचे नाव पाईपचा व्यास (इंच) कमी उंचीचे शेडनेट हाउस जास्त उंचीचे शेडनेट हाउस १ मुख्य कॉलम १.५ 2.० २ बाजूंचे मधील पोल १.२५ १.५ ३ मुख्य कॅरीडोर(हॉकी ) १.२५ १.५ ४ बाजूंची मधील हॉकी 1.०० १.२५ ५ ट्रूस 1.०० १.२५ ६ प्रलीन 1.०० १.२५ सपाट छत असलेल्या शेडनेटगृहाची उंची कमीतकमी ३.२५ मीटर (कमी उंचीच्या शेडनेटहाऊस) व ४.oo मीटर (जास्त उंचीच्या शेडनेटहाऊस) असावी, तर गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाची मध्यभागी उंची कमीतकमी ४.oo मीटर (कमी उंचीच्या शेडनेटहाऊस) व ५.00 मीटर (जास्त उंचीच्या शेडनेटहाऊस) असावी. सांगाड्यातील सांध्यांसाठी नटबोल्ट व क्लॅम्प्स सांगाड्यातील जी. आय. पाईप्सची जोड़णी वेल्डिंगने करू नये. सांगाड़ा भकम व टिकाऊ होण्यासाठी त्यातील सांधे नटबोल्ट, एल आकाराचे अँगल्स व क्लॅम्प्सच्या सहाय्याने जोडावीत. नटबोल्ट, क्लॅम्प्स व एल अँगल्स हे 'झिंक प्लेटेड' व चांगल्या प्रतीचे असावेत. शेडनेट शेडनेटगृहास जी शेडनेट लावायची आहे ती यु.व्ही. स्टॅबीलॉईड असणे अत्यंत आवश्यक असते. त्याचप्रमाणे शेडनेटची टक्केवारी लक्षात घेऊन तिची निवड करावी. शेडनेट १५ टक्के, ३५ टक्के, ४0 टक्के, ५o टक्के, ७५ टक्के व ९० टक्के या सावलीच्या टक्क्यांमध्ये उपलब्ध असतात. शेडनेट विविध रंगातही उपलब्ध आहेत जसे की हिरवा, पिवळा, काळा, पांढरा, लाल, काळा , निळा, निळा-पांढरा, हिरवा-पांढरा इत्यादी. '३५ टक्के शेडनेट' म्हणजे प्रकाशाची तीव्रता (लाइट इंटेसिटी ) ३५ टक्क्यांनी कमी होईल व फक्त ६५ टक्के प्रकाशाची तीव्रता शेडनेटमधून आत जाईल. प्रत्येक पिकाची चांगली वाढ होण्यासाठी त्याची स्वत:ची विशिष्ट सूर्यप्रकाश व सावलीची अशी गरज असते. म्हणून आवश्यक ते हवामान निर्माण करण्यासाठी योग्य सावली गुणांकांची शेडनेट निवडल्याने पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. शेडनेट बसविणे शेडनेटगृहाच्या सांगाड्यास शेडनेट बसविण्यासाठी अॅल्युमिनीयम प्रोफाइल्सचा उपयोग करतात. या प्रोफाइल्समध्ये ही शेडनेट स्प्रिंगचा वापर करून ताणून बसविली जाते. अॅल्युमिनिअम प्रोफाइल्स या कमीतकमी २२५ ग्रॅम / मीटर एवढ्या वजनाच्या असाव्यात. स्प्रिंग या स्टीलपासून बनविलेल्या असून त्या कमीतकमी २.५ मि.मी. जाडीच्या असाव्यात व त्यावर कमीतकमी ५o मायक्रॉनचे झिंक प्लेटिंग असावे. शेडनेटगृहास जमिनीलगत सभोवती यु.व्ही.फिल्म लावणे (स्कॉटिंग) बाहेरील वातावरणातील हवेत ३१० पी.पी.एम. इतका कर्बवायू असतो. हरितगृहामध्ये रात्रीच्या वेळेस वनस्पतींनी केलेल्या कर्बवायुच्या उत्सर्जनामुळे कर्बवायूच्या पातळीत १oo० ते १२०० पी.पी.