Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

Government of India



MeitY LogoVikaspedia
mr
mr

  • Ratings (3.25)

गव्हावरील रोग

उघडा

Contributor  : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था28/05/2020

Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.

गव्हावर प्रामुख्याने तांबेरा (गेरवा) काजळी किंवा कानी करपा, मर, मुळकुज, खोडकुज आणि कर्नाल बंट या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.

गव्हावर येणारा प्रमुख आणि नुकसान कारक रोग म्हणजे तांबेरा. खोडावरचा काळा तांबेरा, पानावरचा नारंगी तांबेरा, पिवळा तांबेरा या तांबेर्याचा प्रसार होत असतो.

खोडावरचा काळा तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून वक्सीनिया ग्रामिनिस, ट्रिटीसी या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खोडावर फोड़ येतात.हेच फोड़ पुढे काळसर होतात.सम्पूर्ण खोड काळसर होते.निलगिरी पर्वत आणि पलनी टेकड्यावरून वार्याबरोबर आणि त्या वेळी पडणार्या पावसमुळे हे रोग फैलावतात.

पानावरचा नारंगी तांबेरा हा वक्सीनिया रीकांडीट नावाच्या बुरशीमुळे होतो.गव्हाच्या पानावर नारंगी ठिपके असतात आणि नंतर फोड़ दिसतात.१८ ते २० टक्के तापमान आणि ८ टक्के आर्द्रता या रोगास पोषक असते.

  • या दोन्ही रोगांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोगप्रतिकारक जाती पेराव्यात.
  • त्याचप्रमाणे गव्हाची पेरणी हंगामापुर्वी किंवा उशिरा करू नये.
  • जादा पाणी देऊ नये.
  • ढगाळ हवामान, पाउस अगर कडाक्याची ठंडी पडली, तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३ ग्राम झायनेब आणि १ लिटर पाणी यांची फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव झाल्यानंतर ३ ग्राम झायनेब किंवा मन्कोझेब आणि १ लिटर पाणी यांच्या फवारण्या आलटून पालटून कराव्या.

काजळी किंवा काणी हा रोग युस्टिलगो, ट्रिटसी या बुराशीमुळे होतो.ही बुरशी फुलावर वाढते.दाण्याऐवजी काळी भुकटी           तयार होते.ही काळी भुकटी म्हणजेच काणी.ठंड आणि आर्द्र हवामानात वाढ होते.

  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • उभ्या पिकातल्या रोगट ओंब्या काळजीपूर्वक काढून नष्ट कराव्यात.
  • ३ ग्राम कार्बेनडझिम अगर थायरम १ किलो बियाण्यास चोळावे.म्हणजे या रोगाचे नियंत्रण होऊ शकते.

करपा या गहू पिकावरच्या रोगाची लागण अल्टरनेरिया ट्रिटीसिना नावाच्या बुरशीमुळे होतो.

कोरडवाहू पेक्षा बागायती गव्हावर जास्त प्रमाणात अल्टरनेरियाकरपा येतो. रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे ठिपके एकत्र मिसळतात आणि संपूर्ण पान करपते. १९ ते २० सेल्सियस तापमान सतत दमट हवामानात या रोगाचा प्रसार होतो.३ ग्राम थायरमची बिजप्रक्रिया करावी आणि उभ्या पिकावर २५ ग्राम झायनेब अगर मन्कोझेब १ लिटर पाण्यातून फवारावे.

गव्हावर फ्युजारिम या बुरशीमुळे मुळकुज तर रायझोक्टोनिया या बुरशीमुळे खोडकुज या रोगाचा प्रादुर्भाव होतो.या रोगांचा एकत्रित परिणाम म्हणजे रोपे पिवळी पडून सुकायाला लागतात आणि शेवटी मरतात. खोडाचा जमीनीलगताचा भाग आणि मुळे कुजतात आणि झाडे कोलमडून पडतात.याच्यावर उपाय म्हणजे अशी झाडे उपटून टाकावित आणि सुरवातीला थायरमची बीजप्रक्रिया करावी.

कर्नाल ब्रंट हा रोग टिर्लोश इंडिका नावाच्या बुराशिमुले होतो.अत्यंत भयानक रोग आहे.गव्हाच्या ओंब्या आणि दाने काळे पडतात.

त्याच्या मासळीच्या वासासारखा अतिशय घाणरडा वास येतो. त्यामुळे असा गहू खाण्यास योग्य राहतच नाही. उत्तर भारतात याचे प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे अजुन नाही.

