अतिविशेष सेवा नाशिक राज्यात काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिविशेष आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. राज्य शासनाने नासिक येथे अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ते दि २६ जून २००८ पासून सुरु झाले आहे.या रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हृदयोपचार , कार्डियोव्हॅस्क्युलर आणि कार्डियोथोरॅकिक शल्य क्रिया नेफ्रॉलॉजी व मूत्ररोग . कर्करोग शास्त्र आणि रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया अमरावती अतिविशेषोपचार रुग्णालय दि २६ जून २००८ पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात या रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नेफ्रॉलॉजी व मूत्ररोग . प्लास्टिक शल्यक्रिया बालरोग शल्यक्रिया कर्करोग शास्त्र आणी रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया दुसऱ्या टप्प्यात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात येतील हृदयोपचार , कार्डियोव्हॅस्क्युलर आणि कार्डियोथोरॅकिक शल्य क्रिया मज्जातंतूविकृती शास्त्र स्त्रोत : आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन माहिती संकलन : छाया निक्रड