पंचायती राज मंत्रालय राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांद्वारे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतींना प्रोत्साहन देत आहे. दरवर्षी २४ एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय पंचायती राज दिनी हे पुरस्कार दिले जातात. क्लायमेट ऍक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड - एक आढावा २०२५ दरम्यान, महसूल स्रोत (OSR) वाढवताना हवामान कृती आणि स्वावलंबन या राष्ट्रीय प्राधान्यांना विशेष महत्त्व देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अनुकरणीय प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी समर्पित पुरस्कारांची एक विशेष श्रेणी जाहीर करण्यात आली आहे. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन आणि अक्षय ऊर्जेच्या स्रोताचा वापर साध्य केल्याबद्दल ३ ग्रामपंचायतींना (GPs) हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारात अनुक्रमे 1 कोटी रुपये (प्रथम क्रमांकासाठी), 75 लाख रुपये ( द्वितीय क्रमांकासाठी) आणि 50 लाख (तृतीय क्रमांकासाठी) रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन समाविष्ट आहे. पुरस्कारासाठी पंचायतींनी भरावी अशी प्रश्नावली क्लायमेट अॅक्शन स्पेशल पंचायत पुरस्काराचे विजेते र हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार (CASPA) प्रथम क्रमांक: डाव्वा एस ग्रामपंचायत,जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र द्वितीय क्रमांक: बिरदहल्ली ग्रामपंचायत,जिल्हा हसन, कर्नाटक तृतीय क्रमांक: मोतीपूर ग्रामपंचायत,जिल्हा समस्तीपूर , बिहार स्रोत: पंचायती राज मंत्रालय