तक्रार निवारण प्रणाली प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग ही देशातील नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी धोरण मार्गदर्शक तत्त्वे तयार करणारी नोडल एजन्सी आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, विभागाच्या सर्वात महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असल्याने, DAR&PG नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी आणि वेळेवर निवारण/निराकरण करण्यासाठी सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा तयार करते. उद्देश:भारत सरकारचे सार्वजनिक तक्रारी स्वीकारणे, त्यांचा मागोवा घेणे व त्यांचे निराकरण करण्यासाठीचे ऑनलाइन व्यासपीठ. मुख्य वैशिष्ट्ये: नागरिक कोणत्याही केंद्रीय सरकारी विभागाविरोधात ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात.तक्रारीची स्थिती कधीही तपासता येते.ठरलेल्या कालावधीत निराकरण न झाल्यास तक्रार एस्कलेशन. फायदे: तक्रार निवारणात पारदर्शकताजलद निराकरणसरकारी विभागांची जबाबदारी निश्चित होते वापरण्याची पद्धत: CPGRAMS पोर्टलला भेट द्या: https://pgportal.gov.in/ नोंदणी / लॉगिन करा तपशील भरा: नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, पासवर्ड, कॅप्चा तक्रार दाखल करा आणि निवडा: तक्रारीचा प्रकार -विभाग / मंत्रालय ,राज्य / जिल्हा (लागू असल्यास) तक्रार स्पष्टपणे लिहा: उ.दा. -काय घडले,केव्हा घडले, समस्या काय आहे, अपेक्षित निराकरण काय इत्यादी .पूरक कागदपत्रे जोडा (असल्यास): फोटो / PDF / कागदपत्र स्कॅनसबमिशननंतर तुम्हाला Grievance ID मिळेल.“Track Grievance” मध्ये Grievance ID टाकून स्थिती तपासा: रिसिव्हड ,अंडर प्रोसेस ,रिझॉल्व्ड ,क्लोज्ड . पुढील दिशा -AI आधारित तक्रार वर्गीकरण व ट्रॅकिंग वेळबद्ध व गुणवत्ताधारित निवारण राज्य/स्थानिक प्लॅटफॉर्मशी एकत्रीकरण डेटा अॅनालिटिक्सद्वारे तक्रार प्रतिबंध अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व जबाबदारी वाढवणे