गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १,९६,०२४ चौरस किमी इतके आहे. अहमदाबाद हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार गुजरातची लोकसंख्या ६,०३,८३,६२८ इतकी आहे. राज्याची साक्षरता ७९.३१टक्के आहे. राज्याची अधिकृत भाषा गुजराती असून हिंदी आणि इंग्रजी भाषेतही व्यवहार केले जातात. राज्यात ३३ जिल्हे समाविष्ट आहेत. गुजरात राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली. गुजरात हे भारताच्या पश्चिम प्रदेशातील राज्य आहे. महात्मा गांधी हे १९१७ ते १९३० पर्यंत याच राज्यातील साबरमती आश्रमात रहात असत. गुजरातमध्ये द्वारका, सोमनाथ, पालिटना, पावागड, अंबाजी, भद्रेश्वर, श्यामलजी, तरंग, गिरनार ही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. पोरबंदर हे महात्मा गांधींचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक महत्त्व आहे. पाटणपुरा, सिद्धपूर, घुमली, दाभोई, वाडनगर, मोधेरा, लोथल व अहमदाबाद ही शहरेही ऐतिहासिक. अहमदपूर-मांडवी, चोरवाड व तिथल हे गुजरातची सुंदर समुद्रकिनारे. सतपुरा, सिंहाचे अभयारण्य, गिरचे अभयारण्य जंगल व रानटी गाढवांचे अभयारण्य (कच्छ) आदी पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे आहेत. अलंग हे निकामी जहाजांची विल्हेवाट लावण्याचे गुजरातमधील भारतातील एकमेव बंदर आहे. अहमदपूर मांडवी हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य ठिकाण आहे. अहमदाबादचे प्राचीन नाव कर्णावती असून वस्त्रोद्योगात भारतात अग्रेसर आहे. महात्मा गांधींचा साबरमती आश्रम. आणंद हे दुग्ध विकासात भारतात अग्रेसर. कांडला हे कच्छच्या आखातातील आंतरराष्ट्रीय बंदर. गांधीनगर ही गुजरात राज्याची नवनिर्मित सुनियोजित वसवलेली राजधानी. स्वामी नारायण पंथाचे अक्षरधाम हे अतिविशाल व कलात्मक मंदिर. जामनगर हे ऐतिहासिक ठिकाण. प्राचीन राजधानी. जुनागड हे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी वसलेले प्राचीन नगर. संत नरसी मेहतांचे जन्मस्थान. डभोई येथील तेराव्या शतकातील किल्ला. तिथल हे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य पर्यटन स्थान असून दांडी हे ऐतिहासिक स्थान आहे. इ.स. 1930 ची महात्मा गांधींची दांडीयात्रा व मिठाचा सत्याग्रह. द्वारका ही श्रीकृष्णाने आपली राजधानी मथुरेहून इथे आणली. नलसरोवर पक्षी अभयारण्य. नवसारी पारश्यांची ज्योत. पाटण ही प्राचीन राजधानी. लोथल येथील हडप्पा संस्कृतीचे अवशेष. वडोदरा ही गायकवाड संस्थानची राजधानी असून राजवाडे. सोमनाथ मंदिरे येथे आहेत. सुरत हे तापीवरील प्राचीन ऐतिहासिक शहर येथे आहे.गुजराती लोकसंगीत हे सुगम संगीत नावाने ओळखले जाते. तुरी, बंगाल आणि पावा, रावण हातो, एकतारो, जंतर, मंजिरा, झांज आणि पोटझोडे ही गुजरातची लोकवाद्य आहेत. गरबा, दांडिया, तिफणी आदी लोकनृत्य गुजरात मध्ये लोकप्रिय आहेत. गरबा हे विशेषत: महिलांचे नृत्य असून विशिष्ट ठेक्यावर टाळ्या वाजत वा हातातल्या टिपऱ्या खेळत फेर धरून हे नृत्य केले जाते. हे नृत्य नवरात्रीत देवीच्या उत्सवात केले जाते. दांडिया नृत्यात काठी नृत्य आणि तलवार नृत्यही अंतर्भूत असते. दुर्गा आणि महिषासुर यांच्यात झालेले युद्ध म्हणजे दांडिया नृत्य. तिफनी नृत्य हे सौराष्ट्रातील नृत्य आहे. कामगार स्त्रिया हे नृत्य करतात. हातात मोगरी सारखा लाकडी दंडुका घेऊन जमिनीवर आदळले जातात. हेमचंद्र आचार्य, नरसी मेहता, मिराबाई, प्रेमानंद भट्ट, श्यामल भट्ट, दयाराम, दलपतराम, गोवर्धनराम त्रिपाठी, महात्मा गांधी, के.एम.मुन्शी, उमाशंकर जोशी, सुरेश जोशी, पन्नालाल पटेल, राजेंद्र शहा हे गुजरातीतील महत्त्वाचे लेखक आहेत. कवी कांत, झवेरचंद मेघानी, कल्पी आदी गुजराती कवी आहेत. गुजराती लोकनाट्य भवाई या नावाने प्रसिद्ध आहे. लोकसंगीत आणि लोककला यांच्या सरमिसळीत ही भवाई कला सादर केली जाते.अहमदाबाद, वडोदरा, भावनगर, भूज, सुरत, जामनगर, कांडला, केशोद, पोरबंदर, राजकोट येथे विमानतळ आहेत. लुनी, मही, साबरमती, बनास, नर्मदा, तापी, दमणगंगा, अजी, अंबिका, अरूणावती, औरंगा, बलराम, भादर, भु्खी, भुरूड, चिराज, चौक, फुलकी, गजांनसर, घेला, हिरन, काली, कंकावती, करेश्वर, कायला, केरी, खारी, खोकरा, कीम, कोलाक, मालन, मिंढोला, नागमोती, नारा, नायरा, रंगमती, रावळ, रूखमावती, रूपेन, साई, सरस्वती, शाही, सुवी, उतावली, वेगडी, विश्वमित्री या नद्या गुजरातमधून वाहतात. लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे स्त्रोत - महान्युज