सांगली जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्रापैकी श्री क्षेत्र औदुंबर हे एक श्री दत्तात्रयांचे जागृत स्थान आहे. तासगाव तालुक्यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या पवित्र काठी रम्य वनश्रीमध्ये हे देवालय आहे. देवालयामध्ये श्री दत्तांच्या पादुका आहेत. या श्रीक्षेत्राच्या परिसर विकासाचे महत्वपूर्ण कार्य शासनाने हाती घेऊन घाट बांधला आहे.

औदुंबर पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते.कृष्णा काठचा नयनरम्य परिसर श्रीं दत्त गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. श्रीं दत्तावतार नरसिंह सरस्वतीचे हे स्थान आहे.औदुंबर स्थळी विमल पादुकारुपाने त्यांचा वास सुरू आहे.श्री च्या पादुकावर अंकलखोपचे देशपांडे यांनी घुमट बांधला वर्ष भरात येथे अनेक धार्मिक विधी, समारंभ, उत्सव होतात.मार्गशीर्ष शुध्द १५ श्री दत्तजयंती, दत्तजन्मोत्सव व महाप्रसाद होतो.माघ शुध्द एकपासून श्रीं नृसिहसरस्वती निर्वाण मोहत्सव होतो.माघ वाद्य ५ या दिवशी गुरूपादुकाची महापूजा होते. त्या दिवशी गावातून पालखी मिरवणूक निघते.मकरसंक्रांतीस सदानंद साहित्य मंडळाचे संमेलन होते.

गुरू शिवशंकर आश्रम

औदुंबरमधील कृष्णेच्या घाटालगत श्रीगुरू शिवशंकरानंद आश्रमाची प्रशस्त वास्तू आहे.वेदाचे अध्ययन आश्रमाची प्रशस्त वास्तू आहे.वेदाचे अध्ययन या आश्रमात होते.पौरोहित्याचे शिक्षण दिले.जाते. आश्रमात मौलिक साहित्य आहे.संस्कृत ग्रंथ आहेत.

ब्रह्मानंद मठ

औदुंबर येथे महायोगी ब्रह्मानंद महारजांचा जुना मठ आहे.बहुतेक ठिकाणी दत्तमूर्ती विष्णू प्रधान स्वरूपात असते.येथे मात्र ती शिवप्रधान स्वरूपात प्रतिष्ठापित आहे. येथे शंकराची पिंड ही वैशिष्टयपूर्ण आहे. मठाच्या समोर दोन पिंपळाची झाडे होते.जय-विजय अशी त्यांची नावे होती.कालांतराने ती नष्ट झाली

कृष्णेचा डोह

ओदुंबर येथील कृष्णेचा डोह रमणीय आणि लोभस असा हा डोहकाळिमा आहे.अलीकडे श्री दत्तमंदिर व पैलतीरावर भूवनेश्वरी मध्ये कृष्णेचा डोह आहे.त्यावरून भावीकाना ने-आण करणारी नौका चालते.डोहातील पाणी कमी झाल्यावर सिध्दनाथाचे मंदिर दृष्टीस पडते.नृसिंह-सरस्वातीच्या निर्वाणदिनी फुलांनी सजविलेला पाळणा सोडला जातो.बाजूस सुंदर घाट बांधण्यात आला आहे.

भुवनेश्वरी मंदिर

औदुंबरच्या पैलतीरावरील श्री भुवनेश्वरी मंदिर आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.नृसिंह सरस्वती औदुंबर येथे आले. त्याही आधी भुवनेश्वर येथे वसली आहे. रम्य परिसर,दगडी रेखीव हेमांडपंथी मंदिर आहे.मंदिर परिसरात दगडी बुरूज,समोरील दगडी दिपमाळा,हनुमान,गणपती,काळ्भैरव,महादेवाची छोटी मंदिरे,प्रवेशद्वारे या मंदिराचा परिसर विलोभनिय जाणवतो.भिलवडी गावातून मंदिरापर्यत मार्ग आहे.औदुंबरातील अवधूत नौकेतून कृष्णेचा डोह पार केला की मंदिराची दगडी वाट सुरू होते. मंदिर परिसर प्रशस्त व शांत आहे.देवाची मूर्ती साडेचार फूटी चक्रधारी आहे.

मंदिर वास्तुशिल्पाचा वैशिष्टयपूर्ण नमुना आहे.रेखीव दगडांमुळे सौंदर्यात भर पडते.कोणत्याही हवामानात मंदिरातील वातावरण समाधान देणारे जाणवते.समोरील दगडी दीपमाळेवर कंरजाच्या तेलाचे दिवे लावले.मंदिर उजळून निघते.परिसरतील माहेरवाशिणी देवीची ओटी भरून जातात.ओदुंबरला येणारे भाविक हमखास या देवी च्या दर्शनासाठी येतात.

माहिती स्रोत: mysangli.com