  • हा रोग बियाण्याद्वारे पसरतो.
  • म्हणून थायरमची बीजप्रक्रिया करावी.
  • रोगमुक्त प्रामाणित बियाणे वापरावे.
  • रोगट अवशेष गोळा करुन जाळून टाकावे.
  • जमिनिताल्या बुरशीच्या नायानाटासाठी खोल नांगरटकरावी. अशा पद्धतीने घाण वास येणार्या (कर्नाल ब्रंट)या रोगाच्या नियंत्रनाचे उपाय योजवेत.

निरोगी गहू उत्पादनासाठी नुकसानकारक अशा या रोगाचे निर्मूलन करावे आणि अपेक्षित उत्पादन मिळवावे.

संदर्भ - प्रल्हाद यादव (कृषी प्रवचने )

Related Articles
शेती
मोसंबीवरील रोग

फळ काढणीपूर्वी देठकूज : मोसंबीची फळे चार ते पाच महिन्याची किंवा पक्वतेच्या अवस्थेत असताना हा रोग आढळतो.

शेती
मेंढ्यामध्ये आढळणारे रोग

मेंढ्‌यांमधील आजार सहजासहजी ओळखू येत नाहीत. त्या बऱ्याच आजारी झाल्या म्हणजेच आजाराची लक्षणे दिसू लागतात.

शेती
डाळिंबावरील रोग

सध्याच्या काळात डाळिंबावर तेलकट डाग, मर ,फळ पोखरणारी अळी, रस शोषणाऱ्या पतंगाचादेखील प्रादुर्भाव दिसून आला आहे.

शेती
केवडा रोग

वनस्पतींची पाने, शिरा व शिरांमधील भाग पिवळा, हिरवट पिवळा अगर केवड्यासारखा पिवळा आढळल्यास त्यांवर केवडा रोग पडला असे म्हणतात.

शेती
काणी रोग

काणी रोग : बहुतांशी तृणधान्यांच्या कणसांवर दाण्याऐवजी कवकांची बीजाणुफळे अथवा स्वतंत्र रीत्या काळी भुकटी आढळल्यास`काणी रोग' पउला असे म्हणतात.

शेती
कपाशीवरील रोग

कपाशी पिकावर अणुजीवी करपा, दहिया, पानावरील विविध बुरशीमुळे येणारे ठिपके, मूळकूज/ खोडकूज, आकस्मिक मर या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो.

संजय म्हेत्रे

2/21/2020, 12:16:39 PM

गहू लावून दोन महिने झाले, काही ठिकाणी गहू पांढरा झाला आहे.काय आहे हे व काय करावे, उपाय सूचवा

धनंजय तायडे

1/30/2020, 8:58:01 PM

गहू पिकाच्या खोडामध्ये आतून कीड पडली आहे कृपया उपाय सुचवा

निलेश नाळे

1/3/2017, 2:33:14 AM

गहू लाउन 22दिवस झालेत आणी गव्हाची पाने पिवळी पडतात पानाच्या आत पिवळी आळी आहे.

गव्हावरील रोग

Contributor : राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था28/05/2020


Empower Your Reading with Vikas AI 

Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.



Related Articles
शेती
मोसंबीवरील रोग

फळ काढणीपूर्वी देठकूज : मोसंबीची फळे चार ते पाच महिन्याची किंवा पक्वतेच्या अवस्थेत असताना हा रोग आढळतो.

शेती
मेंढ्यामध्ये आढळणारे रोग

मेंढ्‌यांमधील आजार सहजासहजी ओळखू येत नाहीत. त्या बऱ्याच आजारी झाल्या म्हणजेच आजाराची लक्षणे दिसू लागतात.

शेती
डाळिंबावरील रोग

सध्याच्या काळात डाळिंबावर तेलकट डाग, मर ,फळ पोखरणारी अळी, रस शोषणाऱ्या पतंगाचादेखील प्रादुर्भाव दिसून आला आहे.

शेती
केवडा रोग

वनस्पतींची पाने, शिरा व शिरांमधील भाग पिवळा, हिरवट पिवळा अगर केवड्यासारखा पिवळा आढळल्यास त्यांवर केवडा रोग पडला असे म्हणतात.

शेती
काणी रोग

काणी रोग : बहुतांशी तृणधान्यांच्या कणसांवर दाण्याऐवजी कवकांची बीजाणुफळे अथवा स्वतंत्र रीत्या काळी भुकटी आढळल्यास`काणी रोग' पउला असे म्हणतात.

शेती
कपाशीवरील रोग

कपाशी पिकावर अणुजीवी करपा, दहिया, पानावरील विविध बुरशीमुळे येणारे ठिपके, मूळकूज/ खोडकूज, आकस्मिक मर या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो.

Lets Connect
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi