नॅशनल पंचायत प्रोफाईलर / एरिया प्रोफाइलर उद्देश सर्व पंचायती राज संस्थांचे भौगोलिक क्षेत्र, सामाजिक, आर्थिक, भौतिक, सोई-सुविधा तसेच संबंधीत पंचायत राज संस्थेमधील लोकप्रतिनिधींची माहिती. ग्रामपंचायत स्तरावर कुटूंब नोंदणी व्यवस्थापन. सर्व पंचायत स्तरांवर निवडणुक व निवडून आलेल्या प्रतिनिधींची माहिती. सर्व पंचायत स्तरांवरील कार्यालयीन कामकाजाच्या तपशीलाचे व्यवस्थापन. उद्दीष्टे/फायदे ग्रामपंचायत स्तरावरील नागरिकांची आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण संबंधी माहिती आणि व्यवस्थापन करण्याकरिता शासनास मदत होते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील सुविधा, कुशल कामगार, अधिकारी यांची माहिती उपलब्ध होते. पर्यटन स्थळांच्या विकासासाठी या आज्ञावलीचा फायदा होतो. पंचायत प्रोफाईलर स्त्रोत : ग्राम विकास विभाग