डाळिंब लागवडीसाठी हलकी ते मध्यम, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीसाठी गणेश, जी-137, मृदुला, फुले आरक्ता, भगवा, फुले भगवा सुपर या जाती निवडाव्यात. सरकारमान्य रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतूनच कलमे खरेदी करावीत. माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन करावे. लागवडीचे अंतर 4.5 x 3 मीटर ठेवावे. लागवडीनंतर सुरवातीची दोन वर्षे दोन ओळींमध्ये कांदा, मूग, चवळी, सोयाबीन यासारखी कमी उंचीची आंतरपिके घ्यावीत. काकडीवर्गीय आणि वांगेवर्गीय पिकांची लागवड करू नये.

लागवडीविषयी तांत्रिक माहितीसाठी- कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प,

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,

राहुरी (02426- 243247) येथे संपर्क साधावा.

स्त्रोत: अग्रोवन