संचालनालयाबद्दल औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग, कारखाने अधिनियम, १९४८ व त्याखालील तरतुदींची अंमलबजावणी आणि त्याखालील नियमांनूसार कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याण याबाबत खात्री करते. तसेच कामकाजाचे तास, कामाच्या जागेची परिस्थिती, अपघातांची आणि धोकादायक घटनांची संख्या कमी करणे, सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण याबाबत कामगारांच्या तक्रारींवर राज्य व केंद्र शासनाने तयार केलेल्या धोरण आणि कार्यक्रमानुसार उपाययोजना करणे यामध्ये महत्वपूर्ण भुमिका बजावते. माहितीसाठी काही सारांश खालीलप्रमाणे: कामाच्या जागेतील विषमता व भेदभाव दूर करणे. व्यवसायिक आरोग्य आणि सुरक्षाविषयक जागरुकता वाढविणे. आणि त्यांची कामकाजाच्या ठिकाणी अंमलबजावणी करणे. कामगारांचे अधिकार हे मानवी हक्क असण्याची संस्कृती वाढविणे. कामाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल अशी सेवा व माहिती पुरविणे. व्यवसायीक सुरक्षा व आरोग्य वाढवण्यासाठी कामगार आणि समाजाचा सहभाग. कामगारांचे मालक आणि शासन यांच्याशी निरोगीसंबंध कामगार आणि रोजगार संबंधित प्रकरणांमध्ये शासनाला धोरणात्मक सल्ला आणि मार्गदर्शन करणे. उद्दिष्टे संचालक, औद्यौगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रमुख उद्दिष्ट "कारखाने अधिनियमांच्या कलमांअन्वये कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणासाठी काम करणे.” तसेच कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि तक्रारींचे निवारण यांची हमी देणे. संचालक, औद्यौगिक सुरक्षा व आरोग्य, यांच्या मार्फत अंमलबजावणी होणारे कायदे, कारखाने अधिनियम, १९४८. महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३. हानिकारक रसायनांचे उत्पादन, साठवण, व आयात नियम, १९८९. रासायनिक अपघात (आपत्कालीन नियोजन, सुसज्जता, व प्रतिसाद) नियम, १९९६. श्रमिक मोबदला अधिनियम, १९२३. कार्य औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची कार्ये औद्योगिक सुरक्षा, व औद्योगिक आरोग्य, या दोन भागांमध्ये विभागली जातात: औद्योगिक सुरक्षा परवाने जारी करणे कारखान्यांचे निरीक्षण करणे कारखान्यातील अपघातांची चौकशी करणे व प्रतिबंधात्मक उपाय सुचविणे तक्रारींची चौकशी करणे एम.ए.एच. कारखान्यांचे निरीक्षण करणे व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे कारखान्यांची सांख्यिकी माहिती गोळा करणे कायदेशीर कारवाया सक्षम व्यक्तींना मान्यता देणे कल्याण अधिकार्यांची नोंदणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा आरोग्य विभाग कारखान्यांमधील वातावरणाचे निरीक्षण करतो. आरोग्य विभागाची कार्ये पुढीलप्रमाणे : औद्योगिक आरोग्य उपसंचालक (आरोग्य) कारखान्यांचे निरीक्षण करतात. कामाच्या वातावरणाचे निरीक्षण, आरोग्यविषयक सर्वेक्षणे, जसे की ध्वनीची तीव्रता, वायुविजन, हवा, इत्यादी. वयाची पडताळणी. कारखाने अधिनियमा अंतर्गत अल्पवयीन व्यक्तींची तपासणी व प्रमाणन धोकादायक प्रक्रियांमध्ये काम करणार्या व्यक्तींची आरोग्य तपासणी प्रमाणक शल्यचीकीत्साकाची प्राधिकृती. प्रथमोपचार प्रशिक्षण संस्थांना मान्यता देणे स्त्रोत : कामगार विभाग, महाराष्ट्र शासन