गुणधरकृत कषायप्राभृत ह्या दिगंबर जैन सिद्धांत ग्रंथावर वीर सेनवजिनसेन (नववेशतक) ह्या गुरुशिष्यांनी ६०,००० गाथांत लिहिलेली संस्कृत-प्राकृत मिश्रित टीका. ह्या ग्रंथाच्या पहिल्या २०,००० गाथा लिहून झाल्यावर वीरसेन निधन पावला. त्यानंतर ४०,००० गाथा लिहून जिनसेनाने ही टीका पूर्ण केली. ह्या टीकेतकषायप्राभृतावर यतिवृषभाने लिहिलेली चूर्णिसूत्र, उच्चारण आणि बप्पदेव ह्यांनी लिहिलेली उच्चारणवृत्ति इ. टीकांचा अंतर्भाव केला आहे. दिगंबर जैन तत्त्वज्ञानावरील गोम्मट सार वगैरे प्रख्यात जयधवलेच्या आधारे लिहिण्यात आले आहेत.

संदर्भ : फूलचंद्र, महेंद्रकुमारकैलासचंद्र, संपा. जयधवला, मथुरा, १९४४.

लेखक: ग. वा.तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश