एरंडी (एरंडेल तेलासाठी) जमीन – पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पूर्वमशागत – १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी. पेरणी आखणी – ९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३० सें.मी (अरुणासाठी) हेक्टरी बियाणे - १२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२० किलो (अरुणासाठी) खते - प्रमाण (कि./हे) - नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – ६०:००: ० (खान्देश विभागासाठी) ६०:४०:० (सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी) अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीचे वेळेस पेरुन द्यावे व उरलेले नत्र ४० ते ४५ दिवसांनी द्यावे. हेक्टरी उत्पादन – १० ते १५ क्विं./हे माहिती स्रोत : कृषी विभाग महाराष्ट्र शासन