म्यानातुनि उसळे तरवारीची पातवेडात मराठे वीर दौडले सात !ते फिरता बाजूस डोळे किंचित ओलेसरदार सहा सरसावुनि उठले शेलेरिकिबीत टाकले पाय, झेलले भालेउसळले धुळीचे मेघ सात, निमिषातवेडात मराठे वीर दौडले सात !आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेनाअपमान बुजविण्या सात अर्पुनी मानाछावणीत शिरले थेट, भेट गनिमांनाकोसळल्या उल्का जळत सात दर्यातवेडात मराठे वीर दौडले सात !खालून आग, वर आग, आग बाजूंनी,समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी,गर्दीत लोपले सात जीव ते मानीखग सात जळाले अभिमानी वणव्यातवेडात मराठे वीर दौडले सात !दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचाओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचाक्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचाअद्याप विराणी कुणि वार्यावर गातवेडात मराठे वीर दौडले सात ! कवी : कुसुमाग्रज