जैन पुराणकथांवर हिंदू कथांचा प्रभाव असून त्यांनी सरस्वती, कुबेर, इंद्र, शंकर, विष्णू, लक्ष्मी, गणपती, यक्ष, यक्षिणी इ. देवता व अतिमानवी शक्तींचा स्वीकार केलेला आहे. एवढेच, की त्यांनी या देवादेवतांना तीर्थंकरांचे सेवक मानले आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य यांतील प्रत्येक काळात चोवीस तीर्थंकर होतात, असे त्यांनी मानले आहे. त्यांपैकी ऋषभदेव वा आदिनाथ हा पहिला तीर्थंकर असून महावीर वर्धमान हा चोविसावा तीर्थंकर होय. त्यांच्याविषयी अनेक पुराणकथा आहेत. त्यांना तीन प्रकारची ज्ञाने उपजतच प्राप्त असतात, ते मातेच्या गर्भात असताना तिला १६ प्रकारची स्वप्ने पडतात, त्यांच्या पायाखाली सोन्याची कमळे उमलतात इ. कल्पना करण्यात आल्या आहेत. संदर्भ : ऑल्डिंग्टन, रिचर्ड; एम्स, डेलानो; अनुवादित. न्यू लारूस एन्सायक्लोपीडिया ऑफ मिथॉलॉजी, मिथकशास्त्र, लंडन, १९७५. बोल्ले, के. डब्ल्यू. द फ्रीडम ऑफ मॅन इन मिथ, नॅशव्हिल, टेनेसी, १९६८. कॅम्पबेल, जोसेफ. द मास्क्स ऑफ गॉड, ४ खंड, लंडन, १९५९–६८. दांडेकर, आर. एन. वैदिक धर्म आणि पुराणकथा, पुणे, १९६५. डेंट, जे. एम.; डटन, ई. पी. एव्हरीमॅन्स डिक्शनरी ऑफ नॉन-क्लासिकल मिथॉलॉजी, न्यूयॉर्क, १९५२. एलिएड, मिर्सिया; अनुवादित. मिथ अँड रिअॅलिटी, न्यूयॉर्क, १९६३. फ्रेझर, जे. जी. द गोल्डन बाऊ, न्यूयॉर्क, १९२२. ग्रे, एल. एच. संपादित. द मिथॉलॉजी ऑफ ऑल रेसेस, १३ खंड, बॉस्टन, १९२५–३६. हॅकिन, जे.; ह्युआर्ट, क्लेमेंट आणि इतर; अनुवादित, अॅटकिन्सन, एफ. एम. एशियाटिक मिथॉलॉजी, लंडन, १९६७. हुक, एस. एच. संपादित. मिथ अँड रिच्युअल, न्यूयॉर्क, १९३३. आयन्स, व्हेरोनिका. इंडियन मिथॉलॉजी, लंडन, १९६७. जेम्स, ई. ओ. प्रिहिस्टोरिक रिलिजन्स, लंडन, १९५७. जेन्सन, ए. ई.; अनुवादित. मिथ अँड कल्ट अमंग प्रिमिटिव पीपल्स, न्यूयॉर्क, १९६३. जुंग, सी. जी.; केरेंयी, के.; अनुवादित. एसेज ऑन अ सायन्स ऑफ मिथॉलॉजी, न्यूयॉर्क, १९५०. क्रेमर, एस. एच. संपादित. मिथॉलॉजीज ऑफ द एन्शंट वर्ल्ड : क्रिएशन, न्यूयॉर्क, १९६१. लॉंग, सी. एच. अल्फा : द मिथ्स ऑफ क्रिएशन, न्यूयॉर्क, १९६३. मॅलिनोव्स्की, ब्रोनिस्लाव. मॅजिक, सायन्स अँड रिलिजन अँड अदर एसेज, बॉस्टन, १९४८. मॅलिनोव्स्की, ब्रोनिस्लाव. सेक्स, कल्चर अँड मिथ, लंडन, १९६३. मिडल्टन, जॉन. मिथ अँड कॉसमॉस : रीडिंग्स इन मिथॉलॉजी अँड सिम्बॉलिझम, न्यूयॉर्क, १९६७. पिकार्ड, बी. एल. संपादित. द एन्सायक्लोपीडिया ऑफ मिथ अँड लिजेंड्स ऑफ ऑल नेशन्स, लंडन, १९६२. सॅव्हिल, शीला संपादित; बार्कर, मेरी; कुक, ख्रिस्तोफर. पिअर्स एन्सायक्लोपीडिया ऑफ मिथ अँड लिजेंड्स, ४ खंड, लंडन, १९७६–७८. लेखक: आ. इ. साळुंखे माहिती स्रोत: मराठी विश्वकोश