शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्यामची आई फौंडेशन यांचा संयुक्त उपक्रम महाCAREER मित्र करिअर म्हणजे आनंद आणि प्राविण्य मिळून प्रगतीकडे जाणारा मार्ग आहे कल ,क्षमता आणि संधी याचा सुयोग्य वापर करून प्रगतीकडे नेणारा मार्ग प्रत्येकाने शोधणे आवश्यक आहे आपले सामर्थ्य विकासाच्या संधी शैक्षणिक कामगिरी कौटुंबिक पार्श्वभूमि रोजगाराची निकड या सर्वांचा विचार करून करिअरच्या उपलब्ध संधींमधील सर्वोत्तम मार्ग आपण निवडा . पोर्टलचे उद्देश महाकरिअरमित्रचा उद्देश १४ ते २३ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या सुरुवातीस योग्य व वेळेवर मार्गदर्शन मिळवून देणे व त्याद्वारे एका दिशादर्शकाची भूमिका बजावणे आहे. महाकरियर मित्र विषयी विध्यार्थी व मार्गदर्शक/समुपदेशक यांना नेहमी त्यांच्या जवळच्या शिक्षण संस्थेबाबतची माहिती मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. यासाठी विविध शिक्षण संचालक, उच्च शिक्षण यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, पात्रता, पत्ता, संपर्क क्रमांक. इ. ची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्याना मदत करण्यासाठी योग्य ती सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे. पुढील करिअर विषयक मार्गदर्शनासाठी, व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था (IVGS) यांची करिअर मार्गदर्शन/ समुपदेशन केंद्रे, तसेच महाकरियमित्र हेल्पलाईन – ८२७५१००००१ यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत पोर्टलची दृष्टी प्रत्येक तरुणाच्या जीवनात दीपस्तंभा प्रमाणे उभे राहणे. उच्च शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे. त्याच्या / तिच्या कलानुसार एक सुरक्षित , आनंदी आणि समृद्ध जीवन तयार करण्यासाठी आणि रोजगार किंवा स्वयंरोजगार क्षमता निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे. पोर्टलचे ध्येय सरकारच्या सहयोगी कृती माध्यमातून एक स्थायी वातावरण तयार करणे. ना नफा ना तोटा तत्वावर चालणा-या स्वयंसेवी संस्था , कॉर्पोरेट, समाज , पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सहयोगी माध्यमातून तरुणांना त्यांच्या पूर्ण क्षमता वापरण्यास सक्षम करणे हेल्पलाईन नंबर ८२७५१००००१ / सकाळी १० ते संध्याकाळी ७ स्त्रोत : महाCAREER मित्र