एम. इतकी वाढ होते. या कर्बवायूच्या पातळीत वाढ झाल्याने पिकांना त्यांच्या अन्न तयार करण्याच्या 'प्रकाश संश्लेषणा'च्या प्रक्रियेत ३ ते ४ पटींनी वाढ होते व त्यामुळे पिकांची वाढ उत्तम होऊन उत्पादन ४ ते ५ पटींनी वाढते. याच तत्त्वावर शेडनेटगृहास सभोवताली जमिनीलगत १ मी. उंचीइतके २०० मायक्रॉन जाडीचे यु.व्ही. फिल्म किंवा १५० जी.एस.एम. (ग्रॅम/चौ.मी.) चा जीओ फॅब्रिक लावल्याने (स्कटींग) पिकाच्या उत्पादनात व उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होते. कर्बवायु हवेपेक्षा जड असल्याने तो जमिनीलगत साठून राहतो. शेडनेटगृहास स्कटॉँग केलेले नसल्यास हा कर्बवायु शेडनेटगृहात साठून शकल्याने त्यापासून फायदा होत नाही. म्हणून यु.व्ही.फिल्मचे स्कटॉँग करणे फायद्याचे आहे. रोजगाराच्या संधी विविध घटकांचा पुरवठा, उच्च तंत्रज्ञानाच्या सेवा-सला, वाहतूक, पॅकेजिंग, मार्केटिंग यामध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. 'शेडनेटहाऊस'साठी निश्चित केलेल्या खर्चाचे मापदंड शेडनेटहाऊसच्या राउंड टाइप, फ्लॅट टाइप व लोकल मॉडेल प्रकाराच्या शेडनेटहाऊसच्या उभारणीसाठी आकारमानानुसार व विविध मॉडेल्सनुसार प्रति चौ.मी. क्षेत्रासाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तक्ता क्र.४ मध्ये दिले आहे. तक्त्यात नमूद केलेल्या किंमती साहित्य खर्च, बांधकाम खर्च, मजुरी खर्च, वाहतूक खर्च तसेच ऐच्छिक खर्च या सर्व घटकांसाठी येणारा खर्च विचारात घेऊन निश्चित करण्यात आलेला आहे. बाब एकूण क्षेत्र (चौ.मी.) मॉडेलनुसार हरितगृहाच आकार(रुंदी *लांबी मी.) प्रती चौ.मी. खर्च मापदंड (रु) सर्वसाधारण क्षेत्र अधिसूचित डोंगराळ क्षेत्र शेडनेट हाउस (Round Type)5 मी.उंची ५०४ १८*२८ ६९९ ८०४ १००८ ३६*८ ६५० ७४८ २०१६ ३६*५६ ५९७ ६८७ ४२*४८ ५९९ ६८९ ३०२४ ४२*७२ ५७२ ६५८ ३०७२ ४८*६४ ५७२ ६५८ ३०२४ ५४*५६ ५७३ ६५९ ४०३२ ४८*८४ ५५५ ६३८ ४०८० ६०*६८ ५५५ ६३८ ४०३२ ७२*५६ ५५८ ६४२ ४०५६ ७८*५२ ५५९ ६४३ शेडनेट हाउस (Round Type)४ मी.उंची ५०४ १८*२८ ६०९ ७०० १००८ ३६*२८ ५६० ६४४ २०१६ ३६*५६ ५१४ ५९१ ४२*४८ ५१५ ५९२ ३०२४ ४२*७२ ४९० ५६४ ३०७२ ४८*६४ ४९१ ५६४ ३०२४ ५४*५६ ४९१ ५६५ ४०३२ ४८*८४ ४७२ ५४३ ४०८० ६०*६८ ४७३ ५४४ ४०३२ ७२*५६ ४७५ ५४६ ४०५६ ७८*५२ ४७६ ५४७ शेडहाउस (flat type)4 मी.उंची १०४० २०*५२ ५४९ ६३१ १०८८ ३२*३४ ५३८ ६१९ २०४८ ३२*६४ ४८९ ५६२ २०२४ ४४*४६ ४८८ ५६१ ३०१६ ५२*५८ ४५८ ५२७ ३०४० ४०*७६ ५४९ ५२८ ४००० ४०*१०० ४४० ५०६ ४०९६ ६४*६४ ४३६ ५०१ शेडनेटहाउस (flat type) 3025 मी.