फोटोनिक्स हे करिअरचे नाविन्यपूर्ण क्षेत्र असून ते उर्जा आणि प्रकाशाशी संबंधित आहे. जसे विसाव्या शतकाची महत्वाची देणगी इलेक्ट्रॉनिक होती त्याचप्रमाणे २१ व्या शतकातील फोटोनिक्स ही आहे. फोटॉनचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास या शाखेत केला जातो. भौतिकशास्त्रातील ही महत्वाची अध्ययन शाखा असून सध्या ऑप्टीकल तंत्रज्ञानाचे युग असल्याने या विषय शाखेला महत्व प्राप्त झाले आहे. कम्युनिकेशन, वैद्यकीय, सुरक्षा त्याचबरोबर आधुनिक लेजर, ऑप्टिक्स, फायबर ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल डिव्हायसेस या तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्या अनुषंगाने करिअर करण्यासाठी हे क्षेत्र प्रभावी ठरू शकते त्याचा घेतलेला हा आढावा.

पात्रता

या क्षेत्रात पदवी संपादन करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासहित ५० टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण असावे. तसेच पदव्युत्तर पदवीसाठी भौतिकशास्त्र, उपयोजित भौतिकशास्त्र तसेच गणित या विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. यात एम.फील आणि पीएच.डी करता येते.

व्यक्तिगत गुण

या विषयात करिअर करण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात प्राविण्य असणे गरजेचे आहे. तसेच विज्ञान विषयक चिकित्सक दृष्टीकोन हवा. संवाद कौशल्यही उत्तम असल्यास अधिक फायदा होतो.

कामाचे स्वरूप

फोटोनिक्समध्ये लेसर कार्यप्रणालीचे विविधांगी डिझाइन्स, लेसर साधने, विविध वस्तू आणि धातूंमधील गुणधर्माच्या संशोधनावर भर दिला जातो.

फोटोनिक्स संबधित क्षेत्रे

• लेसर ट्रीटमेंट

• टेलीकम्युनिकेशन

• माइक्रोस्कोपी

• अॅडवांस स्पेक्ट्रोस्कोपी

• बायोटेक्नोलॉजी

• माइक्रोबायोलॉजी

• औषधविज्ञान

• सर्जरी

• फोटोनिक कंप्यूटिंग

• मिलिट्री अॅप्लीकेशन कोर्सेज

• बॅचलर इन फोटोनिक्स व ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स

• मास्टर डिग्री इन फोटोनिक्स व ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स

• एम.टेक इन फोटोनिक्स

• एम.फिल इन फोटोनिक्स

• पीएच.डी इन फोटोनिक्स

• डिप्लोमा इन फोटोनिक्स

संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर देश आणि विदेशातही नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या विषयातील प्रभुत्व असणाऱ्यांना प्रथम संधी दिली जाते. तसेच तंत्रज्ञ आणि संशोधक म्हणून शासकीय नोकरीही करता येते. मॅन्युफॅक्चर डिझाईनर, फोटोनिक कंप्यूटिंग म्हणूनही काम करता येईल. संशोधन आणि विकास या क्षेत्रात या विषयातील उमेदवारांना मुबलक संधी आहेत. सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी, फायबर अँड इंटिग्रेटेड ऑप्टिक्स, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स अँड सॉफ्टवेअरच्या क्षेत्राशी संबंधीत कंपन्यात मुख्य पदांवर त्यांची नियुक्ती केली जाते.

वेतन

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरीत गेल्यास त्यानुसार वेतन मिळते. खाजगी क्षेत्रात २० हजार रुपये पासून वेतन मिळू शकते.

प्रशिक्षण संस्था

राजर्षी शाहू महाविद्यालय, डिपार्टमेंट ऑफ फोटोनिक्स, लातूर.

द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोनिक्स, कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्क्नॉलॉजी, दिल्ली.

डिपार्टमेंट ऑफ अप्लायड ऑप्टिक्स अँड फोटोनिक्स, कोलकाता

सेंटर फॉर अॅडवान्स टेक्नॉलॉजी(केट), इंदौर

भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई

अधिक माहितीसाठी

संकेतस्थळ

www.cusat.ac.in

www.iitm.ac.in

www.iitd.ac.in

www.iitb.ac.in

www.barc.gov.in

www.cat.ernet.in

मित्रहो करिअरमधील पारंपारिक क्षेत्रापेक्षा अनेक नवनवीन संशोधन क्षेत्रे उदयास येत आहेत. संशोधकवृत्ती असेल आणि प्रयत्नपूर्वक कष्टाची तयारी असेल तर हे क्षेत्र व्यापक आणि विस्तारत जाणारे आहे. तंत्रज्ञानावर आधारित अनेक विषयशाखा विकसित होत असून थोडेसे धैर्य दाखविल्यास यात उत्तम करिअर करता येईल.

लेखन- सचिन के. पाटील

माहिती स्रोत: महान्युज