दुकाने व संस्था नोंदणीचा दाखला शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजे हे लायसन्स तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर परवानगी देते. हे राज्य सरकारच्या दुकान व आस्थापना कायदा च्या अंतर्गत सर्व व्यावसायिक दुकान दारांनी कायद्याने ठरवून दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या दुकान दाराने व्यवसाय चालवण्यासाठी कायद्या अंतर्गत नवीन व्यवसायाची नोंदणी करणे व त्याचा परवाना घेणे खूप आवश्यक आहे. व्यवसाय/दुकान चालू केल्यावर, नोंदणी अर्ज 30 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ शॉप ऍक्ट लायसन्स ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट साईझ फोटो दुकान किंवा ऑफिस चा फोटो (असल्यास) पत्ता पुरावा - लाईट बिल /आधार कार्ड शॉप ऍक्ट लायसन्स ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आधिकृत वेबसाइट वर जाऊन नोंदणी फॉर्म भरा किंवा आम्हाला संपर्क साधा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: आपल्याला वेबसाइटवर आधार कार्ड, पत्ता पुरावा, आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. फीस भरा: नोंदणी फॉर्म भरल्यानंतर शॉप ऍक्ट नोंदणीसाठी फीस भरावीत. शॉप ऍक्ट डाउनलोड करा: फीस भरल्यानंतर १-२ दिवसात तुम्हाला ई-मेल वर शॉप ऍक्ट लायसन्स मिळेल. लेख: श्रीराम बनकर