कालावधी जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान चालते. पूर्व मशागत करताना नांगरणी, दोन वेळा वखरणी करावी. पुसा नसदार, देशी, चैताली, को-१, कोकण हरिता, फुले-सुचेता इत्यादि शिफारसीत वाणचे एकरी २ किलो बियाणे वापरावे. लागवड पद्धत - दोन ओळीत २ अंतर,दीड मीटर अंतरावर २ बाय २ फुटाचे खड्डे करून माती शेणखताने भरावे. एका ठिकाणी २/३ बिया पेराव्या. मांडव उभारणे आवश्यक आहे. शेवटच्या पाळी पूर्वी एकरी २ टन शेणखत टाकून पाळी द्यावी.लागवड करताना एकरी २५ किलो नत्र,३० किलो स्फुरद ,५० किलो पालश एक महिन्याने २५ किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. या सोबतच लागवड केल्यास २ दिवसांनी १२:६१:० खत १.५ किलो + युरिया २ किलो ड्रेंचिंग करा.हिरवी वाढ व्यवस्थित झाल्यास १९:१९:१९ खताची २ किलो + युरिया २ किलो ड्रेंचिंग करा. फूल लागवड कालावधीत व पहिल्या तोडणी अगोदर १२:६१:० ची २.५ किलो + १३:०:४५ ची २ किलो + कॅल्शियम नायट्रेट ०.५ किलो ड्रेंचिंग करा. दुसर्या किंवा त्या पुढील तोडणीच्या वेळी १३:०:४५ ची ३ किलो ड्रेंचिंग करा. पाणी व्यवस्थापन करताना ५०% वापसा अवस्था राहील असे ठिबकद्वारे दर ४ ते ५ दिवसांनी पाणी पाळी द्यावी. रोग / किडी नियंत्रणासाठी या पूर्वी दिलेल्या कारले पीक व्यवस्थापन प्रमाणे काळजी घ्यावी. ६० दिवसानंतर फळे काढणीस येतात. उत्पादन एकरी ४ ते ५ टन मिळू शकते. माहिती दाता- गणेश काकडे