उंची १०१२ २२*४६ ४५१ ५१८ २०८० ४०*५२ ४८८ ४५८ ३०१६ ५२*५८ ३६९ ४२४ ३०४० ४०*७६ ३७१ ४२७ ४००० ४०*१०० ३५५ ४०८ ४०९६ ६४*६४ ३५१ ४०४ ४०४८ ४६*८८ ३५३ ४०६ ४०६० ५८*७० ३५१ ४०४ भविष्यातील संधी ; शेडनेटगृहू व हरितगृह उभारणीसाठी साधारणतः वेगवेगळ्या आकारानुसार रु. ३00 ते १५oo प्रति चौरस मीटर एवढा खर्च येतो . त्यामध्ये वातावरणातील विविध घटकांचे नियंत्रण करण्यासाठी लागणाऱ्या प्रणालीवर (र्मिस्टींग, फॉंगींग, कार्बनडायऑक्साईड, प्रकाश इत्यादी) तसेच पिकाच्या लागवडीसाठी लागणा-या विविध प्रणालीवर (जमिनीचे माध्यम (सॉईल मिडीया), सिंचन प्रणाली, पिकाचे वजन पेलणा-या प्रणाली) येणा-या खर्चाचा अंतर्भाव नाही. या सर्व बाबींमुळे शेतक-यांना सुरवातीचा भांडवली खर्च जास्तीचा करावा लागतो. महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे व इतर कृषि विषयक संशोधन संस्थामध्ये घेतलेल्या प्रयोगाद्वारे व सध्या जे प्रगतशील शेतकरी हरितगृह व शेडनेटगृहामध्ये विविध पिकांचे (विशेषतः गुलाब, जरबेरा, कानॅशन, सिमला मिरची, काकडी) उत्पादन घेतात, त्यांना आलेल्या अनुभवाद्वारे सुरवातीला लागलेला भांडवली खर्च २ ते ३ वर्षात निघून येतो, असे दिसून आले. एकीकडे अनियंत्रित किंवा नैसर्गिक वातावरणात शेती करताना आलेल्या उत्पादनापेक्षा कित्येक पटीने (७ ते १o) नियंत्रित वातावरणात शेती तसेच एकीकडे वेगाने वाढणा-या मध्यमवर्गीय लोकसंख्येच्या वर्षभर चांगल्या गुणवत्तेच्या फुले व भाजीपाल्याच्या गरजा तर दुसरीकडे त्यासाठी लागणा-या जमीन व पाणी या मुख्य निविष्ठांचे उत्तरोत्तर होणारे दुर्भिक्ष या सर्वांमुळे शेतक-यांना तसेच हरितगृह व शेडनेट गृहाचा व विविध निविष्ठा पुरवठा करणा-यांना भविष्यात पुढीलप्रमाणे विविध संधी उपलब्ध आहेत. सुरवातीचा भांडवली खर्च कमी करणे व हरितगृहाची व शेडनेटगृहाची गुणवत्ता राखणे निविष्ठांचा इष्टतम वापर करून उत्पादकता वाढविणे उद्य गुणवत्तेच्या उत्पादनाचा वर्षभर पुरवठा करणे रोग व केिड नियंत्रण संदर्भात संशोधन करणे नैसर्गिक आपत्तीच्या काळात नियंत्रित वातावरणात शेती करणे माती विना शेती (Soj|less Cultivation) या तत्वाड्र्द्वारे शेती करणे संशोधनपर आधारित शिफारशी काटेकोर शेती विकास केंद्र, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ. येथे झालेल्या संशोधनावर आधारीत शिफारशींचा तपशील पुढे दिला आहे. हरितगृहात जरबेरा फुलझाडांपासून अधिक व दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळण्यासाठी लागवडीचे माध्यम लाल माती+शेणखत+वाळू+भाताचे तूस हे ३:३:३:१ या प्रमाणात वापरावे. हरितगृहात कानेंशन फुलझाडांच्या अधिक व दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी दर आठवड्याला विद्राव्य खतांद्वारे सुरुवातीच्या एक महिन्यापर्यंत ३.७o:१.३o:२.९० ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश/चौ.मी. त्यानंतर पुढील दोन महिन्यांपर्यंत ३.७५:१.२०:४.५० ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश/चौ.