साखर कारखान्यांकडून साखर उत्पादन आणि गाळपाची माहिती कृषी प्रधान भारत देशात साखर आयुक्तांमार्फत शासन या साखर उद्योगावर नियंत्रण करते, साखर आयुक्त यांची या उद्योगाच्या विकासासाठी तसेच नियमनासाठी जबाबदारी आणि कर्तव्ये निर्धारित केलेली आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी निगडीत सर्व यंत्रणा आणि साखर उत्पादक शेतकरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य साखर आयुक्तालयाकडून होत असते. माहिती व तंत्रज्ञानातील अद्ययावत तंत्राचा वापर करून साखर आयुक्तालय कार्यालयाने केपीएमजी आणि महाऑनलाईन या संस्थेच्या मदतीने या विभागाचे सर्वांगीण संकेतस्थळ विकसीत केले असून त्याच बरोबर पुल एसएमएस गेटवे च्या माध्यमातून साखर कारखान्यांकडून रोजच्या साखर उत्पादनाची आणि गाळपाची माहिती एसएमएस वर संकलीत करण्याचा नाविण्यपूर्ण प्रकल्प यशस्विरीत्या पूर्ण केला आहे. साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता www.mahasugarcom.gov.in असून ही प्रणाली विकसीत करण्यास ओपन सोर्सचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या डाटा सेंटरवर स्थापीत केलेल्या ह्या संकेतस्थळाने ए.के.एस. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्वीसेस प्रा.लिमीटेड या संस्थेकडून सायबर सुरक्षा परीक्षण (सायबर सेक्यूरीटी ऑडीट) पुर्ण केले आहे. तसेच GIGW, WCAG 2.0 आणि W3G या तिन्ही तांत्रिक पात्रता पूर्ण केल्या आहेत. एसएमएसचा गोषवारा राज्यातील सर्व साखरकारखान्यांकडून प्रथम एका मोबाईल क्रमांकाची नोंद करण्यात आली. प्रत्येक कारखान्याचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक संगणक प्रणालीत साठविण्यात आला. त्या नंतर प्रत्येक साखर कारखान्यातून हा मोबाईल क्रमांक वापरणारा अधिकारी कर्मचारी प्राधिकृत करण्यात आला. दररोज सकाळी हा प्राधिकृत अधिकारी ठरवून दिलेल्या सांकेतिक नमुन्यात एक एसएमएस नेमून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवतो. या क्रमांकावर आलेले सर्व एसएमएस सांकेतीक मजकुरासोबत, पाठविलेल्या दिनांक आणि वेळेसह संगणकात साठविले जातात आणि त्यानंतर संगणक प्रणालीच्या सहाय्याने सांकेतिक मजकुराचे नेहमीच्या लिपीत रूपांतर केले जाते. एखाद्या साखर कारखान्याकडून एसएमएस मिळाला नाही तर या प्रणालीतून स्वयंचलीत प्रोग्रामद्वारे रिमाईंडर एसएमएस पाठविला जातो. चुकीच्या नमुन्यात पाठविलेले एसएमएस प्रणालीतून नाकारण्यात येऊन संबंधीतास अचूक नमुना स्वयंचलित प्रणालीद्वारे दिला जातो. सकाळपासून प्राप्त होणार्याण सर्व एसएमएसचा गोषवारा तयार होऊन दुपारी बारा वाजेपर्यंत ही माहिती साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्यावत केली जाते. साखर आयुक्तांना तसेच या क्षेत्रातील इतर नियंत्रण अधिकार्यांअना दैनंदीन उत्पादन आणि संबंधीत पुनर्प्राप्ती घटकांबाबातचा अद्ययावत अहवाल तात्काळ प्राप्त होण्यासाठी या प्रणाली उपयुक्त ठरली आहे. लेखक -सुनिल पोटेकर स्त्रोत: महान्यूज