1) पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.

2) लागवडीसाठी 6 x 6 मीटर अंतरावर 60 x 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. सघन लागवडीसाठी 3 मीटर बाय 2 मीटर अंतर ठेवावे. चांगली माती, शेणखत आणि एक किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.

3) उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरू झाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा. त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते. त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत प्रतिएकरी पाच रक्षक सापळे लावावेत.

संपर्क - 02426 - 243247
उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

स्त्रोत: अग्रोवन