मी. आणि तद्रतर ३.९o:१.२o:५.६0 ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश/चौ.मी. प्रमाणे खतमात्रा द्यावी. हरितगृहात जरबेरा फुलझाडांपासून अधिक उत्पादन व आर्थिक फायदा मिळण्यासाठी ३ox३0 सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. मुक्त वायुसंचारित हरितगृहातील कानेंशन फुलांच्या गुणवत्तापूर्ण अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी कानेंशनची लागवड १५’×१५ सें.मी. अंतरावर करून त्यास दररोज बाष्पीभवनाच्या ६० टक्के पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे अर्ध-नियंत्रित हरितगृहात जरबेरा फुलांचे अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे दररोज बाष्पीभवनाच्या ६0 टक्के पाणी व प्रतेि आठवड्यास ३.४o : १.७१ : ४.११ ग्रॅम प्रति चौ.मी. प्रमाणे नत्र : स्फुरद : पालाश विद्राव्य खतांच्या मात्रेतून द्यावे. नैसर्गिक वायुसंचारित हरितगृहातील हिरव्या ढोबळी मिरचीच्या (ऑक्टोबर लागवड) चांगल्या प्रतीच्या अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ठिबक सिंचनातून पीक बाष्पपर्णात्सर्जनाच्या ७० टक्के पाणी प्रती दिन आणि शिफारशीत खत मात्रेच्या १०० टक्के विद्राव्य खते (फुले येण्यापूर्वी: ८.o; २.८:४.0:२.८:0.२ कि.ग्रॅ. प्रती हेक्टर आणि फुले आल्यानंतर ६.0:३.0; १५.o:३.0:0.३ कि.ग्रॅ. प्रती हेक्टर नत्र : स्फुरद : पालाश : कॅल्शिअम : मॅग्रेशिअम) दिवसाआड ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत. चांगल्या प्रतीच्या ढोबळी मिरचीच्या (ऑक्टोबर लागवड) अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ७५ टक्के सावलीच्या शेडनेटगृहात लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे दररोज पीक बाष्पपर्णात्सर्जनाच्या ७५ टक्के पाणी द्यावे. काकडीच्या (उन्हाळी लागवड) अधिक उत्पादनासाठी ७५ टक्के सावली गुणांकाच्या शेडनेटगृहात लागवड आणि ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत मात्रेच्या (१oo : ५o : ५० कि.ग्रॅ./हे.) १२५ टक्के विद्राव्य खते २६ समान हप्त्यात ४ दिवसाच्या अंतराने लागवडीनंतर १५ दिवसाने द्यावीत. साधारणतः २५ वर्षांपूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात घेता तेव्हा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल असे वाटत नव्हते. आता तर द्राक्ष, केळी, डाळींब यांच्यासारख्या पिकांना ठिबक सिंचन पद्धतीद्वारेच पाणी देतात. तसेच भविष्यातील गरजा व निकड लक्षात घेता पुढील १५ ते २० वर्षात महाराष्ट्रात सगळीकडे हरितगृह व शेडनेटगृहाचे जाळे दिसेल, ही अतिशयोक्ती ठरणार नाही. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन