परिचय बँकेत न जाता इंटरनेट चा वापर करून व्यवहार करण्याच्या सुविधेला नेट बँकिंग असे म्हणतात नेट बँकिंग का वापरावी ? नेट बँकिंग सुविधा २४*७ उपलब्ध असते व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज राहत नाही आपल्या अमुल्य वेळेची बचत होते . नेट बँकिंग वापरण्यास सोयीस्कर आणि सुरक्षित आहे. अपल्या प्रत्येक व्यवहाराची आपोआप नोंद होते. नेट बँकिंग कशी सुरु करावी ? स्टेप १ : आपल्या बँकेच्या शाखेतून किंवा बँकेच्या वेबसाईटवरून नेट बँकिंग सुरु करण्यासाठी लागणार अॅप्लीकेशन फॉर्म (अर्जाचा फॉर्म ) डाऊनलोड करून घ्या स्टेप २ : सर्व तपशील भरून , हा फॉर्म आपल्या बँकेच्या शाखेत जमा करा . स्टेप ३ : सर्व तपशील तपासल्यावर बँकेकडून नेट बँकिंग सुरु करण्यात येते. नेट बँकिंगसाठी लागणारा (customer id ) आणि पासवर्ड पत्राद्वारे आपल्याला कळवला जातो. स्टेप ४ : नेट बँकिंग activate करण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवर नेट बँकिंग अकाऊंट मध्ये customer id आणि password चा उपयोग करून लॉगइन करा . जर आपल्याला या प्रक्रियेमध्ये काही अडथळा आला तर आपण संबंधित बँकेच्या हेल्पलाईन नंबर वर कॅाल करू शकता. हे हेल्पलाईन नंबर बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असतात. व्यवहारांचे प्रकार नेटबँकिंगद्वारे ३ पद्धतीने व्यवहार करता येतात NEFT, RTGS, आणि IMPS NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) NEFT हा एक व्यवहाराचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये सर्व व्यवहार तुकड्यांमध्ये (batch wise processing) पूर्ण केले जातात. त्यामुळे हि प्ररकीय काहीशी स्लोव (मंद) असते. जेंव्हा तुम्ही एखादा व्यवहार करता, तो व्यवहार batch मध्ये ऍड केला जातो. आणि हा व्यवहार तुमच्या batch चा नंबर आल्यावर पूर्ण होतो NEFT करण्याची वेळ : सोमवार ते शनिवार (दुसरा आणि ४था शनिवार वगळून ) सकाळी ८ ते संध्याकाळी ६:३० पर्यंत NEFT व्यवहाराची मर्यादा : NEFT द्वारे व्यवहार करण्याची कोणतीही किमान तथा कमाल मर्यादा नाही RTGS (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) RTGS मार्फत केलेले व्यवहार "REAL TIME' मध्ये पूर्ण केल्या जातात. उदा. तुम्ही आता जर कोणाला तर त्या व्यवहाराची माहिती लगेचच त्या व्यक्तीच्या बँकेत कळविली जाते आणि व्यवहार पूर्ण केला जातो. या प्रकारामध्ये प्रत्येक व्यवहार स्वतंत्रपणे हाताळला जातो. RTGS करण्याची वेळ : सोमवार ते शनिवार (दुसरा आणि ४था शनिवार वगळून ) सकाळी ८ ते संध्याकाळी ४:३० पर्यंत RTGS व्यवहाराची मर्यादा : किमान २ लाख ते अमर्यादित रक्कमेचे व्यवहार करता येतात IMPS (इंमेडिएट पेमेंट सर्व्हिस) IMPS उभा व्यवहाराच्या प्रकारामध्ये आपण पाठविलेले पैसे (केलेला व्यवहार) त्याच क्षणी दुसऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतात. सर्व प्रकारामध्ये मार्फत केलेले व्यवहार "REAL TIME' मध्ये पूर्ण केल्या जातात. उदा. तुम्ही आता जर कोणाला तर त्या व्यवहाराची माहिती लगेचच त्या व्यक्तीच्या बँकेत कळविली जाते आणि व्यवहार पूर्ण केला जातो. या प्रकारामध्ये प्रत्येक व्यवहार स्वतंत्रपणे हाताळला जातो. IMPS करण्याची वेळ : २४ * ७ (दिवसभर) आपण कधीही या प्रकारचा वापर करून व्यवहार करू शकतो. IMPS व्यवहाराची मर्यादा : रु. २ लाख प्रतिदिन स्रोत - Digi Dhan