प्रस्तावना

समाजातील वाढती गुन्हेगारी आणि त्यासंबंधी घटना रोज वर्तमानपत्रे, टी.व्ही व इतर समाजमाध्यमांच्या रुपात आपणास पाहवयास मिळतात. गुन्ह्याचे स्वरूपही आजकाल बदलल्याचे दिसून येते. शास्त्रशुद्ध पद्धतीने गुन्हा करून पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्नही गुन्हेगार करत असतात. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबर त्याचा गैरवापरही वाढला आहे. कुठल्याही गुन्ह्यांचा छडा लावण्यात फॉरेन्सिक तज्ञ महत्वाची भूमिका बजावत असतो. हे तज्ञ वैज्ञानिक साधनांच्या आधारे शोधप्रक्रिया चालू ठेवतात आणि अखेरीस गुन्हेगार सापडण्यास मदत होते. कायदेशीरदृष्ट्या फॉरेन्सिक तज्ञ अत्यंत महत्वाचे ठरतात. ते गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी एक्स्पर्ट ब्लड, बॉडी फ्लूड, हेयर, फिंगरप्रिंट, फूटप्रिंट, टिशू आदी माध्यमातून प्रयत्न करतात. पोलिसांच्या सोबत हे सहयोगी म्हणून काम करत असतात. मित्रहो, या क्षेत्रात संधींची कमतरता नाही. शासकिय सेवेबरोबरच खाजगी संस्थामध्येही काम मिळू शकते. आजकाल या क्षेत्राकडे तरुणाईचा जास्त ओढा असल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने या क्षेत्रातील करिअरच्या नेमक्या कोणत्या संधी आहेत पाहूयात खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

पात्रता

या अभ्यासक्रमासाठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या विषयात पदवीही संपादन करता येते. पदवी नंतर फॉरेन्सिक सायन्स आणि क्रीमिनालॉजी या विषयात एक वर्षाचा डिप्लोमा कोर्सही करता येतो. फॉरेन्सिक सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवी करण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बी फार्म, बीडीएस आणि अप्लायड सायन्स या विषयातून ६० टक्के गुणासहित पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच फॉरेन्सिक स्पेशालीस्ट होण्यासाठी एमबीबीएस आवश्यक असून फॉरेन्सिक सायन्समध्ये एमडीही करता येईल.

कामाच्या संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. शासकिय क्षेत्रात फॉरेन्सिक सायंटीस्टसाठी आयबी, सीबीआय, स्टेट पोलीस क्राईम सेल, केंद्र आणि राज्य शासनच्या फॉरेन्सिक लॅब, डीटेक्टीव एजन्सीत नोकरी करता येईल तसेच फॉरेन्सिक या विषयात अध्यापक म्हणून अध्यापन करता येईल.

वेतन

शासकिय नोकरीत नियमानुसार वेतन मिळते तसेच खाजगी क्षेत्रात १५ ते २० हजारापर्यंत सुरुवातीस वेतन मिळू शकते.

कोर्सेस

• डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनोलॉजी

• बीएससी इन फॉरेन्सिक सायन्स

• पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन क्रिमिनोलॉजी अँड पोलिस एडमिनिस्ट्रेशन

• एमएससी इन फॉरेन्सिक सायन्स

• एमएससी इन क्रिमिनोलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स

• एमएससी इन साइबर फॉरेन्सिक अँड इन्फॉर्मेशन सिक्योरिटी

• एमए क्रिमिनोलॉजी अँड क्रिमिनल जस्टिस

स्पेशलायजेशन

या विषयात स्पेशलायजेशन करू शकता

• क्राइम सीन इन्वेस्टिगेशन

• फॉरेन्सिक पॅथोलॉजी/ मेडिसिन

• फॉरेन्सिक एंथ्रोपालॉजी

• फॉरेन्सिक डेंटिस्ट्री

• क्लिनिकल फॉरेन्सिक मेडिसिन

• फॉरेन्सिक एंटोमोलॉजी

• फॉरेन्सिक सेरालॉजी

• फॉरेन्सिक केमिस्ट

• फॉरेन्सिक इंजीनियर

• फॉरेन्सिक आर्टिस्ट व स्कल्पचर

• टॉक्सिकोलॉजी.

प्रशिक्षण संस्था

• इंस्टीट्युट फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनोलॉजी, बुंदेलखंड विद्यापीठ

• डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, पंजाब विद्यापीठ

• दिल्ली विद्यापीठ

• डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा

• लोक नायक जयप्रकाश नारायण नॅशनल इंस्टीट्युट ऑफ क्रिमिनोलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स, दिल्ली

• गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली

• डिपार्टमेंट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फोरेंसिक सायन्स, कर्नाटक विद्यापीठ

• सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबोरेट्री, हैद्राबाद

लेखक: सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज