चोच भरवी चोचीलास्रवे मायेचा ओलावासानुलं घरट्यामध्येपक्षीण मागते जोगवा चारा पाण्यासाठी माय हिंडे रानो-माळीलडखडती पग- पंखतरी भरारे आभाळी! स्वयें सोसुनिंया झळादाही दिशा विहारीतान्हुल्या जीवासाठीमाय कावरी-बावरी! उडो-उडोनी अंबरीपग-पग गाञ थकलेपिल्लू उडाले आकाशीझाले घरटे मोकळे! हाच नियतीचा ठेवा सूर जुनेच आळवीते ही गळेल पानफुटेल नवीन पालवी!.........@गोपाळ वेखंडे,शहापूर