उद्देश शासनाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या (G2C) सेवा (दाखले/प्रमाणपत्रे) देण्याकरिता सदर प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. उद्दीष्टे/फायदे ग्रामपंचायत स्तरांवर देण्यात येणाऱ्या विविध सेवा उदा. रहिवासी दाखला, जन्म व मृत्यु दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील दाखला इत्यादी प्रमाणपत्रे नागरिकांना त्यांचे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होतात. Government to Government (G2G) सेवा – शासन ते शासन स्तरावरील अहवाल . Government to Business (G2B) सेवा – शासन ते व्यापारी सेवा उदा. परवाने, निविदा. Government to Employee (G2E) सेवा – शासन ते कर्मचारी सेवा उदा. सेवा पुस्तके. Government to Citizen (G2C) सेवा – शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा उदा. दाखले, प्रमाणपत्रे, वीज देयक भरणा, तिकीट आरक्षण इत्यादी सेवा ग्रामस्थांना देण्यात येणार आहेत. (शासन निर्णय 23 मे, 2012) सर्व्हीस स्त्रोत : ग्राम विकास विभाग